19 Oct 2023, 14:36 वाजता
मराठा आंदोलक सुनील कावळेंची आत्महत्या- विनोद पाटील
Maratha Reservation : जालन्यातील मराठा आंदोलनात सक्रिय असलेल्या सुनील कावळे या व्यक्तीने मुंबईत आत्महत्या केलीय...मराठा समन्वयक विनोद पाटील यांनी ट्विट करून ही माहिती दिलीय...मयत सुनील कावळे हे मराठा आंदोलनात सक्रिय असून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केल्याचा दावा विनोद पाटलांनी केलाय...आपल्या मागण्या मंजूर करून घेण्याचा हा योग्य मार्ग नाही...खचून जाऊ नका, लढाई अर्ध्यावर टाकून जाऊ नका....असं आवाहन विनोद पाटलांनी मराठा समाजाला केलंय...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
19 Oct 2023, 14:23 वाजता
मनोज जरांगेंना पुढचे मुख्यमंत्री करू- मराठा आंदोलक
Maratha Reservation : प्रस्थापित मराठा नेत्यांना त्यांची जागा दाखवून मनोज जरांगेंना पुढचे मुख्यमंत्री करू असा निर्धार सकल मराठा क्रांती मोर्चानं केलाय. आरक्षणाच्या मुद्यावर मराठा समाज पुन्हा आक्रमक झालाय. मनोज जरांगे-पाटलांचे वादळ आता पवारांच्या बालेकिल्ल्यात धडकणार असून या वादळाचे धक्के प्रस्थापित मराठा नेत्यांना त्यांची जागा दाखवतील असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिलाय.
19 Oct 2023, 13:47 वाजता
महादेव जानकर आणि शरद पवारांची भेट
Sharad Pawar & Mahadev Jankar Meet : रासप अध्यक्ष महादेव जानकर आणि शरद पवारांची दिल्लीत भेट झाल्याची माहिती समोर येतेय... जानकर आणि पवार यांच्या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय...महादेव जानकर यांनीच 'झी २४ तास'ला माहिती दिलीय...जानकरांचा रासप पक्ष हा महायुतीचा घटकपक्ष आहे..त्यामुळे जानकर मविआत येणार का...? अशी चर्चा रंगलीय...असं असलं तरी आमची अनौपचारिक भेट असून, राजकीय अर्थ नको अशी प्रतिक्रिया जानकरांनी दिलीय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
19 Oct 2023, 13:05 वाजता
गट 'क'च्या सरकारी भरती परीक्षेत गोंधळ
Beed : बीडमध्ये गट क साठी अर्थ सांख्यिकी विषयाच्या परीक्षेमध्ये गोंधळ झालाय. अनेक विद्यार्थ्यांना वेगवेगळी कारण देऊन परीक्षेला बसू न दिल्याने विद्यार्थी संतापले. सेंटर चालक मनमानी कारभार करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. विद्यार्थ्यांनी आता परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
19 Oct 2023, 11:17 वाजता
ड्रग्जमाफिया ललित पाटीलवर मोक्का लागणार?
Pune Lalit Patil Update : ड्रग्जमाफिया ललित पाटीलविरोधात पुणे पोलीस आता मोठी कारवाई करणार आहे... ललित पाटील आणि त्याच्या साथीदारांविरोधात मोक्का लावण्याची तयारी पुणे पोलिसांनी सुरु केलीय.. तसंच ललित पाटीलची कोठडी मिळवण्यासाठी पुणे पोलीस प्रक्रियाही सुरु करतायत.. ललित पाटीलविरोधात पिंपरी चिंचवड, पुणे, मुंबई आणि नाशिक पोलिसांत संघटित ड्रग्ज रॅकेट कारवाईसंबंधी पाच गुन्हे दाखल आहेत. मोक्काच्या तरतुदींनुसार ललित पाटीलच्या अटकेसाठी हा आधार ठरू शकतो. मोक्का कायद्याअंतर्गत पोलिसांना आरोपपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत वाढवून मिळते. तोपर्यंत मोक्काअंतर्गत आरोपींना जामीन मंजूर होत नाही.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
19 Oct 2023, 11:08 वाजता
आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बदल्या होणार
RTO Officer Online Order : आरटीओतल्या मोटार वाहन निरीक्षक आणि सहायक मोटार वाहन निरिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन होणार आहे.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा मोठा निर्णय घेतलाय.. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत बदलीपात्र अधिका-यांची संगणकीय यादी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलीय.. समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातानंतर आरटीओवर अनेक प्रश्चचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. तसंच या विभागातल्या बदल्यांमागच्या व्यवहारांचीही मोठी चर्चा झाली होती. त्यापार्श्वभूमीवर आता ऑनलाईन बदल्या होणार आहेत.. तसंच समृद्धी महामार्गावर गाड्या थांबवू नका.. गाड्यांची वेगमर्यादा निश्चित करा असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
19 Oct 2023, 10:21 वाजता
विधान परिषद आमदार अपात्रता प्रकरण सुप्रीम कोर्टात?
Thackeray Group In Supreme Court : विधान परिषद आमदार अपात्रता प्रकरणी ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे... ठाकरे गटाने उपसभापती नीलम गोऱ्हे, मनीषा कायंदे आणि विप्लव बजोरिया यांना अपात्र ठरविण्यासाठी याचिका सादर केल्या आहेत. उपसभापती नीलम गोऱ्हेंविरोधातच ठाकरे गटाची याचिका आहे. त्यामुळे विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे यांना सुनावणीसाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलंय..)) दोनदा पत्र देऊनही कोणतीही कारवाई न झाल्याचा आरोप ठाकरे गटाने केलाय. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाच आमदारांविरोधात याचिका सादर केल्या आहेत. तेव्हा विधान परिषद आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी हिवाळी अधिवेशनानंतरच होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच याचिकांवर तातडीने सुनावणी घेऊन निर्णय घ्यावा, या मागणीसाठी उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी सुरू केली आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
19 Oct 2023, 09:46 वाजता
नवीन वर्षात महावितरणचे 'प्रीपेड स्मार्ट मीटर'
MSEB Prepaid Meter : महावितरणच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी.. नव्या वर्षात तुमचे वीजेचे मीटर बदलण्यात येणार आहेत.. ग्राहकांसाठी महावितरणाकडून नवे प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत.. सध्याच्या पद्धतीत वीजग्राहकांनी वीज वापरल्यानंतर दरमहा त्यांच्या मीटरचे रीडिंग घेतले जाते आणि त्यानुसार बिल पाठविले जाते. मात्र प्रीपेड मीटर बसवल्यानंतर ग्राहकांना मोबाईल रिचार्ज प्रमाणे वीज बिलाचंही रिचार्ज करावं लागणार आहे.. वीजेच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसंच ग्राहकांचा वीज वापराचा खर्च निश्चित करण्यासाठी हे नवे मीटर बसवले जाणार आहेत.. जानेवारीपासून हे मीटर बसवण्यात येतील.. महावितरणाच्या 41 लाख ग्राहकांपर्यंत मीटर पुरवण्यासाठी दोन वर्षांहून अधिक काळ लागणार आहे...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
19 Oct 2023, 09:01 वाजता
सुनेत्रा पवार लोकसभा लढणार?
Sunetra Pawar Vs Supriya Sule : सुनेत्रा अजित पवार या लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगू लागलीय...बारामती लोकसभा मतदारसंघात वाढदिवसानिमित्त बॅनर लावण्यात आलेयत...या बॅनरवर सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा देताना संसदेचा फोटो लावण्यात आलाय...बारामती लोकसभा मतदारसंघातील वारजे भागात हे बॅनर लावण्यात आलेयत...त्यावर पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा असाही उल्लेख करण्यात आलाय...त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या बॅनरमुळे चर्चांना उधाण आलं असून बारामतीत सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार अशी लढत होण्याची शक्यताय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
19 Oct 2023, 08:55 वाजता
मुंबईत हवेचा दर्जा घसरला
Mumbai Air Quality : मुंबईकरांसाठी सर्वात मोठी बातमी... पुन्हा एकदा मास्क लावणं सक्तीचं होऊ शकतं. मुंबईच्या हवेचा दर्जा घसरल्यानं मास्क वापरण्याचं आवाहन महानगरपालिकेनं केलंय.. मुंबईची हवा दिल्लीपेक्षाही खराब आहे. काही भागांमध्ये तर हवा अतिवाईट असल्याची नोंद झालीय. हवेत साचलेले धुलीकण आणि धुक्यामुळे मुंबईत धुरकं पसरतंय. दरम्यान हवेतील धुलीकणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महानगर पालिकेनं शहरात ठिकठिकाणी अँटी स्मोक गन लावण्याचा निर्णय घेतलाय. विलेपार्ले आणि चकाला परिसरात हवेची स्थिती अतिधोकादायक असल्याची नोंद झालीय. हवेच्या वाढत्या प्रदुषणामुळे विषाणूजन्य आजारांत वाढ होऊ शकते. त्यापार्श्वभूमीवर मास्क वापरण्याचं आवाहन मुंबई महानगरपालिकेनं केलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -