Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.  

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

21 Apr 2024, 22:17 वाजता

अमित शाहांची रत्नागिरीत होणारी सभा पुढे ढकलली

 

Loksabha Election 2024 : अमित शाह यांची 24 एप्रिल रोजी रत्नागिरीत होणारी सभा पुढे ढकलण्यता आली आहे.... तर त्यांच्या सभेची नवीन तारीख लवकरच निश्चित केली जाणार असल्याचं सांगण्यात आलंय... नारायण राणेंसाठी अमित शाहांची रत्नागिरीमध्ये 24 एप्रिलला सभा ठेवण्यात आली होती... ही सभा पुढे ढकलल्याचं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

21 Apr 2024, 22:08 वाजता

उद्धव ठाकरेंची उद्या अमरावती आणि वर्ध्यात प्रचारसभा

 

Loksabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांची उद्या अमरावती आणि वर्धा लोकसभा मतदारसंघात सभा होणार आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी, उद्धव ठाकरे उद्या दुपारी 12 वाजता सभा घेणार आहेत. यावेळी ते विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात प्रचार सभेत कायबोलणार याकडे लक्ष लागलंय. तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची उद्या वर्धा लोकसभा मतदारसंघातील हिंगणघाटमध्येही सभा होणार आहे. शरद पवार पक्षाचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारासाठी उद्या संध्याकाळी 6 वाजता त्यांची संयुक्त सभा होईल. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

21 Apr 2024, 21:29 वाजता

पुण्यात काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर

 

Pune Congress : पुण्यात काँग्रेस मधील वाद पुन्हा चव्हाट्यावर आलाय. भाजपच्या नेत्यांची नागपूरमध्ये जाऊन भेट घेऊन येणा-यांचा जाहीर निषेध असे फलक पुण्यात लावण्यात आले.... गद्दार भागाओ, काँग्रेस बचाओचे बॅनर काँग्रेस भवनमध्ये झळकले. नाव न घेता आबा बागुल यांना उद्देशून हे फलक लावण्यात आले. पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांना दाखवण्यासाठी दोन काँग्रेस कार्यकर्ते फलक घेऊन उभे होते.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

21 Apr 2024, 20:49 वाजता

चंद्र-सूर्य असेपर्यंत संविधान बदल नाही - देवेंद्र फडणवीस

 

Devendra Fadanavis & Ajit Pawar On Constitution : महायुतीनं संविधानाचा मुद्दा चांगलाच लावून धरल्याचं लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये पहायला मिळतंय....उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नांदेडमधील बाबुराव कोहळीकर यांच्या प्रचारसभेत बोलताना त्यांनी जो पर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यत संविधानाला कोणीही हात लावू शकत नाही...हेच वाक्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अमरावतीमध्ये नवनीत राणांच्या प्रचारसभेत उच्चारलं....त्यामुळे विरोधकांच्या संविधान बदलणार या टीकेची भिती महायुतीने घेतली की, प्रचाराची रणनीती ठरवलीये याबाबत कुतूहल आहे... विशेष म्हणजे महायुतीच्या नेत्यांना संविधान बदलणार नाही याचं स्पष्टीकरण द्यावं लागत असून...विरोधक जनतेमध्ये गैरसमज पसरवत असल्याचंही महायुतीचे नेते जाहीर सभांमध्ये सांगत आहेत..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

21 Apr 2024, 18:32 वाजता

मोदी राष्ट्राच्या भविष्याबाबत काहीच बोलत नाहीत - शरद पवार

 

Sharad Pawar On Prime Minister Narendra Modi : मोदी भाषण करताना राष्ट्राच्या भविष्याबाबत काहीच बोलत नाहीत...वैयक्तिक टीका करतात, काँग्रेसला शिव्या देतात त्यामुळे त्यांच्याविषयी बोलावंच लागेल असा इशारा शरद पवारांनी दिलाय...जामनेरमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

21 Apr 2024, 17:57 वाजता

प्रियंका गांधींचा लवकरच पुणे दौरा

 

Pune Priyanka Gandhi : प्रियंका गांधी लवकरच पुणे दौरा करणार आहेत. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रियंका गांधी पुणे दौ-यावर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौ-यानंतर काँग्रेसनंही पुण्यात रॅली आणि सभेचं आयोजन केलंय. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुणे जिल्ह्यातील 4 लोकसभा मतदारसंघांतील मविआ उमेदवारांसाठी, प्रियंका गांधी पुण्याचा दौरा करणार आहेत. काँग्रेसच्या स्टार प्रचारक प्रियांका गांधी यांच्यासह सचिन पायलट हेही त्यांच्यासोबत असणार आहेत.

 

21 Apr 2024, 15:51 वाजता

डॉन छोटा राजन एकदम फिट

 

Chhota Rajan : कुख्यात माफिया डॉन छोटा राजनचा नवा फोटो झी २४ तासच्या हाती आलाय... त्यानुसार डॉन छोटा राजन एकदम फिट असल्याचं स्पष्ट झालंय. तब्बल ८ वर्षानंतर छोटा राजनचा हा फोटो समोर आलाय. छोटा राजन सध्या तिहारच्या जेल नंबर १ मध्ये हाय सिक्युरिटी बराकमध्ये तुरुंगवास भोगतोय... तर याच तिहारच्या जेल नंबर २ मध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ठेवण्यात आलंय. कोरोना काळात छोटा राजनचा पहिला फोटो समोर आला होता. त्यावेळी छोटा राजनचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. मात्र डॉन जिवंत असल्याचं नंतर स्पष्ट झालं. आता छोटा राजनची तब्येत एकदम ठणठणीत असल्याचं ताज्या फोटोवरून दिसतंय.

बातमी पाहा - अखेर 9 वर्षांनी समोर आला छोटा राजनचा फोटो, जिवंत आहे दाऊद इब्राहिमचा सर्वात मोठा शत्रू

बातमीचा व्हिडीओ पाहा  - 

21 Apr 2024, 13:44 वाजता

उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकरांच्या अडचणीत वाढ

 

Shridhar Patankar : उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण पाटणकरांच्या व्यावसायिक भागीदारावर कारवाई करण्यात आलीय. श्रीधर पाटणकरांचे बिझनेस पार्टनर नंदकिशोर चतुर्वेदी यांची लखनऊतील 200 एकर जमीन जप्त करण्यात आलीय.. हमसफर डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड नावानं ही जमीन खरेदी करण्यात आली होती.. या जमिनीवर टाऊनशिप बनवायचं प्लॅनिंग होती.. चतुर्वेदींच्या कंपनीन पाटणकरांच्या संस्थेला कर्ज दिलं होतं.. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु आहे.. याचदरम्यान ही कारवाई करण्यात आलीय.. 

21 Apr 2024, 13:39 वाजता

'नार्वेकर ठाकरे गट सोडणार ही खोटी बातमी',अंबादास दानवेंचा दावा

 

Ambadas Danave On Milind Narvekar : मिलिंद नार्वेकरांना शिंदेंकडून उमेदवारीची ऑफर असल्याची बातमी समोर आलीय...मात्र, ही बातमी खोटी असल्याचा दावा अंबादास दानवेंनी केलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

21 Apr 2024, 12:38 वाजता

निवडणूक आयोगाची ठाकरे पक्षाला नोटीस

 

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर जोरदार शब्दात ताशेरे ओढलेत. निमित्त ठरलंय ते निवडणूक आयोगाकडून ठाकरे पक्षाला आलेली नोटीस. निवडणूक आयोगानं ठाकरे पक्षाच्या नवीन गीतावर आक्षेप घेतलाय. या गाण्यातील जय भवानी शब्द काढा, अशी नोटीस निवडणूक आयोगानं ठाकरे पक्षाला पाठवलीय.. यावर उद्धव ठाकरेंनी जोरदार आक्षेप नोंदवला.. वानगीदाखल उद्धव ठाकरेंनी मोदी-शाहांच्या भाषणातील दोन व्हिडीओही दाखवले. या व्हिडिओत पंतप्रधान मोदी बजरंगबलीचा तर अमित शाह राम मंदिराचा उल्लेख करताना दिसतायत.. मोदी-शाहांच्या जुन्या भाषणांवर आक्षेप घेत आधी त्यांच्यावर कारवाई करा, मग आमच्यावर करा अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतलीय.