Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.  

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

21 Apr 2024, 12:17 वाजता

नारायण राणेंच्या उमेदवारीमुळे शिंदे गट नाराज

 

Ratnagiri–Sindhudurg LokSabha : रत्नागिरी सिंधुदूर्गमध्ये नारायण राणेंना उमेदवारी दिल्याने शिवसेना शिंदे गटाचे शिवसैनिक अद्यापही नाराज आहेत.. शिवसैनिकांच्या विरोधामुळं कुडाळमधील समन्वय बैठक मंत्री रविंद्र चव्हाण यांना अर्ध्यावर सोडावी लागल्याची माहिती मिळतेय.. या बैठकीला किरण सामंतही उपस्थित होते.. बैठकीत नितेश राणे यांच्याविरोधात शिवसैनिकांनी प्रचंड राग व्यक्त केला.. नारायण राणे यांचे काम करणार नसल्याचा निर्धार शिवसैनिकांनी व्यक्त केला.. आता याप्रकरणी पुन्हा दोन दिवसांनी समन्वय बैठक घेण्यात येणार असून त्यावेळी शिवसैनिकांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांचा असेल.. 

21 Apr 2024, 11:51 वाजता

'मुख्यमंत्री बनण्याची आदित्य ठाकरेंची लायकी आहे का?',चंद्रशेखर बावनकुळेंची जीभ घसरली

 

Chandrashekhar Bawankule on Aaditya Thackeray : उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर टीका करताना चंद्रशेखर बावनकुळेंची जीभ घसरलीय. मुख्यमंत्री बनण्याची आदित्य ठाकरेंची लायकी आहे का? अशी बोचरी टीका बावनकुळेंनी केलीय. देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्याचा शब्द दिला होता.. या उद्धव ठाकरेंच्या दाव्यावर बावनकुळेंनी सडकून टीका केलीय

बातमीचा व्हिडीओ पाहा-

21 Apr 2024, 11:11 वाजता

'मोदींनी फडणवीसांचे पंख छाटले', संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

 

Sanjay Raut on Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंना वेड लागलं असेल या फडणवीसांच्या टीकेला संजय राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.. फडणवीसांना गृहमंत्री, अर्थमंत्री आणि पंतप्रधान होण्याचं स्वप्न पडलं होतं, त्यामुळेच मोदी-शहांनी त्यांचा पत्ता कापून त्यांना उपमुख्यमंत्री बनवलं...आणि शिंदेंना मुख्यमंत्री बनवलं असा घणाघात संजय राऊतांनी केलाय...

21 Apr 2024, 10:46 वाजता

द. मुंबईसाठी मिलिंद नार्वेकरांना शिदेंकडून उमेदवारीची ऑफर?

 

 

Milind Narvekar : महायुती उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत...मिलिंद नार्वेकरांना शिंदेकडून उमेदवारीची ऑफर आल्याची सूत्रांची माहिती...दक्षिण मुंबईसाठी मिलिंद नार्वेकरांच्या नावाची चर्चा-सूत्र...मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंचे स्विय सचिव आणि विश्वासू

21 Apr 2024, 09:50 वाजता

'राजकारणासाठी नाव वापरलं तर पान उतारा करेन',मनोज जरांगेंचा इशारा

 

Manoj Jarange : आम्ही मराठा समाजाचे उमेदवार आहोत असं सांगून कुणी मतं मागत असेल तर त्याला पाडा...मी कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही...माझ्या नावाचा महायुती, महाविकास आघाडी किंवा अपक्ष उमेदवाराने माझ्या नावाचा वावर करू नये...नाहीतर मी पान उतारा करेन असा इशारा जरांगेंनी दिलाय..

21 Apr 2024, 09:22 वाजता

उद्धव ठाकरेंची आज पत्रकार परिषद

 

Uddhav Thackeray : आज दुपारी 12.30 वाजता उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत. फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेतून उत्तर देणार आहेत.. 

21 Apr 2024, 08:35 वाजता

मनसेची मुंबईत आज महत्त्वाची बैठक

 

MNS Meeting : मनसेची मुंबईत आज महत्त्वाची बैठक होणार आहे...दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळेंच्या प्रचारासाठी ही बैठक असल्याची माहिती मिळतेय...राहुल शेवाळे हे शिंदे गट आणि महायुतीचे दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार आहेत...मनसेनं महायुतीला पाठिंबा दिल्याने नितीन सरदेसाईंच्या उपस्थितीत दादरमध्ये बैठक होणार आहे...राहुल शेवाळेंसमोर ठाकरे गटाच्या अनिल देसाईंचा सामना होणाराय...

21 Apr 2024, 08:15 वाजता

'उद्धव ठाकरे महानालायकाच्या पहिल्या नंबरवर दिसतील', चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

 

Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर केलेल्या टीकेला बावनकुळेंनी पलटवार केलाय...महाराष्ट्रातील 14 कोटी नागरिकांचं मत घेतलं तर महानालायकाच्या पहिल्या नंबरवर उद्धव ठाकरे दिसतील...ठाकरेंना उत्कृष्ट मनोरुग्णालयात दाखल करण्याची गरज असल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय...मातोश्रीतील बाळासाहेबांच्या खोलीला कुठलीतरी खोली असं फडणवीसांनी म्हटलं होतं...त्यानंतर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा उल्लेख नालायक माणूस म्हणून केला होता...त्यावरून बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

21 Apr 2024, 07:58 वाजता

शिक्षक नियुक्ती प्रक्रिया पुन्हा सुरू होणार 

 

Teacher Recruitment : निवडणूक आचारसंहितेमुळे थांबलेली शिक्षकांची नियुक्ती प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे... 25 फेब्रुवारी 2024 मध्ये राज्यात पात्र शिक्षकांची नियुक्ती प्रक्रिया सुरू झाली होती... मात्र आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया थांबण्यात आली होती.... न्यायालयाचे आदेश लक्षात घेत शिक्षक नियुक्ती सुरु करण्याची मागणी राज्यशास्त्र विभागानं निवडणूक आयोगाकडे केली होती.. ही विनंती आयोगानं मान्य केलीये.. त्यानुसार सुमारे 21 हजार शिक्षकांची भरती प्रक्रीया पुन्हा सुरु होणार आहे.. पवित्र पोर्टलमार्फत ही नियुक्ती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे...

21 Apr 2024, 07:52 वाजता

दक्षिण मुंबईचा महायुतीचा उमेदवार ठरला?

 

South Mumbai Loksabha : दक्षिण मुंबईच्या जागेबाबत सागर बंगल्यावर खलबतं..फडणवीसांच्या उपस्थितीत सागर बंगल्यावर खलबतं...नार्वेकर, आशिष शेलार, पियूष गोयल, लोढांमध्ये चर्चा...दक्षिण मुंबईच्या जागेसाठी नार्वेकर, लोढांचं नाव आघाडीवर...महायुतीचे दक्षिण मुंबईचे उमेदवार नार्वेकर की लोढा? 

बातमीचा व्हिडीओ पाहा-