Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

24 May 2024, 22:24 वाजता

नागपुरात कारचालकाने 3 जणांना उडवलं

 

Nagpur Accident : नागपूर शहरातील दाटीवाटीच्या महाल परिसरातील झेंडा चौकाजवळ, कारचालक तरुणानं तिघांना उडवलं. गंभीर बाब म्हणेज कारचालक आणि गाडीत बसलेले त्याचे इतर 2 सहकारी मद्यधुंद अवस्थेत होते. तसंच गाडीत दारूच्या बाटल्याही सापडल्या. कारचालकानं आई, वडील यांच्यासह अवघ्या 3 महिन्यांच्या चिमुकल्याला उडवलं असून, त्या बाळाची प्रकृती गंभीर आहे. 

24 May 2024, 20:23 वाजता

डोंबिवलीतील स्फोट प्रकरणी अमुदान कंपनीला क्लोजर नोटीस

 

Dombivli Blast Case : डोंबिवली MIDC मधील अमूदान कंपनीला क्लोजर नोटीस बजावण्यात आली आहे. स्फोट प्रकरणी कंपनीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं ही नोटीस बजावली आहे.

 

24 May 2024, 20:01 वाजता

डोंबिवलीतील अमुदान कंपनीच्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू 

 

Dombivli Blast Case : डोंबिवली MIDCतील अमुदान कंपनीच्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झालाय...तर 55 जण जखमी झालेत...याप्रकरणी ठाणे क्राईम ब्रांचने दोघांना ताब्यात घेतलंय...कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता या मायलेकांना ठाणे गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलंय...मालती मेहता यांनी नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ठाणे क्राईम ब्रांचनं त्यांची कस्टडी घेतलीये...तर मलय मेहताला ठाणे क्राईम ब्रांचनं ठाण्यातूनच ताब्यात घेतलंय....मालती मेहता नाशिकमध्ये त्यांच्या नातेवाईकांडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती...त्यानुसार नाशिकच्या पंचवटी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं...

24 May 2024, 19:21 वाजता

पुणे कल्याणीनगर अपघातप्रकरणी 2 पोलीस कर्मचारी निलंबित

 

Pune Car Accident Case : पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यातील २ कर्मचारी निलंबित करण्यात आलंय...पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी अशी दोघांची नावे....तपासात दिरंगाई आणि अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना दिली नाही..असा ठपका ठेवत दोघांचे निलंबन.. 

24 May 2024, 18:11 वाजता

तळीरामांसाठी खूशखबर !, लोकसभा निकाल जाहीर होताच दारूविक्री खुली

 

Mumbai Dry Day : 4 जूनला लोकसभा निवडणूक निकाल जाहीर होताच मुंबईत तळीरामांचा जल्लोष जोरात असणार आहे. मुंबई जिल्हाधिका-यांनी 4 जूनला मतमोजणीच्या दिवशी ड्राय डे लागू केला होता. त्याला हॉटेल व्यावसायिकांच्या आहार संघटनेनं हायकोर्टात आव्हान दिलं होतं. त्यावर न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यात लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच, मुंबईत दारूविक्री खुली करायला कोर्टानं परवानगी दिली. जिल्हाधिका-यांच्या आदेशामुळे बेकायदेशीर दारूविक्री होण्याची शक्यता याचिकेत वर्तवण्यात आली होती. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

24 May 2024, 17:13 वाजता

पुणे कार अपघात प्रकरण, विशाल अग्रवालसह 5 आरोपींना 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी

 

Pune Car Accident Case : पुणे अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवालला 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसंच इतर 5 आरोपींनाही शिवाजीनगर कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली... सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांनी आरोपी विशाल अग्रवालच्या घरातील CCTV कॅमे-याच्या DVRमध्ये छेडछाड झाल्याचा आरोप केला... तसंच ड्रायव्हरकडे आणखी चौकशी करायची असून, सर्व आरोपींचीही चौकशी करायची असल्याचं सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितलं. यासाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली.... तर आरोपींवर लावण्यात आलेली कलमं जामिनपत्र असल्याचा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांकडून करण्यात आला...

24 May 2024, 15:25 वाजता

डोंबिवलीतील अमुदान कंपनीतील स्फोट प्रकरण, मालक मालती मेहता पोलिसांच्या ताब्यात

 

Dombivli Blast Case : डोंबिवली स्फोटातील अमुदान कंपनीच्या मालक मालती मेहता यांना नाशिकमध्ये ताब्यात घेतलंय... नाशिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केलीये...स्फोट झाल्यापासून कंपनीच्या मालक मालती मेहता यांचा शोध घेतला जात होता...ठाणे क्राईम ब्रँच त्यांचा शोध घेत होती...नाशिक शहरात त्या असल्याची माहिती मिळाली त्यानुसार ठाणे क्राईम ब्रांचने नाशिक पोलिसांशी संपर्क साधला...नाशिकमधील पंचवटी पोलिसांनी पेठरोड परिसरातून एका नातेवाईकाकडून त्यांना ताब्यात घेतलंय...ठाण्याची क्राईम ब्रांचची टीम नाशिकमध्ये पोहोचली आणि त्यांनी मेहता यांना ताब्यात घेतलंय...त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय...

24 May 2024, 14:20 वाजता

रेशीम अनुदान देण्यासाठी लाच

 

Dharashiv : धाराशिवच्या जिल्हात रेशीम कार्यालयातील क्षेत्र सहाय्यक सुर्यवंशी यांचा शेतकऱ्यांकडुन पैसे घेतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला...शेतक-यांकडून रेशीमचे अनुदान काढण्यासाठी 5 हजार रुपये घेताना सहाय्यक अधिकारी कॅमे-यात चित्रित झालाय... या प्रकरणी रेशीम विकास अधिकाऱ्यांनी संबधित क्षेञ सहाय्यकाला कारणे दाखवाची नोटीस दिलीय...नोटीशीचे उत्तर आल्यानंतर योग्य ती कारवाई करणार असल्याची माहिती विकास अधिकारी एस वराट यांनी दिली...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

24 May 2024, 14:18 वाजता

पुणे पोलीस आयुक्तांची बदली करा - रवींद्र धंगेकर

 

Pune Ravindra Dhangekar : काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय...त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहीलंय...पुणे पोलीस आयुक्तांची बदली करण्याची मागणी धंगेकरांनी पत्राद्वारे केलीये...त्याचबरोबर अपघात प्रकरणाचा तपास त्रयस्थ यंत्रणेकडे देण्याची मागणी त्यांनी या पत्राद्वारे केलीये...

24 May 2024, 14:17 वाजता

पुरावे बदलण्याचा प्रयत्न - पोलीस आयुक्त अमितेश कुमार

 

Pune Car Accident Update : पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न पुणे अपघात प्रकरणात करण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. पुरावे नष्ट करणा-याचा प्रयत्न करणा-यांवर कलम 201 लावण्यात येणार आहे.. मुलाला वाचवण्यासाठी ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न केला गेला असा दावाही पुणे पोलिसांनी केलाय..