Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

24 May 2024, 08:14 वाजता

प्रवरा नदीत बुडालेल्यांचा शोध सुरुच

 

Akole Rescue Operation : प्रवरा नदीत बुडालेल्यांचा शोध अजूनही सुरूच आहे...अद्यापही 2 नागरिक बेपत्ता आहेत...त्यांचा शोध घेण्यासाठी टीडीआरएफची टीम शोध मोहीम राबवणार आहे...दोन नागरिकांचा शोध अजून लागलेला नाही...कालच या नागरिकांचा शोध घेताना बोट उलटून तीन एसडीआरएफच्या जवानांचा मृत्यू झाला होता...त्यामुळे पाण्याचा प्रवाह शून्य करण्याचे आदेश विखे पाटलांनी दिलेत...त्यानंतर पाटबंधारे विभागाने पाण्याचा प्रवाह कमी केला असून आता शोध घेतला जाणाराय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

24 May 2024, 07:46 वाजता

विदर्भात तापमानाचा पारा वाढला

 

Vidharbha Heat : विदर्भात उष्णतेचा कडाका वाढलाय. अकोल्यात 45.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची ही नोंद आहे. सध्या मे महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू असून मान्सूनची प्रतीक्षेत आहेत. अशात तापमानाचा पारा वेगानं वर जातोय. दिवसभर उन्हाचे चटके जाणवत आहेत. तर रात्री नागरिक घामाघूम होताना दिसतायत. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासन करतंय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

24 May 2024, 07:43 वाजता

विशाल अग्रवालची पोलीस कोठडी आज संपणार

 

Pune Car Accident Update : पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपींची पोलीस कोठडी आज संपतेय. आतापर्यंत मुलाचे वडील विशाल अग्रवाल, हॉटेलचा मालक प्रल्हाद भुतडा, हॉटेल व्यवस्थापक सचिन काटकर, ब्लॅक बारचा मालक संदीप सांगळे, हॉटेल कर्मचारी नितेश शेवाणी आणि जयेश बोणकर हे 6 आरोपी अटकेत आहेत. आज दुपारी अडीच वाजता या सर्वांना कोर्टात हजर केलं जाणार आहे.. त्याआधी सकाळी 11 वाजता पोलीस आयुक्त कार्यालयात त्यांना पुन्हा चौकशीसाठी नेण्यात येणार आहेत. याशिवाय मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अगरवाल आणि ड्रायव्हरचीही आज पुन्हा चौकशी होणार आहे..

बातमीचा व्हिडीओ पाहा -