25 Dec 2023, 18:41 वाजता
ट्रेनमधून उतरल्यानंतर थेट घरपोच सेवा, IRCTCचा ओला कॅबसोबत करार
Railway and OLA : रेल्वे प्रवाशांसाठी एक खुशखबर.. आता प्रवाशांना ट्रेनमधून उतरल्यानंतर थेट घरपोच सेवा मिळणारंय. त्यासाठी IRCTCने ओला कॅबसोबत करार केलाय. म्हणजेच तुम्हाला रेल्वेचं तिकीट बूक केल्यानंतर ओलाचंही बुकिंग करता येईल..मायक्रो, मिनी, प्राइम सेडान, प्राइम प्ले, ऑटो, शेअर या पद्धतीनं ओलाचं बुकिंग करता येईल. IRCTC अॅप आणि वेबसाइटवर लॉग इन करून आणि 'बुक अ कॅब' या पर्यायावर क्लिक करून प्रवासी या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. आठवडाभर आधी बुकिंग केल्यानंतरच प्रवाशांना या सेवेचा लाभ मिळू शकेल.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
25 Dec 2023, 18:23 वाजता
सर्व्हेवर शरद पवार आणि अजित पवारांचं एकमत
Sharad Pawar on Survey : राज्याच्या राजकारणात पवार काका-पुतण्यात एकमेकांसमोर उभे ठाकले असले तरी एका संस्थेनं महाराष्ट्रात लोकसभेच्या जागांचा केलेल्या सर्व्हेवर मात्र एकमत आहे. पाच राज्यांच्या सर्व्हेत काय होतं आणि निकाल काय आले असं दोन्ही काका पुतण्यांनी सांगितलं. सर्व्हे हे संकेत असतात मात्र त्यावरून निष्कर्ष काढता येत नाही असं मत शरद पवारांनी नोंदवलं. तर सर्व्हेला काहीही आधार नसतो.. अजित पवार यांचं वक्तव्य.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
25 Dec 2023, 16:47 वाजता
वंचित बहुजनच्या सभेत स्टेज तुटल्याने गोंधळ, दुर्घटनेत कोणी जखमी नाही
Vanchit Stage Collapse : नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या सभेत स्टेज तुटल्यामुळे मोठा गोंधळ उडाला. स्टेजच्या मागील लोखंडी फ्रेंम तुटल्यानं मोठा गोंधळ झाला. मात्र या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही, परिस्थिती नियंत्रणात.
25 Dec 2023, 15:58 वाजता
पक्षप्रमुखांनी संधी दिली तर लोकसभा लढणार- अंबादास दानवे
Ambadas Danve : आपल्याला संभाजीनगरातून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा आहे, असं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलंय. पक्षप्रमुखांनी संधी दिली तर दानवेंची लढण्याची तयारी आहे. ज्यांच्यात दम आहे तो जिंकणार.. असं अंबादास दानवे म्हणाले.
25 Dec 2023, 14:22 वाजता
शिरुर लोकसभा लढण्यास विलास लांडे इच्छुक
Vilas Lande : अमोल कोल्हेंच्या विरोधात तगडा उमेदवार देणार असल्याचे म्हणत तो मी जिंकून आणणारच असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला...त्यानंतर आता शिरूरमधून विलास लांडेंनी शिरुरमधून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं म्हटलंय...अजित पवारांनी संधी दिली तर खासदारकी लढणार अशी प्रतिक्रिया विलास लांडेंनी दिलीय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
25 Dec 2023, 14:19 वाजता
काम करत नव्हतो मग दादा का बोलले नाहीत?-अमोल कोल्हे
Amol Kolhe On Ajit Pawar : अजित पवारांच्या टीकेला अमोल कोल्हेंनी उत्तर दिलंय...अजित पवारांना गोष्टी खटकत होत्या मग ते का बोलले नाहीत...? विधानसभेच्या प्रचारावेळी अजित पवारांनीच पाठ थोपटली होती...निवडणुकीत कुणाच्या बाजूनं उभं राहायचं हे सामान्य जनताच ठरवेल...अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हेंनी दिलीय...मात्र, या आरोप प्रत्यारोपांवरून खासदार अमोल कोल्हे हे शरद पवार गटातच असल्याचं शिक्कामोर्तब झालंय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
25 Dec 2023, 13:35 वाजता
शरद पवारांचा अजित पवारांवर पलटवार
Sharad Pawar On Ajit Pawar : आम्ही सत्तास्थापनेसाठी बंड केलं नव्हतं... तर सर्वांनी बसून निर्णय घेतला होता असं विधान करत शरद पवारांनी अजित पवारांवर पलटवार केलाय... मी 60व्या वर्षी भूमिका घेतली, तर काहींनी 38व्या वर्षी भूमिका घेतली असं वक्तव्य अजित पवारांनी काल बारामतीत केलं होतं.. त्यावरच शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलंय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
25 Dec 2023, 13:31 वाजता
अजित पवारांचे अमोल कोल्हेंना ओपन चॅलेंज
Ajit Pawar On Amol Kolhe : अजित पवारांनी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंना पाडण्याची थेट घोषणाच केलीय... शिरुरमध्ये पर्याय देणार आणि तिथे असलेला उमेदवार निवडून आणणार... असं म्हणत अजित पवारांनी नाव न घेता अमोल कोल्हेंवर निशाणा साधलाय.. एका खासदाराला निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं.. मात्र त्यांनी मतदारसंघात दुर्लक्ष केल्याची टीकाही अजित पवारांनी केलीय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
25 Dec 2023, 13:23 वाजता
वर्ध्यात फार्म हाऊसवर दरोडा
Wardha Robbery : वर्ध्याच्या कारंजामध्ये दरोडेखोरांनी मध्यरात्री एका फार्म हाऊसवर दरोडा टाकलाय...दरोडेखोरांनी एका व्यक्तीवर चाकू हल्ला करून 55 पोती सोयाबीन आणि सोनं असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केलाय. नारा शिवारातील वाघोड्यात ही घटना घडलीय. दरोडेखोरांच्या चाकू हल्ल्यात गोपाळ पालीवाल यांच्या पोटावर गंभीर जखम झालीय. त्यांना उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आलंय. या दरोड्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली. पोलीस दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
25 Dec 2023, 12:15 वाजता
पेटीएममध्ये मोठी नोकर कपात
PayTM Job Cutting : पेटीएमने पुन्हा एकदा नोकरकपातीचा निर्णय घेतलाय. पेटीएमने एकूण कर्मचा-यांपैकी 10 टक्के कर्मचा-यांना नारळ दिलाय.. Paytm ची मूळ कंपनी One97 Communications ने यावेळी एक हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलंय. 2023 हे वर्ष स्टार्टअप कंपन्यांसाठी चांगलं वर्ष ठरलेलं दिसत नाहीए... यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय स्टार्ट अप्सनी पहिल्या तीन महिन्यांमध्ये 28 हजारांहून अधिक कर्मचा-यांना कामावरुन काढून टाकलंय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -