25 Dec 2023, 08:42 वाजता
जेवण दिले नाही म्हणून पतीकडून पत्नीची हत्या
Pune Crime : पुण्यात जेवण दिलं नाही म्हणून निर्दयी पतीने आपल्या पत्नीची हत्या केलीय.. दारुड्या पतीने पत्नीच्या छातीत बुक्क्या मारून तीला जीवे मारलं... कात्रजमधल्या या घटनेनं एकच खळबळ उडालीय.. तानाजी कांबळे या निर्दयी पतीला पोलिसांनी अटक केलीय. तानाजी हा व्यवसायाने पेंटर असून रोजंदारीवर काम करतो. नेहमीप्रमाण मद्यपान करुन आलेल्या तानाजीने आपली पत्नी माधुरीला जेवण वाढायला सांगितलं. मात्र जेवण न दिल्याच्या रागातून तानाजीने पत्नीच्या छातीवर जोरजोरात बुक्क्या मारल्या.. यात तीचा मृत्यू झाला..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
25 Dec 2023, 08:38 वाजता
नवीन वर्षात राज्यावर पाणीटंचाईचे संकट
Maharashtra Water Shortage : नवीन वर्षात राज्यावर भीषण पाणीटंचाईचं संकट निर्माण होण्याची शक्यताय. राज्यातील धरणांमध्ये केवळ 63% पाणीसाठा शिल्लक राहिलाय. गेल्यावर्षीच्या तुलनेत धरणांच्या पाणीसाठ्यात 20 टक्क्क्यांनी घट झालीये. यात मराठवाड्यातील धरणांमध्ये सर्वात कमी पाणी शिल्लक आहे. पाणीटंचाईमुळे 389 टँकरनं 961 वाड्यांना तर 366 गावांना पाणीपुरवठा केला जातोय. या आकडेवारीत दिवसागणिक भर पडतेय. वेगानं घटत असलेल्या पाणीसाठ्यामुळे नववर्षात राज्यातील नागरिकांसमोर पाणीकपातीचं संकट उभे ठाकलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
25 Dec 2023, 08:12 वाजता
फुगे फुगवणाऱ्या सिलेंडरचा स्फोट, 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
Nagpur Balloon Gas Cylinder Blast : नागपुरात फुगे फुगवण्यासाठी वापरण्यात येणा-या सिलेंडरचा स्फोट झालाय...या स्फोटात 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय...तर 2 महिला जखमी झाल्यायत...नागपुरातील बिशप ग्राऊंड लगतच्या रोडवर ही घटना घडलीय...फुगे फुगवणाऱ्या सिलेंडरचा स्फोट झाल्याने सिलेंडर हवेत उडाला...हा स्फोट भीषण असल्याने 4 वर्षांच्या सिझन शेखचा जागीच मृत्यू झाला...तर फारिया शेख, अनमता शेख या दोघी जखमी झाल्यायत...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
25 Dec 2023, 07:52 वाजता
प्रभू श्रीराम तुमची प्रॉपर्टी आहे का? - उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपवर हल्लाबोल केलाय. प्रभू श्रीराम तुमची प्रॉपर्टी आहे का? असा थेट सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलाय. ते मीरा भाईंदरमधल्या गोवर्धन पूजा समारोह सोहळ्यात बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्रात आमचं सरकार येणार आणि आणणारच, असा निर्धारही व्यक्त केलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
25 Dec 2023, 07:50 वाजता
गुगलमध्ये पुन्हा एकदा नोकरकपातीचं संकट
Google Job Cutting : गुगलच्या कर्मचा-यांवर पुन्हा एकदा नोकर कपातीची टांगती तलवार आहे... कंपनीने यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीलाच 12 हजार कर्मचा-यांना नारळ दिला होता.. आता गुगल जाहिरात विभागाची पुनर्रचना करणार आहे.. गुगलच्या जाहिरात विभागामध्ये 30 हजार कर्मचारी काम करतात. मात्र पुनर्रचना करताना कंपनी आपल्याला नारळ देऊ शकते अशी चर्चा कर्मचा-यांमध्ये आहे.. त्यामुळे नोकरी जाण्याची भीती गुगलच्या कर्मचा-यांना वाटतेय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -