Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

27 Mar 2024, 22:31 वाजता

पुणे भाजपात नाराजीचं ग्रहण

 

Pune BJP : माढा आणि अमरावतीपाठोपाठ आता पुण्यातही भाजपचा उमेदवार बदलण्याची मागणी जोर धरू लागलीय. पुणे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केलीय. काकडे यांनी थेट फेसबूकवर पोस्ट लिहून
आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. काकडे नाराज असल्यामुळेच सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी पुण्यात त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत आपल्या वेदना आणि पुणे लोकसभेचं वास्तव चव्हाणांसमोर मांडल्याचं काकडेंनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलंय. पक्षातील वरिष्ठ नेत्यांपर्यंत आपल्या भावना पोहचवण्याचं आश्वासन चव्हाणांनी दिल्याचं काकडेंनी सांगितलं. त्यामुळे पुण्यातला उमेदवार बदलणार की मोहोळच कायम 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

27 Mar 2024, 20:33 वाजता

शरद पवार गटाकडून भाजपची पोलखोल

 

Sharad Pawar Group on BJP : शरद पवार गटानं एक ट्विट करत भाजपची पोलखोल केलीय. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं प्रचारावेळी अजित पवारांवर 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप केले होते. त्यावेळी ज्या जाहिराती करण्यात आल्या त्याच जाहिरातींमधील आजोबांना सोबत घेऊन पुन्हा पक्षाचा प्रचार केला जातोय . मात्र 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यावर मौन बाळगण्यात आलंय. जनता चांगलच ओळखून आहे असं ट्वटि पवार गटानं केलंय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

27 Mar 2024, 19:06 वाजता

अमरावतीमधून खासदार नवनीत राणांना भाजपची उमेदवारी

 

Navneet Rana : अखेर अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपनं विद्यमान खासदार नवनीत राणांना उमेदवारी दिलीय... आगामी लोकसभा निवडणूक नवनीत राणा कमळ चिन्हावर लढणार आहेत... भाजपनं आज जाहीर केलेल्या उमेदवार यादीत नवनीत राणांचं नाव आहे. त्यामुळं अमरावतीमधील उमेदवाराबाबतचा सस्पेन्स संपलाय... मात्र महायुतीतला तिढा कायम आहे... शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ, अभिजीत अडसूळ आणि प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी राणांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला होता. राणांना उमेदवारी दिल्यास प्रचार करणार नाही, असं बच्चू कडूंनी स्पष्ट केलं होतं... त्यांची नाराजी भाजपश्रेष्ठी कशी दूर करणार, याकडं आता सगळ्यांचं लक्ष लागलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

27 Mar 2024, 18:09 वाजता

डॉक्टरांना निवडणूक कामात जुंपलं जाणार

 

Election Duity to Doctors : मुंबईत इतिहासात पहिल्यांदाच डॉक्टरांना इलेक्शन ड्युटी लावण्यात आलीय. मुंबई महापालिका रूग्णालयातील तब्बल 500 डॉक्टरांना ही इलेक्शन ड्युटी लावण्यात आलीय. यात केईएम, सायन, नायर, कुपर आणि नायर डेंटल रूग्णालयातील डॉक्टरांचा समावेश आहे. नर्सेसपासून डीनपर्यंत सर्वांनाच निवडणूक कामात जुंपलं जाणारंय. पालिका रूग्णालयांतील सुमारे 80 टक्के स्टाफ इलेक्शन ड्युटीवर जाणारंय. या तुघलकी निर्णयामुळे पालिका रूग्णालयातील आरोग्य सेवा ठप्प पडण्याची भीती व्यक्त होतीय. खरं तर डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचा-यांना निवडणुकीच्या कामातून सूट देण्यात आलीय असं असतानाही निवडणूक आयोगानं डॉक्टरांना निवडणूक डयुटीवर हजर राहण्याचे दिले आदेश दिले आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्था ठप्प झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल उपस्थित होतोय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

27 Mar 2024, 17:53 वाजता

सांगलीवरून मविआत वाद विकोलापाला

 

Sangli Loksabha : सांगलीच्या जागेवरून मविआतला वाद विकोपाला गेलाय. सांगलीची जागा ठाकरे गटानं जाहीर केली असून मविआनं जाहीर केलेली नाही असा टोला काँग्रेस आमदार विश्वजीत कदमांनी लगावलाय. यासंदर्भात कदमांनी थेट दिल्लीत धाव घेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन चर्चा केली. याबाबत राज्यातील नेते चर्चा करतील असं आश्वासन खर्गेंनी दिल्याचं त्यांनी सांगितलं. कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असं ठरलं नव्हतं असं प्रत्युत्तरही कदमांनी संजय राऊतांना दिलं. तर सांगलीची निवडणूक लढवणारच असा निर्धार काँग्रेसचे इच्छुक विशाल पाटील यांनी केलाय. 
 

27 Mar 2024, 16:15 वाजता

यवतमाळमधून​ इंद्रनील नाईकांच्या पत्नीला तिकीट?

 

Mohini Naik : यवतमाळ - वाशिम मतदारसंघात शिवसेनेकडून राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या पत्नीच्या नावाची चाचपणी...यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडे आहे...याठिकाणी संजय राठोड यांच्या नावाची चर्चा आहे मात्र ते इच्छूक नसल्याचे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळवले आहे...या मतदारसंघात बंजारा मतदारांचे प्राबल्य असल्याने बंजारा उमेदवाराची चाचपणी सुरु होती....अशातच मित्रपक्षातील मोहिनी नाईक यांच्या नावाची चाचपणी करण्यात आलीय...मात्र त्यांना मोहिनी नाईक यांना धनुष्यबाण चिन्हावर लढावे लागेल...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

27 Mar 2024, 15:28 वाजता

अमोल कीर्तीकरांना ईडीचं समन्स

 

Amol Kirtikar : अमोल कीर्तीकरांना उत्तर पश्चिम मुंबईतून ठाकरे गटाची उमेदवारी जाहीर होताच कीर्तीकरांना ईडीनं समन्स बजावलंय. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर तातडीनं बैठक घेतली. `स्वत:ला अमोल किर्तीकर समजून कामाला लागा´ असे आदेश उद्धव ठाकरेंनी पदाधिका-यांना दिलेत. तर भाजपनं खालच्या पातळीवरचं राजकारण केलं असून उमेदवारी जाहीर झाल्यामुळेच ईडीनं कारवाई केल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

27 Mar 2024, 13:35 वाजता

सांगलीत काँग्रेस निवडणूक लढवणार-सूत्र

 

Sangli Loksabha Constituency : उद्धव ठाकरे गटाच्या विरोधात काँग्रेस निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. उद्धव ठाकरेंनी परस्पर चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यानं आघाडीमध्ये नाराजी आहे. त्यामुळे ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात काँग्रेसच्या विशाल पाटलांना निवडणुकीत उतरवण्याची तयारी काँग्रेस करत असल्याची सूत्रांची माहिती आहे. काँग्रेसचं शिष्टमंडळ आमदार विश्वजीत कदम, विक्रम सावंत, विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटलांनी दिल्लीत खरगे आणि केसी वेणूगोपाल यांची भेट घेतली. संध्याकाळी ते सोनिया गांधींची भेट घेणार आहेत...  शिवसेना ठाकरे पक्षानं आघाडीच्या जागावाटपाला गालबोट लावलं, असा थेट घणाघात विजय वडेट्टीवारांनी केलाय. तर सांगलीत तिढा नाही, असं संजय राऊतांचं म्हणणं आहे. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 Mar 2024, 13:07 वाजता

कमळ चिन्हावर लढण्यास सामंतांचा नकार - सूत्र

 

Kiran Samant : रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या चिन्हावर लढण्यास शिवसेनेच्या किरण सामंत यांनी नकार दिलाय. हा मतदारसंघ शिवसेनेसाठी अनुकूल आहे, त्यामुळे कोकणात धनुष्यबाण चिन्हावर लढणंच अधिक सोयीस्कर असल्याचा दावा सामंत यांनी केलाय.. भाजपने किरण सामंत यांना भाजपच्या चिन्हावर लढण्याची ऑफर दिली होती अशी माहिती आहे.. किरण सामंत हे रत्नागिरी सिंधुदूर्गमधून इच्छुक आहेत, ते उदय सामंत यांचे भाऊ आहेत.. हा मतदारसंघ मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटात रस्सीखेच आहे.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 Mar 2024, 12:44 वाजता

प्रकाश आंबेडकरांकडून मविआला सोडचिठ्ठी

 

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांनी मविआशी फारकत घेत तिस-या आघाडीची घोषणा केलीय.. वंचित बहुजन आघाडीच्या 8 उमेदवारांची यादी आंबेडकरांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली. आंबेडकरांनी नागपूरमधून काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय तर अकोल्यातून स्वत: लढण्याची घोषणा केलीय.. प्रकाश शेंडगेंच्या ओबीसी बहुजन पक्षानं सांगलीतून उमेदवार उभा केल्यास त्यांना पाठिंबा देण्याची घोषणाही आंबेडकरांनी केलीय.. मनोज जरांगेंशी आघाडीबाबत चर्चा झाली असून 30 तारखेला जरांगे आपला निर्णय जाहीर करणार आहेत, असंही आंबेडकरांनी सांगितलंय.. मंगळवारी रात्री प्रकाश आंबेडकरांनी अंतरवाली-सराटीत जाऊन जरांगेंची भेट घेतली आणि त्यानंतर वंचित आघाडीत घडामोडींना वेग आला. मविआशी आंबेडकरांनी फारकत घेतल्याचं आता पूर्णपणे स्पष्ट झालंय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -