Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

27 Mar 2024, 11:54 वाजता

सांगली जागेवरुन मविआत तिढा नाही-राऊत

 

Sanjay Raut : दरम्यान सांगलीच्या जागेवरुन महाविकास आघाडीत कुठलाही तिढा नसल्याची प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिलीये. काँग्रेसच्या यादीनंतर आम्ही आक्षेप घेतला नव्हता. कोल्हापूरची जागाही काँग्रेसला दिली होती. त्यामुळे सांगलीच्या जागेचा आग्रह धरल्याचा दावा राऊतांनी केलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 Mar 2024, 11:51 वाजता

हातकणंगलेत भाजपच्या शौमिका महाडिकांचं नाव आघाडीवर?

 

Hatkanangale Loksabha Constituency : हातकणंगले शिंदे गटाचे विद्यमान खासदार धैर्यशील मानेंचं नाव कापलं जाण्याची शक्यताय. लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या शौमिका महाडिक यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. तर कोल्हापुरात संजय मंडलिकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हिरवा कंदील दिल्याचं समजतंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 Mar 2024, 10:52 वाजता

सुनेत्रा पवारांकडून टीकेला उत्तर

 

Sunetra Pawar : राष्ट्रवादी फुटीनंतर अजित पवारांवर होणा-या टीकेला सुनेत्रा पवारांनी उत्तर दिलंय.. एखाद्या गोष्टीचा कडेलोट होतो..तेव्हाच माणसं वेगळा विचार करतात.. दादांनी व्यक्तिस्वातंत्र्य वापरलं असेल तर त्यात चूक काय.. असं विधान सुनेत्रा पवारांनी केलंय.. तर सुप्रिया सुळेंनाही त्यांनी टोला लगावला.. 15 वर्षात तुमच्या आमदार, खासदारांनी केलेल्या कामांचा लेखा-जोख तुमच्यासमोर आहे असा टोला त्यांनी सुप्रिया सुळेंना लगावला.. भोर तालुक्यातल्या न्हावी गावात सुनेत्रा पवारांनी दादांची पाठराखण करताना हे वक्तव्य केलंय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 Mar 2024, 10:15 वाजता

सोलापूर लोकसभा मतदारसंघात वातावरण तापलं

 

Solapur Ram Satpute : सोलापूर लोकसभा मतदारसंघात वातावरण चांगलंच तापलंय. राम सातपुते आणि प्रणिती शिंदेंमध्ये इथं लढत होतेय. दोन्ही नेते एकमेकांवर जोरदार टीका करतायत. माझ्या सगळ्या प्रॉपर्टीचा हिशोब देतो, सुशीलकुमार शिंदेंनीही त्यांच्या प्रॉपर्टीचा हिशोब द्यावा असं आवाहन सातपुतेंनी दिलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 Mar 2024, 09:41 वाजता

ठाकरे गटाकडून 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर

 

Thackeray Camp Loksabha Election Candidate List : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर झालीय. मुंबईतल्या 4 जागा ठाकरे पक्षाकडून जाहीर करण्यात आल्यात.. छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे तर सांगलीतून चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर झालीय. त्यामुळे सांगलीत काँग्रेस काय भूमिका घेते याकडे लक्ष लागलंय. 

बातमी पाहा - ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर! मुंबईतील 4 जागांसहीत 17 जागांवरील उमेदवारांची घोषणा

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 Mar 2024, 09:38 वाजता

अमोल किर्तीकर यांना ईडीचं समन्स

 

Amol Kirtikar : ठाकरे गटाचे उत्तर पश्चिम मुंबईतील संभाव्य उमेदवार अमोल किर्तीकरांच्या अडचणी वाढल्यायत. खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीनं त्यांना समन्स बजावलंय. आजच चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीनं दिलेत. अमोल किर्तीकर हे ठाकरे गटाचे उत्तर पश्चिममधून लोकसभेचे संभाव्य उमेदवार आहेत. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 Mar 2024, 08:36 वाजता

प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगेंची भेट

 

Prakash Ambedkar & Manoj Jarange : वंचित बहुजन आघडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची भेट घेतलीय. अंतरवाली सराटीमध्ये रात्री या दोन्ही नेत्यांची भेट झाली.. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये लोकसभा निवडणुकी बाबत चर्चा झाली... ही चर्चा सकारात्मक असल्याची माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिलीये.. या भेटीत काय चर्चा झाली याबाबत 30 मार्चला बोलणार असल्याचं यावेळी जरांगेंनी सांगीतलं.. दरम्यान या दोन्ही नेत्यांच्या भेटीनं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीये.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 Mar 2024, 07:43 वाजता

नितीन गडकरी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

 

Nagpur Nitin Gadkari : नागपूर लोकसभेचे भाजप उमेदवार नितीन गडकरी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. नितीन गडकरींसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित असतील. सकाळी 11 वाजता शक्तिप्रदर्शन करत भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 Mar 2024, 07:32 वाजता

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आज बैठक

 

Sharad Pawar Meeting : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आज मुंबईत बैठक बोलावण्यात आलीये... मुंबईतील बलार्ड इस्टेट इथं या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय... शरद पवारांच्या अध्यक्षतेत ही बैठक होणार असून या बैठकीत लोकसभा उमेदवारांच्या नावांवर अंतिम चर्चा होणार आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 Mar 2024, 07:28 वाजता

मनसेची 'शिवतीर्थ'वर महत्त्वाची बैठक

 

Mumbai MNS Meeting : आज सकाळी नऊ वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या दादरच्या निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आलीय. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित केलीय. मनसेच्या महायुतीतला सहभाग आणि मनसेला देण्यात येणाऱ्या जागांबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत राज ठाकरे यांची बैठक होऊन आठवडा उलटलाय. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबती बैठक होऊन अनेक दिवस उलटले आहेत. मात्र अद्यापही मनसेच्या महायुतीतील सहभागाबद्दल आणि जागांबद्दल ठोस निर्णय झालेला नाही...त्यामुळे आजची बैठक महत्त्वाची मानली जातेय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -