BJP deletes 'Me Punha Yein' Post : भाजपच्या X हॅण्डलवरील पोस्टमुळे चर्चा, 2 तासांनंतर ट्विट डिलीट

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

BJP deletes 'Me Punha Yein' Post : भाजपच्या X हॅण्डलवरील पोस्टमुळे चर्चा, 2 तासांनंतर ट्विट डिलीट

27 Oct 2023, 23:35 वाजता

भाजपकडून 2 तासांनंतर फडणवीसांसंबंधीचं ट्विट डिलीट

 

BJP deletes 'Me Punha Yein' Post : देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री होणार? भाजपच्या X हॅण्डलवरील पोस्टमुळे जोरदार चर्चा... 'महाराष्ट्र नवनिर्मितीसाठी पुन्हा येणार'ची पोस्ट. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती?
तर दुसरीकडे महाराष्ट्र भाजपनं तब्बल दोन तासांनंतर फडणवीसांचा हा व्हिडिओ डिलीट केला. हा व्हिडिओ केवळ भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्यासाठी हा व्हिडिओ होता आणि तो केवळ सोशल मीडियापुरता मर्यादित होता असा खुलासा भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंनी केला. 

बातमीचा व्हिडिओ पाहा -

 

27 Oct 2023, 23:15 वाजता

कर्तव्यात कसूर केल्याने 5 पोलिसांवर कारवाई

 

Police Suspended in Parbhani : जुगार खेळणाऱ्या 5 पोलिसांना निलंबित करण्यात आलंय. कर्तव्यात कसूर केल्याने ही कारवाई त्यांच्यावर करण्यात आलीये. एसपी ऑफिसच्या परिसरातील एका विश्रामगृहात 7 पोलीस जुगार खेळत होते त्यानंतर पोलीस अधिक्षिका रागसुधा आर यांनी निलंबनाचे आदेश काढलेत. महामार्ग पोलीस आणि एसीबी कर्मचाऱ्यांचाही यात समावेश आहे.

27 Oct 2023, 20:51 वाजता

शिंदे समितीविरोधात मराठा आंदोलकांच्या गो बॅकच्या घोषणा

 

Dharashiv Maratha Agitation : धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांनी शिंदे समितीची गाडी अडवली. निवृत्त न्यायमूर्ती शशिकांत शिंदे आणि समितीचे इतर सदस्य धाराशिवमध्ये जात असताना त्यांची गाडी अडवून त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. मराठा आंदोलकांनी गो बॅकच्या घोषणाही यावेळी दिल्या. शिंदे यांची समिती कुणबी दाखले देण्यासंदर्भात योग्य कागदपत्रांचं मराठवाड्यात संशोधन करत आहे. त्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांचे दौरे ही समिती करत आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

27 Oct 2023, 18:35 वाजता

ईडीची केस रद्द करण्याची याचिका कोर्टानं फेटाळली

 

PMLA Court on Bhujbal : मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना PMLA कोर्टानं दणका दिलाय. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकऱणी ईडीनं दाखल केलेली याचिका रद्द करण्याची मागणी कोर्टानं फेटाळलीय. त्यामुळे भुजबळ काका-पुतण्यांच्या अडचणी कायम राहणार आहेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

27 Oct 2023, 18:07 वाजता

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंसमोर मराठा आंदोलक आक्रमक

 

Ambadas Danve Black Flag : पिंपरी-चिंचवडमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना दाखवले काळे झेंडे.. अंबादास दानवेंच्यासमोर मराठा आंदोलक आक्रमक.. दानवे वाय.सी.एम रुग्णालयात पाहणी करण्यासाठी आले असताना मराठा संघटनाच्या कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

27 Oct 2023, 16:34 वाजता

अजित पवारांच्या बारामती दौऱ्याला सकल मराठा समाजाचा विरोध

 

Village ban on Ajit Pawar : मराठा आरक्षणाची झळ उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही बसलीय. अजित पवारांना बारामतीतच गावबंदी करण्यात आलीय. यावर तोडगा काढण्यासाठी सलक मराठा संघटनेसोबत माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि पोलीस प्रशासनानं बैठक घेतली. मात्र ही बैठक निष्फळ ठरली असून मराठा आंदोलक अजित पवारांना गळीत हंगामाच्या शुभारंभासाठी मोळी टाकू न देण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. अजित पवार बारामतीत आल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशाराही आंदोलकांनी दिलाय. त्यामुळे आता अजित पवार काय भूमिका घेतात याकडे लक्ष आहे. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

27 Oct 2023, 14:33 वाजता

ललित पाटीलला 30 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

 

Lalit Patil : ललित पाटील 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय. सोमवार पर्यंत ललित पाटील,सचिन वाघ,हरीश पंत यांना पोलीस कोठडी सुनावलीय. तर या प्रकरणातल्या १८ व्या आरोपीला साकीनाका पोलिसांनी नाशिकमधून केली अटक. हरीश पंत असं त्याचं नाव... हरीशच्या मदतीनं ललितनं कारखाना उभा केल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. नाशिकमधून १२ किलो एमडी ड्रग्ज जप्त केलंय. सचिन वाघनं हे एमडी ड्रग्ज लपवलेलं. आणखी ड्रग्जलपवलेलं असण्याची शक्यता आहे. पोलीस शोध घेतायत. त्यासाठीच कोठडीची मागणी पोलिसांनी केलीय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 Oct 2023, 14:31 वाजता

मराठा आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा-जरांगे-पाटील

 

Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केलीय.. सत्ताधारी तसंच विरोधकांनाही त्यांना विशेष अधिवेशन बोलवण्याबाबत आवाहन केलंय. मराठा आरक्षण देण्यासाठी यात कायदा मंजूर करण्याची मागणी जरांगेंनी केलीय.. नाहीतर 29 ऑक्टोबरला बैठक बोलावून आंदोलनाची दिशा ठरवावी लागेल असा इशारा जरांगेंनी दिलाय..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 Oct 2023, 13:57 वाजता

रायगडमध्ये मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी

 

Raigad Dog Attack : रायगडमध्ये 5 ते 6 मोकाट कुत्र्यांनी शाळकरी मुलाचे लचके तोडलेत. समर प्रभाकर असं या मुलाचं नाव आहे. समर दुपारच्या सुट्टीत शाळेतून घरी येत असताना मोकाट कुत्र्यांनी त्याच्या अंगावर झडप घातली. तो पळत असताना कुत्र्यांनी पाठलाग करत त्याला पकडलं आणि अक्षरश: त्याच्या शरीराचे लचके तोडले. यात तो गंभीर जखमी झालाय. त्याला तातडीनं मुंबईच्या जेजे रुग्णालयात हलवण्यात आलंय. या घटनेनंतर भटत्या कुत्र्यांचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी पालकांनी केलीय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 Oct 2023, 13:43 वाजता

ललित पाटीलवर ससूनच्या डीनकडून उपचार?

 

Pune Lalit Patil : ड्रग्जमाफिया ललित पाटीलसंदर्भात सर्वात मोठा खुलासा झी २४ तासच्या हाती लागलाय... ससून रुग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांच्याच शिफारशीवरुन ललित पाटील ससूनमध्ये मुक्काम ठोकून होता अशी माहिती समोर येतेय.. ससूनमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या आरोपींचं रजिस्टरही झी २४ तासच्या हाती लागलंय. या रजिस्टरनुसार ललित पाटीलवर हर्नियाच्या आजारासाठी उपचार करण्यात येत होते. तर ललितवर उपचार करणा-या डॉक्टरबाबतही मोठा खुलासा समोर आलाय. रजिस्टरच्या नोंदीनुसार ललित पाटीलवर डॉ. एस.एस.टी. यांचे उपचार सुरु होते. हे डॉक्टर दुसरे तिसरे कोणी नसून ससूनचे डीन डॉ. संजीव शामराव ठाकूर हेच असल्याचा आरोप करण्यात आलाय. मात्र ठाकूर यांनी गोपनीयतेच्या नावाखाली यावर काहीही माहिती देण्यास नकार दिलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा -