27 Oct 2023, 08:19 वाजता
वाधवान बंदूंची 70 कोटींची मालमत्ता जप्त
Wadhawan Property Seized : डीएचएफएल घोटाळाप्रकरणी कपिल आणि धीरज वाधवान या दोघांची ७० कोटी ४० लाख रुपयांची मालमत्ता ईडीनं जप्त केलीये.. रात्री उशीरा ईडीनं ही कारवाई केलीये. जप्त केलेल्या मालमत्तेत वांद्रे येथील दोन फ्लॅट्स, महागडी पेंटिंग्ज, पाच कोटी रुपयांची आलिशान घड्याळे, 10 कोटी 71 लाख रुपयांचे दागिने यांचाही समावेश आहे. युनियन बँकप्रणीत 17 बँकांकडून घेतलेल्या हजारो कोटी रुपयांच्या कर्जाचा तपास ईडी करत आहे. घोटाळ्याची ही रक्कम 42 हजार कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे समजते. यापैकी 34 हजार कोटी रुपयांचा घोटाळा वाधवान बंधूंनी केलाय...दरम्यान वाधवान बंधू सध्या कोठडीत आहेत
बातमीचा व्हिडीओ पाहा -
27 Oct 2023, 08:15 वाजता
कुणबी प्रमाणपत्र समितीला मुदतवाढ-सूत्र
Kunbi Committee Extension : कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात नेमण्यात आलेल्या समितीला 24 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.. निजामकालीन नोंदी आणि कागदपत्रांच्या तपासणीसाठी समिती तेलंगणामध्ये जाणार आहे. मात्र तेलंगणात विधानसभा निवडणुका असल्याने तिथले महसूल अधिकारी सध्या व्यस्त आहेत.. तेव्हा कागदपत्र मिळण्यासाठी डिसेंबरचा पहिला आठवडा लागू शकतो. तेव्हा ही कागदपत्रं लवकर मिळण्यासाठी राज्य सरकारने तेलंगणा सरकारसोबतही पत्रव्यवहारही केलाय. जरांगे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. तेव्हा समितीला तातडीने कागदपत्र पुरवण्याची मागणी पत्रातून करण्यात आलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -