27 Oct 2023, 12:49 वाजता
मराठा समाजाविरोधात सरकारचं षडयंत्र, जरांगेंचा आरोप
Manoj Jarange Patil : मराठ्यांविरोधात राज्य सरकार षडयंत्र रचत असल्याचा सर्वात मोठा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय.. मनोज जरांगे पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच आरोपीच्या पिंज-यात उभं केलंय.. त्यासोबतच कुणबी प्रमाणपत्रासाठी असलेल्या शिंदे समितीवरही जरांगेंनी सवाल उपस्थित केलीय.. कुणबी प्रमाणपत्र समितीच आम्हाला नको अशी मोठी मागणी त्यांनी केलीय.. आता मराठा समाज सरकारला झोपू देणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतून दिलाय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
27 Oct 2023, 11:48 वाजता
जयंत पाटील यांची 'ती' गोष्ट काय?
Kolhapur Hasan Mushrif : जयंत पाटील फक्त एका गोष्टीमुळे अजित पवारांसोबत आले नाहीत.. नाहीतर त्यांनी आमच्यासोबत शपथ घेतली असती.. असा मोठा दावा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलाय.. जयंत पाटील यांच्याबाबतची ती गोष्ट वेळ आल्यावर स्पष्ट करणार असल्याचंही मुश्रीफ यांनी म्हटलंय. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर जयंत पाटील हे शरद पवारांसोबतच राहिले. मात्र ते सोबत येणार असल्याचा दावा अजित पवार गटाने नेहमीच केला.. तेव्हा हसन मुश्रीफांनी उल्लेख केलेली ती गोष्ट कोणती यावर आता राजकीय चर्चा रंगतायत..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
27 Oct 2023, 11:45 वाजता
मनोज जरांगेंना काही झाल्यास सरकारच जबाबदार, जरांगेंच्या कुटुंबाचा इशारा
Manoj Jarange Patil Family : अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. जरांगे पाटलांच्या जीवाला धोका पोहचल्यास त्याला सरकारच जबाबदार राहील असा इशारा जरांगे पाटलांच्या वडिलांसह पत्नी आणि मुलीनं दिलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
27 Oct 2023, 11:43 वाजता
कुणबीचे 10 हजार पुरावे - सूत्र
Maratha Reservation : कुणबी प्रमाणपत्रासाठीच्या शिंदे समितीला मराठवाड्यात आतापर्यंत 10 हजारांपेक्षा जास्त पुरावे सापडले असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय... पहिल्या टप्प्यात 1 कोटी 40 लाख कागदपत्रांमधून 5 हजारांवर पुरावे सापडले होते. तर दुस-या टप्प्यात सव्वा कोटी कागदपत्रांतून साडे पाच हजारांवर पुरावे सापडल्याची सूत्रांची माहिती आहे.. खासरापत्रक, शाळेचा निर्गम उतारा तसंच शेतीच्या नमुना 33 मध्ये मोडी भाषेत असलेले कुणबी नोंदींचे पुरावे आढळले आहेत. समिती अंतिम पुराव्यांची शहानिशा करुन आपला अहवाल सरकारला सादर करेल..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
27 Oct 2023, 10:54 वाजता
मुंबईतल्या प्रदूषणाची केंद्र सरकारकडून दखल
Central Government On Mumbai Pollution : मुंबईतल्या प्रदूषणाच्या गंभीर समस्येची केंद्र सरकारनेही दखल घेतलीय.. प्रदूषण रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या याची माहिती केंद्राने राज्य सरकारकडे मागवलीय.. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला त्यासाठीचा अॅक्शन रिपोर्ट केंद्राला सादर करावा लागणार आहे.. दक्षिण मुंबईत आणि बीकेसीमध्ये कच-याची विल्हेवाट लावण्यापेक्षा तो जाळण्यावर भर दिला जातो.. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात धुळ असल्याचं केंद्राने म्हटलंय. विशेषत कोस्टल रोड आणि मोठ्या इमारतींच्या बांधकाम साईट्सवर धुळ जास्त असल्याचं केंद्राने पाठवलेल्या पत्रात म्हटलंय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
27 Oct 2023, 10:51 वाजता
राष्ट्रवादी नेत्यांच्या कारखान्याच्या कर्जाला सरकारची हमी
Ajit Pawar : भाजपनंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या कारखान्याच्या कर्जासाठीही राज्य सरकार हमी देणार आहे.. राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांच्या कारखान्याच्या 631 कोटी रुपयांच्या कर्जाला राज्य सरकार तारण राहणार आहे.. अजित पवारांच्या निकटवर्तीयाच्या कारखान्याचा यात समावेश आहे.. त्याचसोबत कल्याण काळे, अमरसिंह पंडित यांच्यासह काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कारखान्यांच्या कर्जाचीही राज्य सरकार हमी घेणार आहे...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
27 Oct 2023, 10:11 वाजता
पुण्यात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद
Pune Stray Dog : पुणेकरांनो भटक्या कुत्र्यांपासून सावधान रहा... कारण गेल्या 9 महिन्यांत पुणे शहरात कुत्र्यांनी 14 हजारपेक्षा जास्त नागरिकांचा चावा घेतलाय. पुणे शहरात दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांचा हैदोस वाढलाय. रस्त्याने चालताना अचानक भटक्या कुत्र्यांकडून हल्ला करत चावा घेण्याच्या घटना वाढल्यायत.. पुणे जिल्ह्याच्या हद्दीत 52 जणांचा रेबीजने मृत्यू झालाय.. तेव्हा मुंबईच्या धर्तीवर पुणे महापालिकाही कुत्र्यांसाठी विशेष मोहीम राबवणार आहे.. भटक्या कुत्र्यांना पुणे महापालिका रेबीजची लस देणार आहे..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
27 Oct 2023, 09:48 वाजता
भाजप खासदाराविरोधात मराठा समाजाचा रोष
Nanded Pratap Patil Chikhalikar : नांदेडमध्ये मराठा समाजाने भाजप खासदाराच्या ताफ्यातला गाड्या फोडल्यायत.. आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झालाय. नेत्यांना गावबंदी करण्यात आलीय. मात्र तरीही गावात प्रवेश केल्याने भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकरांना मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागला. चिखलीकरांच्या ताफ्यातल्या दोन गाड्या फोडण्यात आल्या... कंधार तालुक्यातील अंबुलगा गावात काल रात्री ही घटना घडली. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोहर तेलंग याच्या भेटीसाठी खासदार प्रताप पाटील चिखलीकर रात्री अंबुलगा गावात गेले होते. तेव्हा हा प्रकार घडला
बातमीचा व्हिडीओ पाहा -
27 Oct 2023, 09:24 वाजता
टिटवाळा-कसारादरम्यान उद्या रात्री मेगाब्लॉक
Central Railway Midnight Megablock : मध्य रेल्वेच्या टिटवाळा-कसारा स्थानकांदरम्यान उद्या रात्री 12.30 पासून पहाटे 5.30 वाजेपर्यंत पाच तासांचा ब्लॉक घेण्यात येणारेय. यामुळे अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात येणारेय. तर 16 मेल-एक्स्प्रेच्या वेळापत्रकात बदल होणारेय. तीन पुलांच्या गर्डर उभारणीच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येतोय. यामुळे मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडणार आहे.. HOLD FOR GFX पाहुयात ब्लॉक दरम्यान कोणत्या ट्रेन रद्द होणार आहेत..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
27 Oct 2023, 08:32 वाजता
ललित पाटीलचं मराठवाड्यात ड्रग्जचं नेटवर्क
Lalit Patil : ड्रग्जमाफिया ललित पाटीलचं मराठवाड्यातही नेटवर्क असल्याचं पुणे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालंय.. ललित आणि त्याचा भाऊ कोकेन निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल मराठवाड्यातून घेत होता. यात विनाबिलाची औषधं तसंच विविध केमिकल्सचाही समावेश होता.. नाशिकप्रमाणेच छत्रपती संभाजीनगर शहरातही ललितचं स्वतंत्र नेटवर्क होतं. ससूनमधून 2 ऑक्टोबरला पळून गेल्यानंतर तो नाशिक, धुळे मार्गे छत्रपती संभाजीनगरवरुन कर्नाटकमध्ये गेला होता.. ललित पाटीलप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुरुवारी 17 व्या आरोपीला बेड्या ठोकल्या. ललितचा साथीदार अमीर अतिक शेखला अटक करण्यात आलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -