Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

28 Oct 2023, 22:18 वाजता

कांदा रोखण्याचं केंद्र सरकारचं मोठं पाऊल

 

Onion Export : सणासुदीच्या काळात कांदा दरवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारनं मोठं पाऊल उचललंय. प्रती मेट्रिक टनामागे 800 डॉलर निर्यात शुल्क लागू करण्यात आलंय. 31 डिसेंबरपर्यंत कांदा निर्यातीवर मिनिमम एक्स्पोर्ट प्राईस अर्थात MEP लागू असेल. उत्पादनात घट झाल्यानं कांदा महागलाय. त्यामुळे कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर प्रति मेट्रीक टनामागे 800 डॉलर निर्यातशुल्क लागू केलंय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

28 Oct 2023, 22:04 वाजता

चंद्रशेखर बावनकुळेंना दाखवले काळे झेंडे

 

Kalyan Chandrashekar Bawankule : कल्याणमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना मराठा समाजाकडून काळे झेंडे दाखवण्यात आले... कल्याणमधील जनतेशी बावनकुळे संवाद साधत असताना मराठा आंदोलकांनी गोंधळ घालायला सुरूवात केली... काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. गो बॅक बावनकुळे आणि एक मराठा लाख मराठाच्या जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या... पोलिसांनी तातडीनं हस्तक्षेप करून मराठा आंदोलकांना ताब्यात घेतलं.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

28 Oct 2023, 20:55 वाजता

उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात

 

Mumbai Uddhav Thackeray : महाराष्ट्रात भाजपला रोखण्याची ताकद केवळ शिवसेनेतच आहे. दुस-या कुणाचीही हिंमत नाही असं विधान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलंय. मुंबईला ओरबाडणं सुरू असून आधी हिरे बाजार गुजरातला नेला, बीएमसीच्या ठेवींवर डल्ला मारल्याचा आरोप त्यांनी भाजपवर केला.  ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

28 Oct 2023, 19:09 वाजता

अजित पवार 'भावी मुख्यमंत्री'

 

Ajit Pawar Banner : मी पुन्हा येईन या देवेंद्र फडणवीसांच्या विडिओनंतर आता अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकलेत... पुण्यात अजित पवार समर्थक कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावलेत.. विकासाचा वादा, अजितदादा! भावी मुख्यमंत्री असा उल्लेख या बॅनरवर आहे... देवेंद्र फडणवीस यांच्या व्हिडिओ ट्विटनंतर अजित पवार समर्थकांनी ही पोस्टरबाजी केलीय..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

28 Oct 2023, 18:23 वाजता

अशोक चव्हाणांच्या वाढदिवसाचे बॅनर फाडले

 

Nanded Ashok Chavan : काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे बॅनर मराठा आंदोलकानी फाडले. नांदेड जिल्ह्यातील माहुरमध्ये हे बॅनर लावण्यात आले होते. मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असल्यानं आपण वाढदिवस साजरा करणार नाही असं अशोक चव्हाण यांनी पूर्वीच जाहीर केलं होतं. अशोक चव्हाण यांचा वाढदिवस असल्यानं नांदेड जिल्हयात काही ठिकाणी त्यांच्या समर्थकानी बॅनर लावले होते.सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी बॅनर फाडून अशोक चव्हाणांचा निषेध केला. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

28 Oct 2023, 18:20 वाजता

माजी आमदार बदामराव पंडितांची गाडी फोडली

 

Beed Badamrao Patil : मराठा आरक्षणासाठी मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. बीडच्या मादळमोहीत ठाकरे गटाचे माजी आमदार बदामराव पंडित यांची गाडी फोडण्यात आलीय. पंडित हे मोही माता यात्रेसाठी मादळमोही इथं आले होते त्यावेळी संतप्त मराठा आंदोलकांनी त्यांची गाडी फोडली आणि घोषणाबाजी केली. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

28 Oct 2023, 18:14 वाजता

मराठा आरक्षणासंदर्भात सोमवारी तातडीची बैठक

 

Maratha Reservation Meet : सोमवारी मंत्रालयात मराठा आरक्षणासंबंधी तातडीची बैठक बोलावण्यात आलीय, सकाळी १० वाजता ही बैठक होणार आहे.. मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षणा मिळावं यासाठी नेमण्यात आलेली समिती मराठा उपसमितीला अहवाल सादर करणार आहे.. जरांगे पाटील यांचं उपोषण सोडविण्यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झालीय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

28 Oct 2023, 16:42 वाजता

ओपिनियन पोलनुसार मध्य प्रदेशात भाजपची पिछेहाट

 

Madhya Pradesh Assembly Election : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत कुणाची सरशी होणार यावरून राजकारण तापलेलं असताना ओपिनियन पोलनुसार इथं भाजपची पिछेहाट होताना दिसतेय. 230 पैकी 132 ते 146 जागांवर काँग्रेसची सरशी होण्याची शक्यता आहे तर भाजपला केवळ 84 ते 98 जागा मिळू शकतात. या सर्व्हेक्षणानुसार मध्यप्रदेशच्या सातपैकी सहा विभागांमध्ये भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या नेतृत्वात काँग्रेस बाजी मारण्याची शक्यता आहे. सर्वेनुसार काँग्रेसला 46 टक्के तर भाजपला 43 टक्के मतं मिळू शकतात. केवळ भोपाळ विभागात भाजपला ब-यापैकी जागा मिळू शकतील असा अंदाज आहे. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

28 Oct 2023, 16:33 वाजता

मराठा आरक्षण प्रश्न 2 दिवसांत सुटणार - तानाजी सावंत

 

Tanaji Sawant On Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा प्रश्न येत्या दोन दिवसात सुटेल असा विश्वास आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी व्यक्त केलाय. मराठा आरक्षणावर राज्य सरकार साधक-बाधक विचार करतय. राज्य सरकार अत्यंत कळकळीनं या विषयावर लक्ष ठेवून आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या विषयावर बारीक लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे हा प्रश्न लवकरच सुटेल असंही सावंत म्हणालेत

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

28 Oct 2023, 15:52 वाजता

इन्कम टॅक्सची टोल नाक्यावर धाड

 

Income Tax Raid On Toll Naka : नाशिक पुणे रस्त्यावरील शिंदे टोलनाक्यावर इन्कम टॅक्सची धाड पडलीय... या महामार्गावर टोलचा झोल होत असल्याचा संशय असल्यानं ही कारवाई करण्यात आली... मुंबईतून दोन वाहनांतून आलेले अधिकारी इथं तळ ठोकून बसलेत. त्यांनी संगणकावर बसून वाहनांची आणि टोलची तपासणी सुरू केलीय. फास्टॅगच्या माध्यमातून टोल वसुली होत असली तरी काही वाहनं संशयास्पदरित्या टोलमधून सोडली जात आहेत तसेच संगणकीय माध्यमातून फ्रॉड होत असल्याचा संशय आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा -