Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

28 Oct 2023, 07:38 वाजता

जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस

 

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस आहे...जालन्यातील अंतरवाली सराटी गावात जरांगे यांनी महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी दुस-यांदा आमरण उपोषण सुरू केलंय...या उपोषणादरम्यान कोणतेही औषधोपचार आणि तपासणी करणार नसल्याचं जरांगेनी म्हटलंय...दरम्यान आज संध्याकाळी 5 वाजता जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पैठणफाटा ते अंतरवाली सराटी असा कँडल मार्च काढण्यात येणार आहे...या कँडलमार्चमध्ये हजारो मराठा बांधव सहभागी होण्याची शक्यताय...

28 Oct 2023, 07:32 वाजता

अजित पवारांना बारामतीमध्येच गावबंदी

 

Ajit Pawar ​ : आरक्षणावरुन मराठा समाज आक्रमक झालाय आणि त्याची झळ आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही बसलीय. अजित पवारांना बारामतीतच गावबंदी करण्यात आलीय. बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभाला अजित पवार येणार आहेत.. मात्र सकल मराठा समाजाने अजित पवारांना जोरदार विरोध केलाय.. यावर तोडगा काढण्यासाठी सकल मराठा संघटनेसोबत माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि पोलीस प्रशासनानं बैठक घेतली. मात्र ही बैठक निष्फळ ठरलीय. मराठा आंदोलक अजित पवारांना गळीत हंगामाच्या शुभारंभासाठी मोळी टाकू न देण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी पुतळ्यासमोर मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा मराठा समाजाने दिलाय. मात्र अजित पवार स्वत: येणार की नाही याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा-