28 Oct 2023, 15:37 वाजता
हिवाळी अधिवेशन बंद पाडू - निलेश लंके
Nilesh Lanke On Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे.गावोगावी नेत्यांना गावबंदी करण्यात आलीये. यातून विरोधीपक्षाचे आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार खासदारही सुटलेले नाहीत. अशातच मराठा आरक्षणावरुन अजित पवार गटाचे आमदार निलेश लंकेंनी सरकारला घरचा आहेर दिलाय. आरक्षण न मिळाल्यास हिवाळी अधिवेशन बंद पाडू असा इशारा निलेश लंकेंनी सरकारला दिलाय.. मावळमध्ये जरांगेंच्या समर्थनार्थ सुरु असलेल्या आंदोलनात निलेश लंके सहभागी झाले.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
28 Oct 2023, 15:32 वाजता
नाशिकमध्ये आणखी एक ललित पाटील
Solapur Drugs Factory : नाशिकमध्ये ललित पाटीलसारखेच आणखी बडे ड्रग्ज माफिया असल्याचं समोर आलंय.. सनी पगारे आणि सुमित पगारे हे पगारे बंधू ललित पाटीलपेक्षाही पुढे गेलेयत... पगारे बंधूंनी ललित पाटीलला टक्कर देत सोलापुरात ड्रग्जचा कारखाना उघडला होता... पोलिसांचं लक्ष वळवण्यासाठी या आरोपींनी स्वामी समर्थ केमिकल नावाने एक कारखाना सुरु केला होता.. नाशिकच्या पोलीस पथकानं पगारे बंधूंचा सोलापूरमधला एमडी ड्रग्ज बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त केलाय. या कारखान्यातून दहा कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज आणि कच्चा माल ताब्यात घेण्यात आलाय.. तर सोलापुरातून त्यांच्या एका साथीदारालाही बेड्या ठोकण्यात आल्यात.. ड्रग्ज पेडलर अर्जुन पिवालच्या चौकशीतून पोलिसांना यासंदर्भातही माहिती मिळाली होती.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
28 Oct 2023, 15:30 वाजता
मुंबईत नवरात्रोत्सवात 4 हजार 700 घरांची विक्री
Mumbai Real Estate : मुंबई शहरात नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसात 4 हजार सातशे घरांची विक्री झालीय.. यात 55% रिसेल घरांची विक्री तर 45% नवीन घरांची विक्री झालीय.. आंतरराष्ट्रीय मालमत्ता सल्लागार नाईट फ्रँक इंडिया संस्थेने हा अहवाल दिलाय.. 2022 च्या तुलनेत नवरात्रोत्सवात घर खरेदीत 37 टक्क्यांनी वाढ पाहायला मिळाली.. मुंबईकरांनी विकत घेतलेल्या 60% घरांच्या किमती या एक कोटींपेक्षाही अधिक आहेत.. घरांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली असली तरी सर्वाधिक महाग शहर मुंबईच असल्याचंही अहवालात म्हटलंय.. परवडणा-या घरांच्या यादीत अहमदाबाद पहिल्या क्रमांकावर आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
28 Oct 2023, 15:28 वाजता
धनगर समाजाकडूनही गावबंदी
Dhangar Reservation : मराठा समाजाने नेत्यांना केलेल्या गावबंदीत धनगर समाजाने उडी घेतलीय...सरकारने आम्हाला सांगितलेल्या वेळेत आरक्षण द्यावं...मराठा समाजासारखी आमची दिशाभूल करू नये...नाहीतर आम्हीही नेत्यांना गावबंदी करू असा इशारा यशवंत सेना प्रमुख बाळासाहेब दोडतोलेंनी दिलाय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
28 Oct 2023, 14:19 वाजता
लातूरमध्ये रविकांत तुपकरांना मराठा तरुणांचा घेराव
Ravikant Tupkar : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना लातूरमध्ये मराठा तरुणांच्या रोषाला सामोरं जावं लागलंय. मराठा तरुणांनी तुपकरांना घेराव घातला. इतकच नाही तर त्यांना सोफ्यावरूनही उठवलं. तुपकरांची सोयाबीनचा दर आणि पीकविमासंदर्भात बैठक होती. या बैठकीनिमित्त ते लातुरात आले होते. मात्र, बैठकीच्या ठिकाणी जाऊन मराठा तरुणांनी गोंधळ घातला. गावबंदी असताना शहरात का आलात... मराठा आरक्षणविरोधी आहात का.... अशा प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी त्यांनी तुपकरांविरोधात घोषणाबाजीही केली.
28 Oct 2023, 13:38 वाजता
Devendra Fadnavis Live | Marathi News LIVE Today : 'फडणवीस एकनाथ शिंदेंच्या पाठिशी', 'शिंदे मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ पूर्ण करणार', 'शिंदेंच्या नेतृत्वात निवडणुका होणार', उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती.
28 Oct 2023, 13:35 वाजता
हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प
Harbour Railway : हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झालीये. मालगाडीच्या इंजिनातील बिघाडामुळे वाहतूक ठप्प. दुपारी 1 वाजल्यापासून दोन्ही मार्गाची वाहतूक बंद. हार्बर मार्गाची वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांना फटका.
28 Oct 2023, 13:05 वाजता
कार्तिकी एकादशीच्या महापूजेला मंत्री, उपमुख्यमंत्र्यांना बंदी
Maratha Reservation : कार्तिकी एकादशीच्या महापूजेलाही मंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर सकल मराठा समाजाने बंदी घातलीय.. पंढरपुरात उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठूरायाची होणा-या कार्तिकी महापूजेला मराठा समाजाने विरोध दर्शवलाय.. महापूजेला येत असाल तर मराठा आरक्षणाचा अध्यादेश घेऊनच या... नाहीतर तुमच्या तोंडाला काळं फासू असा इशारा मराठा समाजाने दिलाय.. सकल मराठा समाजाच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला तसं पत्रही देण्यात आलंय.. वारक-यांच्या हस्ते कार्तिकी एकादशीला विठूरायाची शासकीय महापूजा करावी अशी मागणी सकल मराठा समाजाने केलीय..
28 Oct 2023, 12:42 वाजता
अजित पवार माळेगाव कारखान्यात येणार नाही
Ajit Pawar : अजित पवार बारामतीच्या कार्यक्रमात येणार नाहीत... अजित पवार पुण्यातील जिजाई निवासस्थानी दाखल झालेत.. माळेगाव साखर कारखान्याच्या मोळी पूजनाचा कार्यक्रम अजित पवारांच्या हस्ते होणार होता... मात्र अजित पवारांना मराठा समाजाने गावबंदी केलीय.. माळेगाव कारखाना परिसरात मराठा समाजाकडून आक्रमक आंदोलनही करण्यात आलं. तेव्हा अजित पवारांनी माळेगावमधल्या कार्यक्रमाला जाणं टाळलंय..अजित पवार गाव बंदीचा आवाहन डावलून माळेगांवमध्ये आले तर मराठा समाजात चुकीचा संदेश जाईल. अजित पवार हे समाजाच्या हिताच्या विरोधी भूमिका घेत असल्याचं बोललं जाईल. तसं होऊ नये यासाठी अजित पवारांनी कार्यक्रम टाळल्याची माहिती मिळतेय.
28 Oct 2023, 12:30 वाजता
Sharad Pawar Live | Marathi News LIVE Today : 'शेतकऱ्यांची 62 हजार कोटींची कर्जमाफी केली','कृषी क्षेत्रात अनेक नव्या योजना सुरू केल्या', 'आयात करणारा देश निर्यात करणारा झाला', शरद पवार यांचं वक्तव्य.