Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

29 Apr 2024, 11:31 वाजता

मोदींची भ्रष्टाचारीविरोधीची बोंब नसून पोकळ बांग - संजय राऊत

 

Nashik Sanjay Raut : संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केलाय....मोदींची भ्रष्टाचारीविरोधी बोंब ही बोंब नसून, पोकळ बांग असल्याची टीका राऊतांनी केलीय...आधी मोदींनी अजित पवारांवर कारवाई करावी...अजित पवार, हेमंत बिस्वा, हसन मुश्रीफ या सोबतच देशातील भ्रष्टाचारांना मांडीवर घेऊन मोदी भ्रष्टाचारविरोधात लढतायत...अशी टीका राऊतांनी मोदींवर केलीय...

29 Apr 2024, 11:27 वाजता

मोदी आणि शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहेत - संजय राऊत

 

Nashik Sanjay Raut : पंतप्रधान मोदी आणि शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहेत...मुंबईची लूट करून मुंबईला कंगाल करायचंय...म्हणून दोन पक्ष फोडून सरकार पाडलं असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलाय...

29 Apr 2024, 10:48 वाजता

उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकरांना उमेदवारी मिळण्याची शक्यता

 

Ravindra Waikar : उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकरांना उमेदवारी मिळण्याची शक्यताय...शिवसेना शिंदे गटाकडून रवींद्र वायकरांचं नाव चर्चेत आहे...त्यामुळे शिवसेना शिंदे गटाकडून वायकरांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यताय...वायकरांना उमेदवारी मिळाल्यास उत्तर पश्चिममध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे...ठाकरे गटाच्या अमोल किर्तीकर विरुद्ध वायकरांचा सामना होणाराय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

29 Apr 2024, 10:04 वाजता

नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना पुन्हा इशारा

 

Narayan Rane On Uddhav Thackeay : नारायण राणेंनी पुन्हा उद्धव ठाकरेंना इशारा दिलाय...पंतप्रधान मोदी आणि शाहांवर टीका केली तर रस्ता बंद करून टाकेन, सोडणार नाही...असा इशारा राणेंनी दिलाय...उद्धव ठाकरे हा विकृत माणूस असून, कोणाला कोणी चांगलं म्हटलं की याच्या पोटात पोटशूळ उठतो अशी टीका राणेंनी केलीय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

29 Apr 2024, 09:14 वाजता

नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात?

 

Loksabha Election 2024 : रत्नागिरी-सिंधुदुर्गचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे मैदानात उतरण्याची शक्यता आहे.. ४ मे ला राज ठाकरेंची सिंधुदुर्गात सभा होऊ शकते, अशी शक्यता मनसे कार्यकर्त्यांनी व्यक्त केलीय.. रत्नागिरीत मनसेच्या पहिल्या फळीतील नेत्यांनी सभा घेतल्यानंतर आता स्वत: राज ठाकरे सभा घेऊ शकतात.. येत्या एक ते दोन दिवसांत राज ठाकरेंच्या सभेसाठीचा दौरा निश्चित होण्याची शक्यता आहे.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

29 Apr 2024, 09:10 वाजता

पाचव्या टप्प्यातील अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची लगबग

 

Loksabha Election 2024 : महाराष्ट्रातील पाचव्या टप्प्यासाठी आज अर्ज भरण्याचा दिवस आहे. धुळे, नाशिक, ठाणे, मुंबईतले उमेदवार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करतील. धुळ्यात भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. यावेळी मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे उपस्थित असतील. धुळ्यातले वंचितचे उमेदवार अब्दुल रहमानही अर्ज भरतील. धुळ्यात भामरे आणि रहमान यांची लढत काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांच्याशी होतेय. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार स्वामी शांतिगिरी महाराज उमेदवारी अर्ज भरणारेत.  रामकुंडावरून रॅली काढत ते शक्तिप्रदर्शन करणारेत.  तर मविआचे उमेदवार राजाभाऊ वाजेही आज अर्ज भरतील. यावेळी संजय राऊत उपस्थित असणारेत. नाशिकमध्ये अजून महायुतीचा उमेदवारच ठरलेला नाही. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत आज ठाण्यात मविआचे उमेदवार राजन विचारे अर्ज भरतील. ते रोड शो करून शक्तिप्रदर्शन करणारेत. तर मुंबईत दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे आज उमेदवारी अर्ज दाखल करतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यावेळी उपस्थित राहणारेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे अरविंद सावंत आणि अनिल देसाईही आज उमेदवारी अर्ज दाखल करतील. शक्तिप्रदर्शन करण्यासाठी फोर्टच्या बाळासाहेब ठाकरे पुतळ्यापासून ते रॅली काढणारेत.  

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

29 Apr 2024, 08:43 वाजता

शरद पवारांच्या आज साताऱ्यात 2 प्रचारसभा

 

Satara Sharad Pawar : शरद पवारांच्या आज दोन सभा होतायत. सातारा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन करण्यात आलंय. वाई इथे संध्याकाळी 4 वाजता होणा-या या सभेला शरद पवार संबोधित करणारेत. तर संध्याकाळी 6 वाजता फलटणमध्ये शरद पवारांची सभा होणारेय. मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी या सभेचं आयोजन करण्यात आलंय... 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

29 Apr 2024, 08:15 वाजता

पंतप्रधान मोदींच्या कल्याण, बीडमध्येही सभा

 

Loksabha Election 2024 : पंतप्रधान मोदींनी सभांचा धडाका लावलाय, मात्र त्यातही मोदींचं महाराष्ट्रावर विशेष लक्ष आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात पूर्व विदर्भातल्या 5 जागांसाठी मतदान पार पडलं. यात मोदींनी चंद्रपूर, रामटेक आणि वर्ध्यात सभा घेतल्या. दुस-या टप्प्यासाठी मोदींनी नांदेड, परभणी, अमरावतीत सभा घेतल्या. आता त्यांचं लक्ष राज्यातल्या उर्वरित तीन टप्प्यातल्या मतदानाकडे आहे. त्यासाठी आज त्यांच्या पुणे, सोलापूर आणि साता-यात सभा होतायत. तर उद्या माळशिरस, धाराशिव आणि लातूरमध्ये प्रचार सभा असेल. तर 6 आणि 10 मे रोजी देखील मोदींच्या सभा राज्यात असतील. 6 मे रोजी बीडमध्ये पंकजा मुंडेंसाठी पवार मैदानात उतरतील. 10 मे रोजी कल्याणसह नगर आणि दिंडोरीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधानांच्या सभा होतील. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

29 Apr 2024, 08:13 वाजता

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मिशन महाराष्ट्र

 

Prime Minister Narendra Modi Rally In Maharashtra :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौ-यावर आहेत.मोदींच्या आज तीन सभा होणार आहेत. पुणे, सोलापूर आणि साता-यात मोदींची सभा होणारेय. सोलापूरमध्ये  दुपारी 1 वाजता, साता-यात दुपारी 3 वाजता आणि पुण्यात संध्याकाळी 7 वाजता या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय.  पुण्यातील सभा रेस कोर्स मैदानावर होणारेय...पुण्यातली सभा पुणे, शिरुर, मावळ आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी होणार आहेत...पुण्यात रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ अशी लढत रंगणारेय. शिरुरमध्ये अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव अशी लढत होतेय. तर बारामतीत नणंद विरुद्ध भावजय सामना रंगतोय. विशेष म्हणजे पुण्यातल्या सभेनंतर आज पंतप्रधान पुण्यातच मुक्काम करणार आहेत...

बातमीचा व्हिडीओ पाहा -