केरळ राज्याचं नाव बदलणार, आता 'या' नावाने ओळखलं जाणार... एकमताने प्रस्ताव पारित

केरळ विधानसभेत सर्वसंमतीने एक प्रस्ताव पारित करण्यात आला आहे. यात केरळ राज्याचं नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आलाय. हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला असून केंद्राकडून मंजूरी मिळाल्यानंतर केरळ राज्य नव्या नावने ओळखलं जाणार आहे. 

राजीव कासले | Updated: Jun 25, 2024, 05:11 PM IST
केरळ राज्याचं नाव बदलणार, आता 'या' नावाने ओळखलं जाणार... एकमताने प्रस्ताव पारित title=

भारताच्या स्वातंत्र्यानंतर 9 वर्षांनी म्हणजे 1 नोव्हेंबर 1956 ला भाषेच्या आधारावर केरळ (Keral) नवाने वेगळं राज्य अस्तित्वात आलं. आता तब्बल 68 वर्षांनी केरळ सरकारने भाषेच्याच आधारावर राज्याचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी विधानसभेत एक प्रस्ताप आणण्यात आला आणि एकमताने तो पारित करण्यात आला आहे. हा प्रस्ताव आता केंद्राकडे मंजूरीसाठी पाठवण्यात आला असून केंद्राची मंजूरी मिळाल्यानंतर केरळ राज्य नव्या नावाने ओळखलं जाईल. 

या नावाने ओळखलं जाणार केरळ
केरळ राज्य आता यापुढे केरलम (Keralam) या नावाने ओळखलं जाणार आहे. याआधी 2023 मध्येही नाव बदलण्याचा प्रस्ताप केंद्राकडे पाठवण्यात आला होता. त्यावेळी गृहमंत्रालयाने प्रस्तावाची समीक्षा करत काही तांत्रिक सुधारणा सुचवल्या होत्या. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी केलेल्या दाव्यानुसार मल्यालम भाषेत केरळाचं उच्चार केरलम असा केला जातो. हिंदीत केरळ म्हटलं जातं. इंग्रजीत लिहिताना Kerala असं लिहिलं जातं.  

केरळचं नाव कसं पडलं?
1920 मध्ये म्हणजे भारत स्वातंत्र्य होण्याआधी मल्यालम भाषिक नागरिकांनी एक आंदोलन केलं होतं. आंदोलकर्त्यांच्या म्हणण्यानुसार या भागातील लोक एकच भाषा बोलतात, एकच परंपरा मानतात, त्यामुळे त्यांचं वेगळं राज्य करावं. मल्यालम भाषिकांसाठी वेगळ्या राज्याची त्यांनी मागणी केली. यात कोची, त्रावणकोर आणि मालाबार हे भाग मिळून एका राज्य व्हावं अशी आंदोलकांची मागणी होती. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भाषेच्या आधारावर वेगवेगळ्या राज्यांची मागणी होई लगाली. यासाठी श्यामधर कृष्ण आयोगाची स्थापना करण्यात आली. या आयोगाने भाषेच्या आधारावर वेगळ्या राज्याची मागणी हे देशहिताविरोधी असल्याचं म्हटलं. यादरम्यान 1 जुलै 1949 मध्ये त्रावणकोर आणि कोचीन या संस्थानांचं विलीनीकरण झाले. त्यामुळे त्रावणकोर-कोचीन राज्य निर्माण झालं,

पण ही गोष्ट इथेच थांबली नाही. वेगळ्या राज्यांची मागणी  वाढत असल्याने JVP आयोग निर्माण करण्या आलं. जेव्हीपी म्हणजे जवाहरलाल नेहरु, वल्लभभाई पटेल आणि पट्टभी सीतारमैया. या आयोगाने भाषेच्या आधारावर राज्यांची निर्माती करण्याचा सल्ला दिला. यानंतर मालाबार संस्थान त्रावणकोर-कोचिन राज्यात समाविष्ठ झाला. अशा प्रकारे 1 नोव्हेंबर 1956 मध्ये केरळ राज्य अस्तित्वात आलं. 

केरळचं नाव का बदलायचंय?
केरळ विधानसबेत पास झालेल्या प्रस्तावानुसार हिंदी आणि इतर अन्य भाषेत केरलमला केरल म्हटलं जातं. मल्यालम भाषेत केरळचं नाव केरलम आहे. राज्यातील मल्यालम नागरिकांची भाषा, संस्कृती आणि ओळख वाढवण्यासाठी केरलम नाव सुचवण्यात आलं आहे.