AFG vs BAN : युद्ध, रक्तपात, बंदुकीचे आवाज आणि किंकाळ्या... अशी परिस्थितीत अफगाणिस्तानचे लोक आयुष्य जगतायेत. मात्र, त्यांना सुखाचे क्षण दाखवले ते अफगाणिस्तान क्रिकेटने... अफगाणिस्तानने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये मोठी पराक्रम गाजवलाय. अफगाणिस्तानने पहिल्यांदाच टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. अफगाणिस्तानने बांगलादेशचा 8 धावांनी पराभव केला. अटीतटीच्या झालेल्या सामन्यात राशीद खान अँड कंपनीने बांगलादेशला धूळ चारली. अफगाणी खेळाडूंनी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा पराभव केल्याने क्रिडाविश्वात चर्चेला उधाण आलंय. अशातच आता अफगाणिस्तान सेमीफायनलमध्ये पोहोचल्यानंतर तालीबानी राजवटीत जल्लोष पहायला मिळतोय. रस्त्यावर लोक उतरले असून चौकाचौकात गर्दी पहायला मिळतीये.
अफगाणिस्तान सामना जिंकणार नाही, अशी शक्यता होती. मात्र, राशीदने सुत्र हलवली अन् अशक्य असा विजय मिळवून दाखवला. अफगाणिस्तानमध्ये सामना पाहण्यासाठी मोठमोठे स्क्रिन लावण्यात आले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या चौकात गर्दी पहायला मिळाली अन् सामना जिंकल्यानंतर लोकांनी जल्लोष केला. काही ठिकाणी लोकांना हटवण्यासाठी पाण्याचा मारा करावा लागला. तरी देखील लोकांनी रस्त्यावर नाचणं सोडलं नाही. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही ठिकाणी रंगाची उधळण देखील केली गेली.
Cricket fans gather in Paktia province to celebrate #AfghanAtalan's qualification for the #T20WorldCup Semi-Finals. https://t.co/26GhawhaIi#AfghanAtalan | #T20WorldCup | #AFGvIND | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/QFL72eBk2S
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) June 25, 2024
दरम्यान, अफगाणिस्तान टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये कमाल दाखवली अन् अफगाणिस्तानमधील लोकांच्या ब्लॅक अँड व्हाईट आयुष्यात खऱ्या अर्थाने आनंदाचे रंग उधळले आहेत. अफगाणी लोकांच्या आयुष्यात क्रिकेट हेच मनोरंजनाचं माध्यम आहे आणि आम्ही त्यात कोणतीही कसर सोडणार नाही, असं राशीद खान म्हणाला होता. आता राशीद आणि इतर खेळाडूंनी नक्कीच अफगाणिस्तानच्या लोकांचं मन जिंकलंय.
The madness in Afghanistan. pic.twitter.com/MyYrAcFidr
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 25, 2024
अफगाणिस्तान प्लेइंग ईलेव्हन : राशीद खान (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, गुलबदिन नायब, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, करीम जनात, नांगेयालिया खरोटे, नूर अहमद, नवीन-उल-हक आणि फजलहक फारुकी.
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), लिटन दास (विकेटकीपर), तनझिद हसन, तौहिद ह्रदोय, शकिब अल हसन, महमुदुल्ला, सौम्या सरकार, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तन्झिम हसन साकिब आणि मुस्तफिजुर रहमान.