Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on December 01 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

1 Dec 2024, 11:26 वाजता

हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरली-सूत्र

 

Maharashtra Winter Session 2024 : महायुती सरकारच्या पहिल्या अधिवेशनाची तारीख ठरली-सूत्र...पहिलं हिवाळी अधिवेशन नागपुरात 16 ते 21 डिसेंबर दरम्यान पार पडणार-सूत्र...नव्याने निवडून आलेल्या सरकारचे पहिले अधिवेशन कमी दिवसांचे असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...विधानसभेत पहिल्यांदाच विरोधीपक्ष नेता नसणार

1 Dec 2024, 11:08 वाजता

बावनकुळे राज्यपाल आहेत का?- संजय राऊत

 

Sanjay Raut on Chandrashekhar Bawankule : शपथविधीच्या तारखेवरून संजय राऊतांनी भाजप नेते चंद्रशेखर बावनुकुळेवर हल्लाबोल केलाय. शपथविधीची तारीख सांगणारे चंद्रशेखर बावनकुळे हे राज्यपाल आहेत का? असा सवाल खासदार संजय राऊतांनी केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडणार', अशी माहिती बावनकुळेंनी दिली होती. यावरून राऊतांनी निशाणा साधलाय. बावनकुळे हे राज्यपाल आहेत का? त्यांना राज्यपालांचे अधिकार दिलेत का? की राज्यपालांनी त्यांना सांगितलंय?, अशा प्रश्नांचा भडीमार राऊतांनी केलाय.

1 Dec 2024, 10:13 वाजता

कोल्हापुरात EVMची पडताळणी होणार

 

Kolhapur EVM : कोल्हापूर जिल्ह्यातील 5 मतदारसंघातील 44 मतदान केंद्रावरील EVM ची तपासणी आणि पडताळणी होणारेय. या मतदारसंघातील उमेदवारांनी जिल्हा प्रशासनाकडं तपासणीची मागणी केली होती. याची निवडणूक आयोगानं दखल घेतलीय. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यानंतर ही तपासणी आणि पडताळणी होणारेय. राज्यात विधानसभा निवडणुकीत काही ठिकाणी झालेले मतदान आणि EVM वर झालेले मतदान यामध्ये तफावत आढळल्याचे तक्रारी होत्या. त्यामुळे निवडणूक आयोगाने EVM तपासणी आणि पडताळणीच्या मागणीसाठी अर्ज करण्याची वेळ दिली होती. 

1 Dec 2024, 09:11 वाजता

राज कुंद्राला ईडीचं समन्स

 

Raj Kundra : राज कुंद्राला ईडीचा समन्स...पॉर्नोग्राफी केस प्रकरणी ईडीचा समन्स...पुढच्या आठवड्यात चौकशीला हजर राहण्याची आदेश...ईडीकडून पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राची होणार चौकशी 

1 Dec 2024, 08:30 वाजता

राज्यात झिका रुग्णांची संख्या 140वर

 

Maharashtra Zika Virus Patients Hikes : राज्यात झिका रुग्णांची संख्या 140 वर गेलीय सर्वाधिक रुग्ण पुणे शहरात असून तिथली रुग्णसंख्या 109 इतकी झालीय त्याखालोखाल अहिल्यानगर मध्ये 11 रुग्ण ... पुणे ग्रामीण मध्ये 10 तर पिंपरी चिंचवड मध्ये 6 रुग्ण आढळलेत. सांगली ,मिरज, कोल्हापूर ,दादर आणि मुंबई याठिकाणी प्रत्येकी एक झिकाचा रुग्ण आढळलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

1 Dec 2024, 08:08 वाजता

आज शरद पवारांनी बोलावली पक्षाच्या आमदारांनी बैठक

 

NCP Sharad Pawar MLA Meeting : आज शरद पवारांनी बोलावली पक्षाच्या आमदारांनी बैठक...दुपारी 3 वाजता मुंबईतील पक्षकार्यालयात बैठक होणार...बैठकीत पक्षाचा गटनेता, विधीमंडळ पक्षनेता आणि मुख्य प्रतोद यांची निवड होण्याची शक्यता...प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक होणारेय

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

1 Dec 2024, 07:44 वाजता

STचा प्रवास महागणार?

 

ST Mahamandal : सर्वसामान्यांच्या प्रवासाचं साधन असलेल्या एसटीचा प्रवास महागण्याची शक्यता आहे.. गेल्या तीन वर्षांत भाडेवाढ करण्यात आली नाही असं सांगत एसटी महामंडळानं तब्बल 14 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.. यामुळे शंभर रुपयांमागे 15 रुपये दरवाढ होण्याची शक्यता आहे.. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर ही दरवाढ होण्याची शक्यता आहे.. उत्पन्नाच्या तुलनेत खर्च भागत नसल्यानं महामंडळानं भाडेवाढीचा प्रस्ताव पुढे ठेवलाय..

1 Dec 2024, 07:40 वाजता

उद्या भाजपच्या नेता निवडीसाठी होणार बैठक-सूत्र

 

BJP : उद्या भाजपची नेता निवडीसाठी बैठक होण्याची शक्यताय . त्यामुळे सर्व आमदार आज आणि उद्यामध्ये मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे..भाजप विधिमंडळ गटाची उद्या दुपारी बैठक होईल त्यानंतर सरकार स्थापनेला गती येणार असल्याचं म्हटलं जातंय