Attack on Kejriwal: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला झाला आहे. ग्रेटर कैलाश येथे आले असता त्यांची सुरक्षा भेदून हल्लेखोराने केजरीवालांच्या अंगावर द्रव पदार्थ फेकला. या हल्ल्यात केजरीवालांना कोणतीही इजा झाली नाही. पण सुरक्षेतील चूक समोर आली. तसेच सुरक्षारक्षकांनी हल्लेखोराला तात्काळ ताब्यात घेतले आहे.
VIDEO | Security personnel overpowered a man who apparently tried to attack AAP national convener Arvind Kejriwal during padyatra in Delhi's Greater Kailash area. More details are awaited. pic.twitter.com/aYydNCXYHM
— Press Trust of India (@PTI_News) November 30, 2024
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल दररोज पदयात्रा करत आहेत. आज ते ग्रेटर कैलाश येथे असताना त्यांच्यावर अचानक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप आम आदमी पार्टीकडून करण्यात आला आहे. केजरीवालांच्या हल्ल्यानंतर आपने कायदा सुव्यवस्थेवरुन भाजपवर हल्लाबोल केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे हे अपयश असल्याचे आपतर्फे सांगण्यात आले आहे.
याआधी अरविंद केजरीवाल यांनी बुराडी विधानसभेत पदयात्रा करताना जनतेशी थेट संवाद साधला होता. दिल्लीतील माता-भगिनींना लवकरच प्रत्येकी 1 हजार रुपये मिळण्यास सुरुवात होईल, असे केजरीवालांनी म्हटले होते. योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक महिलेकडे आपले मतदान ओळखपत्र असायला हवे. मतदान ओळखपत्र नसेल तर महिला नोंदणी करु शकणार नाहीत. कोणाकडे मतदान ओळखपत्र नसेल तर त्यांनी लवकरच बनवून घ्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
दिल्ली विधानसभेचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. दिल्ली आज शूटआऊटची राजधानी बनली आहे. दररोज दिल्लीमध्ये शूटआऊट अॅट कबीर नगर, शूटआऊट अॅट पश्चिम विहार, शूटआऊट अॅट नारायणा असे आपण ऐकतो. प्रत्येक जागा, प्रत्येक गल्लीत गॅंगस्टरांची दहशत आहे, असे ते म्हणाले. शाळा आणि काँलेजला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळते तेव्हा पालक भिती आणि चिंतेने ग्रस्त होतात. भाजप काही करत का नाही? असा प्रश्न ते विचारत असल्याचे सिसोदिया म्हणाले.