2 Dec 2024, 20:40 वाजता
गिरीष महाजनांची एकनाथ शिंदेंशी चर्चा
Girish Mahajan's discussion with Eknath Shinde : भाजप नेत्यांशी बोलण्याचा शिंदेंना आग्रह..गिरीष महाजनांची एकनाथ शिंदेंशी चर्चा...शिंदे-महाजन भेटीबाबत झी 24 तासला सूत्रांची माहिती...किमान व्हीसीसाठी तरी बसण्याचा आग्रह-सूत्र... फडणवीसांशी फोनवर बोलण्याचा महाजनांचा आग्रह
बातमीचा व्हिडीओ पाहा-
2 Dec 2024, 18:40 वाजता
'दिल्लीच्या बैठकीतच भाजपचा सीएम होणार',सुनील तटकरेंचा दावा
Sunil Tatkare : मुख्यमंत्रिपदाबाबत सुनील तटकरेंचा मोठा दावा...दिल्लीच्या बैठकीतच भाजपचा सीएम होणार हे ठरलं'... भाजपचा मुख्यमंत्री होणार हे ठरलंय- तटकरे...सुनील तटकरेंची मुख्यमंत्रिपदाबाबत मोठी माहिती
बातमीचा व्हिडीओ पाहा-
2 Dec 2024, 18:03 वाजता
उद्या निवडणूक आयोगाशी मविआचे नेते करणार चर्चा
Mahavikas Aghadi : निवडणूक आयोगाला भेट देणाऱ्या शिष्टमंडळात नाना पटोले यांचा समावेश...३ डिसेंबरला म्हणजे उद्या महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ घेणार निवडणूक आयोगांची भेट..विरोधकांनी महाराष्ट्रातील निकालाबात ईव्हीएमवर आक्षेप घेतले होते...त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं विरोध करणाऱ्या नेत्यांना 3 डिसेंबरला चर्चेसाठी बोलावलं..या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटणार असून या शिष्टमंडळात नाना पटोले यांचा समावेश आहे...महाविकास आघाडीतील सर्व राजकीय पक्षांनी राज्यातील विधानसभा निवडणुक प्रक्रियेवर संशय व्यक्त केला आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
2 Dec 2024, 17:08 वाजता
देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाणार नाहीत
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाणार नाहीत... राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार मात्र दिल्लीला रवाना
2 Dec 2024, 16:34 वाजता
ठाणे शहरात आजपासून 8 दिवस पाणीकपात
Thane Water Cut : आजपासून संपुर्ण ठाणे शहरात आठवडाभर पाणी कपात...मुंबई ला १० टक्के पाणी कपात सुरू आहे, दुरुस्ती चे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे ठाणे शहरात देखील पाणी कपात होणार आहे...पुढील आठ दिवस पाणी जपून वापरण्याचे ठाणे पालिकेचे आवाहन.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
2 Dec 2024, 16:05 वाजता
अविनाश जाधव यांनी घेतला राजीनामा मागे
MNS Avinash Jadhav Resignation Withdtraw : अविनाश जाधव यांनी जिलाध्यक्ष पदाचा दिलेला राजीनामा घेतला मागे...राज ठाकरे यांच्या आदेशानंतर राजीनामा मागे घेत असल्याची अविनाश जाधव यांची माहिती...आता अविनाश जाधव पुन्हा ठाणे आणि पालघर जिलाध्यक्ष म्हणून करणार काम ..इतर कोणत्याही पक्षात जाण्याचा कधीच विचार करणार नाही अशी दिली माहिती
बातमीचा व्हिडीओ पाहा-
2 Dec 2024, 15:03 वाजता
महाराष्ट्रासाठी भाजपकडून निरीक्षकांची घोषणा
BJP : महाराष्ट्रासाठी भाजपकडून निरीक्षकांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे....केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची महाराष्ट्राचे निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे....ते उद्या रात्रीपर्यंत मुंबईत दाखल होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे...तर 4 डिसेंबरला सकाळी भाजपच्या विधीमंडळ गटनेते पदासाठी बैठक पार पडणार आहे.
2 Dec 2024, 14:18 वाजता
एकनाथ शिंदेंच्या आजच्या सर्व बैठका रद्द- सूत्र
Eknath Shinde meeting cancelled : एकनाथ शिंदेंच्या आजच्या सर्व बैठका रद्द झाल्याची सूत्रांची माहिती.. आज आमदारांची बैठक बोलावली होती... एकनाथ शिंदेंना डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिल्यामुळे सर्व बैठका रद्द, आज एकनाथ शिंदे ठाण्यात असतील.. एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाणार नसल्याची सूत्रांची माहिती.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
2 Dec 2024, 11:39 वाजता
नागपुरात टोळक्याकडून तरुणाला मारहाण
Nagpur : नागपूर विद्यापीठ रोडवरील हिंदुस्तान कॉलोनी येथील रिद्धी सिद्धी अपार्टमेंटमध्ये घुसून तरुणांच्या टोळक्याने एका तरुणावर हल्ला केला.या हल्ल्यात संबंधित तरुण गंभीर जखमी झालाय. विद्यापीठ रोडवर तरुणांच्या दोन गटात वाद झाला होता. या वादाचं रुपांतर मारहाणीत झालं. यामुळे संबंधित तरुण आपला जीव वाचवण्यासाठी जवळच्या रिद्धी सिद्धी अपार्टमेंटमध्ये शिरला. मात्र हल्लेखोरांनी त्याला अडवत तिथेच मारहाण केली. दरम्यान मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा - नागपुरात रिद्धी-सिद्धी अपार्टमेंटमध्ये तरुणाला बेदम मारहाण
2 Dec 2024, 11:17 वाजता
खासदार संजय राऊतांचा महायुतीवर हल्लाबोल
Sanjay Raut : फक्त गृहमंत्रिपदावरून सरकार स्थापनेत अडचण येत नसल्याचा आरोप शिवसेना UBT खासदार संजय राऊतांनी केलाय. इंतकंच नाही तर फडणवीसांच्या जागी दुसरं कोणी आणलं जातंय का ? असा सवाल करत सत्ता स्थापनेवरून राऊतांनी महायुतीवर हल्लाबोल केलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -