2 Dec 2024, 07:15 वाजता
राज्यात थंडीनं मारली दडी
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्य़ा आणि तामिळनाडूसह देशातील प्रामुख्यानं दक्षिण किनारपट्टी क्षेत्रावर सर्वाधिक परिणाम करणाऱ्या 'फेंगल/ फेइंजल' या चक्रीवादळामुळे हवामान प्रणालीत हे बदल झाल्याचं सांगितलं जात आहे. चक्रीवादळामुळं तयार झालेले बाष्पयुक्त वारे सध्या थेट राज्याच्या दिशेनं येत असल्यामुळं राज्यात पावसासाठी पूरक वातावरनिर्मिती होत असून, काही क्षेत्रांमध्ये ढगाळ हवामानाचा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे. याच कारणास्तव राज्यात तग धरलेल्या थंडीवरही परिणाम होत असून, तापमानवाढ नोंदवली जात आहे.
सविस्तर वृत्त- Maharashtra Weather News : गार वाऱ्यांची दिशा बदलताच राज्यात पुन्हा पावसाचा अंदाज; कोणत्या भागाला बसणार तडाखा?
2 Dec 2024, 07:14 वाजता
रोहित पवारांनी शपथविधीवरून महायुतीला डिवचलं
रोहित पवारांनी शपथविधीवरून महायुतीला डिवचलंय. महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर 26 तारखेला सरकार स्थापन होणं गरजेच होतं मात्र, लग्नाची तारीख जवळ अन् नवरदेव हुंड्यासाठी रुसला असल्याची टीका रोहित पवारांनी केलीये.
2 Dec 2024, 07:13 वाजता
श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद?
दरम्यान शिवसेनेच्या काही नेत्यांकडून उपमुख्यमंत्रपदासाठी श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा सुरू आहे..याबाबत एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर देणं टाळलं.
2 Dec 2024, 07:12 वाजता
सरकार स्थापन करताना गावी जायचं नाही का? - एकनाथ शिंदे
जनतेच्या मनातलं सरकार स्थापन होणार असा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला. तिघे एकत्र बसून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिपदांबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती शिंदेंनी दिली. सरकार स्थापन करताना गावी जायचं नाही का? असा सवाल करत शिंदेंनी विरोधकांना टोला लगावला.
2 Dec 2024, 07:09 वाजता
आताच्या क्षणाची मोठी बातमी; महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब
पीटीआयनं भाजप नेत्यांचा हवाला देत प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं असून, त्यांच्यावर पुढील दोन दिवसांमध्ये भाजपच्या संभाव्य बैठकीमध्ये विधीमंडळ पक्षनेतेपदासंदर्भातही मोठा निर्णय होणार असल्याचं म्हटलं जात आहे. रविवारी रात्री भाजप नेत्यानं यासंदर्भातील माहिती वृत्तसंस्थेला दिली.