2 Dec 2024, 11:13 वाजता
आमदार राजेश वानखडेंचा यशोमती ठाकूर यांच्यावर आरोप
Amravati Yashomati Thakur Vs Rajesh Wankhede : काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी दूध डेअरीत मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आमदार राजेश वानखडेंनी केलाय. यशोमती ठाकूर यांनी जिल्ह्यात एकही उद्योग आणला नाही. एक दूध डेअरी उभा केली. त्यातही आर्थिक गैरव्यवहार केला, असा निशाणा वानखडेंनी साधलाय. यशोमती ठाकूरांनीवानखडेंच्या आरोपाचं खंडण केलंय. आर्थिक गैरव्यवहार झालाय, याचे पुरावे सादर करा, असं आव्हान यशोमती ठाकूर यांनी वानखडेंना दिलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
2 Dec 2024, 11:02 वाजता
शिवसेना UBTचा पुन्हा स्वबळाचा नारा?
Sachin Ahir : विधानसभा निवडणूकीनंतर शिवसेना UBT पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढल्या जाव्यात अशी मागणी शिवसैनिकांकडून होतेय...विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने जागा दिल्या नाही ही नाराजी असून येणा-या निवडणुका स्वबळावर की आघाडीत लढव्यात याबाबत संभ्रम असल्याचं वक्तव्य सचिन अहिर यांनी केलंय
बातमीचा व्हिडीओ पाहा -
2 Dec 2024, 10:35 वाजता
भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीबाबत संभ्रम
BJP Meeting Update : शपथविधीची तारीख 5 डिसेंबरला निश्चित झाल्यानंतर विधीमंडळ पक्षाची बैठक ही आज किंवा उद्या होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती .मात्र अद्याप पर्यंत आमदारांना या बैठकीसंदर्भातले कोणताही निरोप नसल्याने बरेचसे आमदार त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात आहेत..दरम्यान विधिमंडळ पक्षाची बैठक उद्या किंवा परवा होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. याच बैठकीत भाजपचा गटनेता निवडला जाणार आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
2 Dec 2024, 10:07 वाजता
तेलंगणात 2 अपत्य योजना बंद होणार?
Telangana : आंध्र प्रदेशानंतर आता तेलंगणामध्येही 2 अपत्य योजना बंद होण्याची शक्यताये. तेलंगणा राज्य सरकारनं कायदा बदलण्याच्या हालचाली सुरू केल्यात, अशी माहिती सूत्रांनं दिलीय. देशाच्या जन्मदर 2.11 आहे. तर तेलंगणाचा जन्मदर केवळ 1.5 आहे. भविष्यात लोकसंख्या घटण्याचा धोका लक्षात घेता तेलंगणा सरकार 2 अपत्य योजना बंद करण्याच्या विचारात आहे. या योजनेमुळे नागरिकांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाही लढवणं शक्य होत नाही. हे निर्बंध हटवण्यासाठी तेलंगणा सरकारनं ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळतेय. 2018 च्या पंचायतराज कायद्यात संशोधन केलं जाणारेय. त्यानंतर ते मंजुरीसाठी मंत्रीमंडळासमोर ठेवले जाणारेय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
2 Dec 2024, 09:41 वाजता
विक्रांत मेस्सीची 'फिल्मी' रियाटरमेंट पोस्ट
Vikrant Massey : अभिनेता विक्रांत मेस्सीने अभिनयातून सन्यास घ्यायचा ठरवलंय. तशी पोस्ट त्याने सोशल मीडियावर टाकलीय. मेस्सीच्या या पोस्टमुळे चाहत्यांना मात्र धक्का बसलाय.टीव्ही मालिकांपासून सुरु केलेल्या करियरनंतर गेल्या काही वर्षात मेस्सीचे सिनेमेही खूपच गाजले. 12 वी फेल, द साबरमती रिपोर्ट, तसंच वेबसीरीजमधल्या त्याच्या अभिनयाला चाहत्यांची विशेष दाद मिळाली. मात्र मेस्सीने अब समय आ गया है म्हणत शेवटचे दोन सिनेमा आणि अनेक वर्षांच्या आठवणी...धन्यवाद म्हणत चाहत्यांचे आभार मानलेत..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
2 Dec 2024, 09:21 वाजता
EVMमध्ये छेडछाड झाल्याचा संशय - प्रणिती शिंदे
Solapur Praniti Shinde : विधानसभेची निवडणूक सरळ झाली नाही. यात षडयंत्र केलं गेलं, असा आरोप काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंनी सोलापूरच्या सभेत केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चेह-यावर विजयाचा आनंद दिसत नाही. ते मागच्या दाराने येऊन विजयी झालेत, असा आरोप प्रणिती शिंदेंनी केलाय. EVMमध्ये छेडछाड झाल्याचा संशयही त्यांनी यावेळी बोलताना केलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
2 Dec 2024, 08:55 वाजता
शिवशाही बससेवा कायचमी बंद होणार?
Shivshahi Bus Service : शिवशाही बससेवा कायमची बंद होणार असल्याची शक्यताय. वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनानं शिवशाही बससेवा थांबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय. शिवशाहीच्या गाड्यांमध्ये तांत्रिक दोष असल्याचं निष्पन्न झालंय. त्यामुळे बसच्या अंतर्गत आणि बाह्य रचनेत आवश्यक तो बदल करून त्याचं रुपांतर साध्या बसमध्ये अर्थात लालपरीत करण्यात येणारेय. एसटीच्या वरिष्ठ अधिका-याकडून ही माहिती मिळालीये. त्यामुळे येत्या महिन्यांतच शिवशाहीची चाकं कायमची थांबणारेय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
2 Dec 2024, 07:35 वाजता
संभाजीनगरमध्ये शिवसेना UBTचं आंदोलन
Sambhajinagar Shivsena UBT Protest : बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आंदोलनाची हाक पुकारलीय. बांगलादेशात हिंदूवर अन्याय, अत्याचार होत आहे आणि केंद्र सरकार शांत बसून पाहात आसल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय. याचा निषेध करण्यासाठी आज शहरातील क्रांती चौकात आंदोलन केलं जाणारेय. या आंदोलनात सहभागी व्हावं, असं आवाहन अंबादास दानवेंनी ट्विटरवरून केलंय.
2 Dec 2024, 07:21 वाजता
राज्यात थंडी ओसरली, चक्रीवादळाचा फटका
Maharashtra Cold Wave : राज्यभरात थंडी कमी झालीय. रविवारी ढगाळ वातावरण तयार झाल्यामुळे किमान तापमानात वाढ झालीय , किमान तापमान हे 11 अंश सेल्सिअसपर्यंत वाढलंय. बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे राज्यात आजही हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. 8 डिसेंबरपासून पुन्हा एकदा थंडीत वाढ होण्याची शक्यताही वर्तवण्यात आलीय.
2 Dec 2024, 07:17 वाजता
महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेचा मोठा निर्णय
6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त असंख्य अनुयायी मुंबईत दाखल होतील. तेव्हा होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वने काही रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिट विक्री तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 2 ते 9 डिसेंबर या कालावधीत ही बंदी लागू असणार आहे. (Mumbai Local Train)
हेसुद्धा वाचा : Mumbai Local Train: महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेचा मोठा निर्णय; मध्य रेल्वेच्या काही स्थानकांत...