18 Dec 2024, 20:15 वाजता
मुंबईतील बुचर आयलँडजवळ बोटीला अपघात, 13 जणांचा मृत्यू
Elephanta : बोट दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू...बुचर आयलँडजवळ बोटीला अपघात 13 जणांचा मृत्यू...बोटीतील 101 जणांना वाचवलं...नीलकमल बोटीला अपघात 13 जणांचा मृत्यू...मृतांमध्ये नेव्हीच्या 3 कर्मचा-यांचा समावेश...2 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती.- मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत...नेव्हीच्या स्पीड बोटीच्या टेस्टिंगवेळी दुर्घटना...जास्त क्षमतेच्या इंजिनमुळं अपघात...जास्त क्षमतेच्या इंजिनमुळं बोटीवरील नियंत्रण सुटलं
18 Dec 2024, 19:28 वाजता
आमदार रणधीर सावरकर भाजपचे विधानसभेतील नवे मुख्य प्रतोद
Randhir Sawarkar : भाजपकडून विधानसभेतील मुख्य प्रतोदांची घोषणा... आमदार रणधीर सावरकर भाजपचे विधानसभेतील नवे मुख्य प्रतोद...मागच्या कार्यकाळात आमदार आशिष शेलार होते भाजपचे मुख्य प्रतोद....शेलारांची मंत्रिपदी नेमणूक झाल्याने सावरकर यांच्यावर जबाबदारी
बातमीचा व्हिडीओ पाहा-
18 Dec 2024, 18:09 वाजता
गेट वेहून एलिफंटाकडे जाताना बोट उलटली, एकाचा मृत्यू
Elephanta boat Rescue Operation : एलिफंटाकडे जाणारी बोट उलटली...गेट वेहून एलिफंटाकडे जाताना बोट उलटली...अपघातात एकाचा मृत्यू...बोटीत 80 प्रवासी असल्याची माहिती...आतापर्यंत 21 जणांना बाहेर काढण्यात आलंय... एका बोटीचा दुस-या बोटीला धक्का लागल्यानं बोट उलटल्याची माहिती..अडकललेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू
18 Dec 2024, 17:37 वाजता
राहुल गांधींची आज पत्रकार परिषद
Rahul Gandhi : राहुल गांधींची दिल्लीत आज पत्रकार परिषद होणार...दिल्लीत 6.30 वाजता राहुल गांधींची पत्रकार परिषद...राहुल गांधी काय बोलणार याकडे लक्ष
18 Dec 2024, 17:11 वाजता
गेट वेहून एलिफंटाकडे जाताना बोट उलटली
Mumbai Elephanta : एलिफंटाकडे जाणारी बोट उलटली...गेट वेहून एलिफंटाकडे जाताना बोट उलटली...बोटीत 30 हून अधिक प्रवासी असल्याची माहिती...एका बोटीचा दुस-या बोटीला धक्का लागल्यानं बोट उलटल्याची माहिती
18 Dec 2024, 16:25 वाजता
दिल्लीत अमित शाहांची आज पत्रकार परिषद
Amit Shah : दिल्लीतील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेणार..अमित शाह संध्याकाळी ५.३० वाजता पत्रकार परिषद घेणार
18 Dec 2024, 16:07 वाजता
भाजपचे आमदार उद्या रेशीमबागेत जाणार
BJP : भाजपचे आमदार उद्या रेशीमबागेत जाणार... हेडगेवार आणि गोळवलकरांना अभिवादन करणार...भाजपातील सर्व नेते संघ मुख्यालयात जाणार... अजित पवार संघ मुख्यालयात जाणार का?'
बातमीचा व्हिडीओ पाहा-
18 Dec 2024, 15:41 वाजता
एक देश एक निवडणूक विधेयक JPCकडे
One Nation One Election : एक देश एक निवडणूक विधेयक JPC कडे पाठवण्याचा निर्णय...याबाबत JPC (संयुक्त संसदीय समिती) स्थापन...एक देश एक निवडणूक विधेयक JPCकडे...विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे...JPC विधेयकात प्रियंका गांधी, मनीष तिवारी सदस्य... शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे सदस्य
बातमीचा व्हिडीओ पाहा-
18 Dec 2024, 15:04 वाजता
गुणरत्न सदावर्ते यांच्यावर अबीर फेकला
Gunratan Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांच्यावर अबीर फेकला...तुळजापुरात सदावर्तेंविरोधात मराठा कार्यकर्त्यांचं आंदोलन
18 Dec 2024, 13:43 वाजता
महायुतीत कुठल्याही खात्यावरुन, पदावरुन संघर्ष नाही - शिंदे
Nagpur Eknath Shinde : आमच्यात कुठल्याही खात्यावरून, पदावरून संघर्ष नाही, भांडणं नाहीत असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. इतकंच नाही तर कोणतं खातं मिळतं यापेक्षा महाराष्ट्राला काय मिळणार, महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळणार याची आम्हाला चिंता आहे असंही एकनाथ शिंदे म्हणाले