18 Dec 2024, 07:38 वाजता
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव, चिन्हाची सुनावणी लांबणीवर
NCP Party Name & Symbol : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि 'घड्याळ' चिन्हासंबंधी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा लांबणीवर गेलीय. द्विसदस्यीय खंडपीठापुढे हे प्रकरण सूचिबद्ध करण्यात आलं होतं. मात्र वेळेअभावी सुनावणी होऊ शकली नाही. त्यानंतर पुढील सुनावणी 7 जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव व 'घड्याळ' चिन्हाचा फैसला आता नवीन वर्षात होणार आहे.