31 Dec 2024, 19:18 वाजता
'सुरेश धसांचा विषय माझ्याकडून संपला',अभिनेत्री प्राजक्ता माळीचं विधान
Prajakta Mali on Suresh Dhas : सुरेश धसांचा विषय माझ्याकडून संपला..अभिनेत्री प्राजक्ता माळीचं विधान...प्राजक्ता माळींनी मानले सुरेश धसांचे आभार...कालच सुरेश धसांनी केली होती दिलगिरी व्यक्त
बातमीचा व्हिडीओ पाहा-
31 Dec 2024, 18:37 वाजता
शिवसेना विभागप्रमुख कुणाल सरमळकरांना जीवे मारण्याची धमकी
Threatening Letter To Kunal Sarmalkar : शिवसेना विभागप्रमुख कुणाल सरमळकरांना जीवे मारण्याची धमकी...वांद्रे येथील कार्यालयात धमकीचं पत्र...निर्मलनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल...राजकिय पूर्ववैमन्यसातून ही धमकी आली असल्याचा सरमळकर यांचा दावा... या प्रकरणी निर्मल नगर पोलिस अधिक तपास करत आहेत.
31 Dec 2024, 17:41 वाजता
वाल्मिक कराडवर मोक्का लावा- संभाजीराजे
Sambhajiraje Chhatrapati : वाल्मिक कराडवर मोक्का लावा- संभाजीराजे...खंडणीचा गुन्हा नको, मकोका लावा-संभाजीराजे...खंडणीच्या गुन्ह्यात कराड बाहेर येतील...धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या- संभाजीराजे... 'धनंजय मुंडेंना पालकमंत्री करू नका'
31 Dec 2024, 16:50 वाजता
संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना सोडणार नाही- फडणवीस
Devendra Fadnavis on Santosh Deshmukh : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकरांना सोडणार नसल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीये. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत असून या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.. तर सीआयडीवर कुणाचाही दबाव चालणार नसल्याचाही इशारा फडणवीसांनी दिलाय...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
31 Dec 2024, 16:25 वाजता
वाल्मिक कराडला घेऊन CID केजकडे रवाना
Walmik Karad : वाल्मिक कराडला घेऊन सीआयडी अधिकारी केजकडे रवाना...सीआयडीचे अधिकारी वाल्मिकला घेऊन निघाले
31 Dec 2024, 15:09 वाजता
वाल्मिक कराडचे फोन कॉल तपासा- मनोज जरांगे
Manoj Jarange : या घटनेनंतर देशमुख कुटुंब दहशतीमध्ये आहे.. त्यामुळे या कुटुंबाला तातडीनं सुरक्षा पुरवावी अशी मागणी मनोज जरांगेंनी केलीये.. वाल्मिक कराडचे फोन कॉल तपासण्याची मागणी केली आहे.. या प्रकरणाला जातीय रंग देण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केलाय..
31 Dec 2024, 13:56 वाजता
वाल्मिक कराडचा CDR तपासा - वैभवी देशमुख
Vaibhavi Deshmukh On Walmik Karad: वाल्मिक कराड यांचा CDRतपासा अशी मागणी संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख यांनी केलीये..
31 Dec 2024, 13:54 वाजता
सरकारनं इतर आरोपींना अटक करावी - धनंजय देशमुख
Dhananjay Deshmukh Reaction : वाल्मिक कराड CIDला शरण आल्यानंतर संतोश देशमुख यांच्या भावानं पहिली प्रतिक्रिया दिलीये.. सरकारनं इतर आरोपींनाही अटक करावी अशी मागणी धनंजय देशमुखांनी केलीये.. सरकार या प्रकरणात कारवाई करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
31 Dec 2024, 12:49 वाजता
वाल्मिक कराड पुणे CIDसमोर शरण
Pune Walmik Karad : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी बातमी समोर आलीये. खंडणी प्रकरणातील वाल्मिक कराड सीआयडीला शरण आलाय. संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचा आरोप देशमुख कुटुंब तसेच विरोधी पक्षाकडून केला जात होता. गेल्या अनेक दिवसांपासून वाल्मिक कराडचा शोध घेतला जात होता. आज अखेर वाल्मिक कराडने पोलिसांसमोर शरण गेलाय. आता सीआयडी आणि पुणे पोलीस वाल्मिक कराडची कसून चौकशी करणार आहेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
31 Dec 2024, 12:31 वाजता
किरीट सोमय्यांचा खळबळजनक आरोप
Kirit Somaiya : मालेगावमध्ये बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचा कारखाना सुरु असल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्यांनी केलाय.. मालेगावात चार महिन्यांपासूनच व्होट जिहाद २ची सरुवात झाल्याचं ते म्हणालेत.. वर्षभरात मालेगावात हजारो बोगस जन्मदाखले दिल्याचा आरोपही त्यांनी केलाय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -