Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JULY 02 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

2 Jul 2024, 12:04 वाजता

अंबादास दानवेंचं निलंबन करा-प्रसाद लाड

 

Prasad Lad On Ambadas Danve : विधान भवनाच्या पाय-यांवर प्रसाद लाड यांनी ठिय्या आंदोलन केलंय...विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या राजीनाम्याची मागणी प्रसाद लाड यांनी केलीय...सभागृहात शिवीगाळ केल्याप्रकरणी दानवेंचं निलंबन करा, दानवेंनी माफी मागावी अशी मागणी लाड यांनी केलीय...तर आंदोलन करून काय होणार नाही...राजीनाम्याची मागणी सभापतींकडे जाऊन करावी...आता भाजपला कायदे आणि नियम आठवू लागलेयत...प्रसाद लाड यांना काय करायचं ते करू द्या असा पलटवार दानवेंनी केलाय...

2 Jul 2024, 10:56 वाजता

आचार्य मराठे कॉलेजचा आणखी एक फतवा

 

Chembur Aacharya Marathe College : हिजाब, बुरखा, नकाब, टोपी यावर बंदी घालणाऱ्या चेंबूरच्या आचार्य मराठे कॉलेजने आणखी एक फतवा काढलाय...यापुढे जीन्स किंवा टी शर्ट विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये घालून येता येणार नाहीत असा फतवा काढलाय...मुंबई उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयात कॉलेजमध्ये बुरखा किंवा हिजाब, टोपी घालून येता येणार नाही असे म्हटले होतं. त्याचाच आधार घेत 27 जून रोजी नोटीस जारी करत विद्यार्थ्यांनी ड्रेस कोडचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच औपचारिक आणि सभ्य कपडे घालण्याचंही यात नमूद केलंय...विशेष म्हणजे ज्या पोशाखातून धर्माचे प्रदर्शन होईल किंवा सांस्कृतिक विषमता दाखवेल असे कपडे घालता येणार नाहीत...तसेच कॉलेज कॅम्पसमध्ये जीन्स टी शर्ट,आणि जर्शी घालण्यास मज्जाव करण्यात आलाय..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

2 Jul 2024, 10:37 वाजता

सलमान खानला मारण्यासाठी 25 लाखांची सुपारी

 

Salman Khan : सलमान खानला मारण्यासाठी बिश्नोई गँगकडून 25 लाखांची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती आरोपींविरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रातून समोर आलीय...नवी मुंबई पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले असून बिश्नोई गँगच्या या हल्ल्याचा कट समोर आलाय...बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या घरावर एप्रिल महिन्यात गोळीबार करण्यात आला होता...यातील आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलंय...सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पाकिस्तानकडून आधुनिक शस्त्रे विकत घेण्याची योजना आखली होती. त्याशिवाय, ज्या शस्त्राने गायक सिद्धू मुसेवाला याची हत्या करण्यात आली, ते मेड इन तुर्की असलेले जिगना शस्त्रही खरेदी करण्याची तयारी करण्यात आली होती अशी धक्कादायक माहिती समोर आलीय...तसंच जवळपास 60 ते 70 लोक सलमान खानच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवत होते. हत्या केल्यानंतर परदेशात पळून जाण्याचाही आरोपींचा कट होता...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

2 Jul 2024, 09:51 वाजता

पर्यटन स्थळासाठी नियमावली जाहीर

 

Lonavala : लोणावळ्यातील धबधब्यात अन्सारी, सय्यद कुटुंबीय वाहून गेल्यानंतर प्रशासनाला जाग आलीय. राज्यात पर्यटन स्थळांसाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली. संध्याकाळी 6 वाजल्यानंतर पर्यटकांना पर्यटनस्थळी फिरण्यास मज्जाव करण्यात आले आहे. दुर्लक्ष करणा-या पर्यटकांवर कारवाई केली जाणारेय. तर हुल्लडबाज पर्यटकांवर आणि बेजबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याचे आदेश थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. तर लोणावळ्यात विशेष नियमावली तयार केली जाणार असल्याचं पुण्याच्या जिल्हाधिका-यांनी म्हटलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

2 Jul 2024, 09:49 वाजता

मावळ दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग

 

Maval Borad : भुशी डॅम दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग आलीय.  पाच जण वाहून गेल्यानंतर आता या धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर आणि जंगल परिसरात सूचना फलक लावण्यात येतायत. एकूण 10 बोर्ड या परिसरात लावण्यात येणारेत. दुर्घटना घडल्यानंतर तातडीने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार  सेंट्रल रेल्वे भुशी डॅम यांच्याकडून हे फलक लावण्यात येणारेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

2 Jul 2024, 09:48 वाजता

विधानपरिषदेसाठी निवडणूक अटळ?

 

Vidhan Parishad Election : विधानपरिषदेची निवडणूक आता अटळ मानली जातेय. परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असण्याची शक्यताय. महायुती 9 उमेदवार देण्याची शक्यताय. त्यात भाजपनं 5, शिंदे गटानं 2 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 2 जागांवर उमेदवार जाहीर केलेत. आता मविआही तिसरा उमेदवार देण्याची शक्यताय. काँग्रेसनं प्रज्ञा सातव आणि ठाकरे गटानं मिलिंद नार्वेकर असे दोन उमेदवार जाहीर केलेत. तर शेकापचे जयंत पाटील मविआचे तिसरे उमेदवार असण्याची शक्यताय. असं झाल्यास विधानपरिषदेची निवडणूक अटळ आहे.

2 Jul 2024, 09:22 वाजता

अंतरवालीत आंदोलनस्थळाची ड्रोननं टेहळणी?

 

Jalna Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी गावात केलेल्या आमरण उपोषण आंदोलन स्थळाची आणि जरांगे अधून मधून राहत असलेल्या अंतरवाली सराटी या गावच्या सरपंचाच्या घराची अज्ञात ड्रोनच्या साह्याने टेहाळणी केल्या जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. गावकऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली आहे.काल रात्री हा प्रकार समोर आला आहे

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

2 Jul 2024, 08:23 वाजता

नाशिक शिक्षकमधून किशोर दराडे विजयी

 

Nashik Kishor Darade : नाशिक शिक्षकमधून शिंदे गटाचे किशोर दराडे विजयी झालेयत...अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे आणि ठाकरे गटाच्या संदीप गुळवेंचा पराभव झालाय...पहिल्या आणि दुस-या पसंतीच्या मतमोजणीत शिंदे गटाचे किशोर दराडे आघाडीवरच होते...22 तासांच्या मतमोजणी नंतर दराडेंना विजयी घोषित करण्यात आलंय...त्यामुळे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी नाशिकमध्ये जल्लोष केलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

2 Jul 2024, 08:17 वाजता

कोकण पदवीधरमधून निरंजन डावखरे विजयी

 

Nirajan Davkhare : कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपच्या निरंजन डावखरे यांनी विजयाची हॅट्रिक केलीय.त्यांनी काँग्रेसच्या रमेश किर यांचा 1 लाख 719 मतांनी पराभव केलाय. कोकणातील पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी सलग तिस-यांदा दाखविलेल्या विश्वासाबद्दल निरंजन डावखरेंनी आभार मानलेत. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -