Horoscope 2025 : 'या' 5 राशींसाठी 2025 वर्ष अनलकी! आर्थिक संकटासह नात्यांमध्ये तणाव?

Horoscope 2025 : या वर्षातील 7 महिन्याला सुरुवात झाली आहे. 2025 हे नवीन वर्ष सुरु होण्यास अवघे 5 महिने राहिले आहेत. अशात 2025 वर्ष काही राशींसाठी अशुभ ठरणार आहे, असं ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ सांगतात. 

नेहा चौधरी | Updated: Jul 6, 2024, 04:03 PM IST
Horoscope 2025 : 'या' 5 राशींसाठी 2025 वर्ष अनलकी! आर्थिक संकटासह नात्यांमध्ये तणाव? title=
Unlucky year 2025 for these 5 zodiac signs Stress in relationships with financial crisis

Horoscope 2025 unlucky zodiac signs : प्रत्येकाला वाटत आपल्या आयुष्यात संपत्ती, सुख आणि करिअरमध्ये प्रगती मिळावी. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही संकट असतात. नात्यांमध्ये तणाव तर कधी पैशांची चणचण तर कोणाच्या करिअरमध्ये चढ उतार. अशावेळी हे वर्ष संपायला अवघ्ये पाच महिने उरले असताना येणार नवीन वर्ष 2025 तरी आपल्यासाठी चांगल असेल का? असा प्रश्न पडतो. अशात येणार नवीन वर्ष हे कोणत्या राशीच्या लोकांसाठी अनलकी ठरणार आहे, ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ काय सांगतात जाणून घ्या. (Unlucky year 2025 for these 5 zodiac signs Stress in relationships with financial crisis)

मिथुन रास (Gemini Zodiac)

वर्ष 2025 मिथुन राशीच्या लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. या लोकांना कौटुंबिक समस्यांना सामोरे जावं लागणार आहे. मेहनत करुनही कामात तुम्हाला योग्य परिणाम मिळणार नाहीत. कुटुंबातील सदस्यांमध्ये अहंकारामुळे वाद वाढणार आहे. तुम्हाला आर्थिक समस्यांनाही तोंड द्यावे लागणार आहे. 

कर्क रास (Cancer Zodiac)   

या राशीच्या लोकांना 2025 मध्ये कौटुंबिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागणार आहे. तुमच्या कौटुंबिक आनंदात लक्षणीय घट होणामर आहे. तर कुटुंबातील सदस्यांसोबत अनेक समस्या निर्माण होणार आहे. नोकरीत योग्य परिणाम न मिळाल्याने तुमचं मन अस्वस्थ असणार आहे. 

धनु रास (Sagittarius Zodiac) 

या राशीच्या लोकांच्या कौटुंबिक जीवनात अनेक तणाव एकत्र येणार आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर समंजसपणाचा अभाव राहणार आहे. नोकरी आणि व्यवसायात चढ-उतार पाहिला मिळणार आहे. शिवाय काळानुसार परिस्थिती बदलणार आहे. तुम्हाला पैशाची चिंता सतावणार आहे. 

कुंभ रास (Aquarius Zodiac) 

या राशीच्या लोकांना 2025 मध्ये अप्रिय परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. काही लोक त्यांच्या कौटुंबिक समस्यांबद्दल संयम गमवणार आहेत. तर वर्षाच्या शेवटी, कुटुंबात शांतता असू शकते पण आर्थिक परिस्थिती देखील गडबडणार आहे. 

मीन रास (Pisces Zodiac)  

या राशीच्या लोकांना 2025 मध्ये आनंदाची कमतरता जाणवणार आहे. कामात यश मिळविण्यात तुम्हाला अडचणी येणार आहे. कौटुंबिक जीवनातही अनेक समस्या निर्माण होणार आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये गैरसमज वाढणार आहेत. यामुळे नात्यात गैरसमजही होण्याची दाट शक्यता आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)