Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JULY 02 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

2 Jul 2024, 22:35 वाजता

पुण्यात आढळला झिकाचा आणखी एक रुग्ण

 

Pune Zika Virus : राज्यात झिका व्हायरसचा शिरकाव झालाय...पुणे शहरात झिका व्हायरसच्या रुग्णांची संख्या 7 वर पोहोलीये.......झीकाच्या रुग्णांमध्ये 2 गर्भवती महिलांचाही समावेश आहे.....आषाढी वारी सुरू असतानाच झिका व्हायरसचा फैलाव प्रशासनाची डोकेदुखी ठरणारेय......या पार्श्वभूमीवर महानगर पालिकेनं प्रतिबंधात्मक उपाय सुरु केलेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

2 Jul 2024, 20:39 वाजता

यूपीच्या हाथरसमध्ये सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी, 116 जणांचा मृत्यू

 

Uttar Pradesh Hathras Stampede : उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये सत्संगादरम्यान चेंगराचेंगरीची घटना घडली... त्यात 116 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती इन्पेक्टर जनरल शलभ माथुर यांनी दिलीये... मृतांमध्ये महिलांची संख्या मोठी असल्याचं समजतंय.. हाथरसच्या रतिभानपूरमध्ये भोले बाबांचा सत्संग संपल्यानंतर ही दुर्घटना घडली... प्रत्येकालाच परत जाण्याची घाई असल्यानं चिंचोळ्या मार्गात चेंगराचेंगरी झाली... दुर्घटनेतील जखमी महिला आणि बालकांना एटा मेडिकल कॉलेजमध्ये भरती करण्यात आलंय...मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी समिती नेमलीये... तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केलंय... 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

2 Jul 2024, 19:52 वाजता

लाडकी बहीण योजना अर्जासाठी मुदतवाढ

 

Ladki Bahini Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या वयोमर्यादेत वाढ करण्यात आलीये...मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती दिलीये...तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठीच्या अर्जाला मुदतवाढ देण्यात आलीये...उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी याबाबत माहिती दिलीये...अनेक ठिकाणी होत असलेली गर्दी पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचं ते म्हणालेत...तर 30 ऑगस्टपर्यंत अर्ज करणा-या माताभगिनींनाही 1 जुलैपासून या योजनेचा लाभ मिळणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलंय...1 जुलै ते 15 जुलै असलेली अर्जाची मुदत आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आलीये...

2 Jul 2024, 18:41 वाजता

विधान परिषद 11 जागांसाठी 14 उमेदवार रिंगणात

 

Maharashtra Politics : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी एकूण 14 उमेदवार रिंगणात उतरलेत... सत्ताधारी महायुतीचे 9, तर विरोधी महाविकास आघाडीच्या 3 उमेदवारांनी आज अर्ज भरले... त्याशिवाय अरुण जगताप आणि अजय सिंह सेंगार या दोन अपक्षांनी अर्ज भरले. त्यामुळं 11 जागांसाठी एकूण 14 उमेदवारांनी अर्ज भरल्यानं आता निवडणूक अटळ आहे. उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. निवडणूक बिनविरोध करायची झाल्यास कोणते 3 उमेदवार अर्ज मागे घेणार, याची उत्सूकता सगळ्यांना आहे. निवडणूक झाल्यास मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होण्याची शक्यता आहे.

2 Jul 2024, 17:12 वाजता

उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी, 27 भाविकांचा मृत्यू

 

Hathras Accident : उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये सत्संगादरम्यान चेंगराचेंगरीची घटना घडलीये...27 भाविकांचा मृत्यू झालाय...25 महिला आणि 2 पुरूषांचा त्यात समावेश आहे...हाथसरच्या रतिभानपूरमधील भोले बाबाच्या सत्संगादरम्यान ही घटना घडलीये...जखमी झालेल्या 15 महिला आणि बालकांना एटा मेडिकल कॉलेजमध्ये भर्ती करण्यात आलंय...मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती गठीत केलीये...

2 Jul 2024, 16:37 वाजता

'...तर पक्षप्रमुख म्हणून माफी मागतो' ,उद्धव ठाकरेंचं वक्तव्य

 

Uddhav Thackeray on Ambadas Danve : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यामुळे महाराष्ट्रातल्या माताभगिनींचा अपमान झाला असेल, तर पक्षप्रमुख म्हणून आपण माफी मागतो अशी प्रतिक्रिया, उद्धव ठाकरे यांनी दिली. त्याचवेळी एखादा प्रस्ताव आल्यानंतर त्यावर चर्चा करणं गरजेचं असतं. मात्र एकतर्फी निर्णय घेणं लोकशाहीला धरुन नसल्याचंही ते म्हणाले. विधान परिषदेतील वादग्रस्त विधानावरुन दानवेंचं निलंबन करण्यात आलं, त्यावर ते बोलत होते. 

2 Jul 2024, 16:08 वाजता

विधानपरिषदेतून अंबादास दानवे 5 दिवसांसाठी निलंबित

 

Ambadas Danve : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना सभागृहात शिवराळ भाषा वापरणं भोवलंय. त्यांचं पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आलंय. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटलांनी निलंबनाचा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर उपसभापती डॉ. नीलम गो-हेंनी अंबादास दानवेंच्या निलंबनाचा निर्णय घेतला. निलंबनाच्या कारवाईचा निषेध करत गोंधळ घातला. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

2 Jul 2024, 13:37 वाजता

लाडकी बहीण योजनेवरुन विधानसभेत चर्चा

 

Vidhansabha Session : लाडकी बहीण योजनेवरून पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान सभेत सवाल उपस्थित केले...या योजनेला  अंतिम तारीख ठेवू नका, फक्त निवडणुकीपुरती योजना नको असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं..तर निवडणुकीपुरती योजना ही चुकीचं नरेटिव्ह असून, लाडकी बहीण योजना कायम सुरूच राहणार असल्याचं स्पष्टीकरण मंत्री शंभूराज देसाईंनी दिलंय...

2 Jul 2024, 12:53 वाजता

राजू शेट्टी दूध दरावरून आक्रमक

 

Raju Shetty : माजी खासदार राजू शेट्टी दूध दरावरून आक्रमक झालेत. अहमदनगरच्या राहुरीमध्ये दूध दरवाढीसाठी रास्तारोको केला जातोय. या आंदोलनात राजू शेट्टीही सभागी झालेत. दुधाला किमान 40 रुपये दर मिळावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत. त्यासाठी अहमदनगर-मनमाड या महामार्गावर आंदोलन सुरू आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

2 Jul 2024, 12:39 वाजता

NCCFचं पथक लासलगाव बाजार समितीत

 

Nashik : नवी दिल्ली कृषी विभागाकडून कांदा खरेदीच्या माहितीसाठी केंद्रीय पथक लासलगाव बाजार समितीत दाखल झालंय...यावेळी केंद्रीय पथकाकडून शेतक-यांशी चर्चा करण्यात आली...नाफेड एनसीसीएफच्या कांदा खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा शेतकरी संघटनेंचा आरोप आहे...मात्र, आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी माहिती घेण्यासाठी आलोय...नाफेड, एनसीसीएफच्या कांदा खरेदीच्या चौकशीसाठी आलो नसल्याची पथकातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिली...

बातमीचा व्हिडीओ पाहा -