Team India in Mumbai : वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाचं मुंबईत जंगी स्वागत

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JULY 04 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Team India in Mumbai : वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाचं मुंबईत जंगी स्वागत

4 Jul 2024, 10:56 वाजता

पंतप्रधान मोदींचा 13 जुलै रोजी मुंबई दौरा

 

Narendra Modi Mumbai Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 जुलैला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. लोकसभा निकालानंतर मोदींचा पहिल्यांच मुंबई दौरा असणारेय. गोरेगाव मुलुंड लिंक रोड आणि बोरिवली ठाणे लिंक रोड या भुयारी मार्गांचे भूमिपूजन आणि विविध विकासकांच्या भूमिपूजन मोदींच्या हस्ते होणारेय. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त होणारेय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

4 Jul 2024, 10:33 वाजता

Supriya Sule : अजित पवारांवरील भ्रष्टाचा-याच्या आरोपांवर उत्तर महाविकासआघाडीनं नाही तर महायुतीनंच द्यावं अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिलीय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

4 Jul 2024, 10:31 वाजता

Ajit Pawar : अजित पवारांनी ट्विटर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यामध्ये अर्थसंकल्पात सरकारने घेतलेल्या विविध योजनांचे गुणगाण गायले आहे. त्याचसोबत मधल्या काळात माझ्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले. पण एकही सिद्ध झाला नाही. आणि भविष्यातही सिद्ध होणार नाही असं सांगत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तुमची साथ हवी आहे असं आवाहनही अजित पवरांनी त्या व्हिडिओद्वार केलं आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

4 Jul 2024, 10:08 वाजता

मीरा-भाईंदरमध्ये ड्रग्जविरोधात कारवाई

 

Mira Bhyandar Drugs Seized : मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयात ड्रग्सविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत तब्बल 326 कोटी 69 लाख रुपयांचे एम.डी. ड्रग्स जप्त करण्यात आलंय.  याप्रकरणी अंडरवर्ल्डशी संबंधित असलेल्या आंतरराज्ययीय टोळीतील 15 आरोपींना विविध राज्यातून अटक करण्यात आलीये. पोलिसांनी या आरोपींकडून तीन पिस्तूल, एक रिवॉलर आणि 33 जिवंत काडतुस हस्तगत केल्या आहेत. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

4 Jul 2024, 08:51 वाजता

राज्यावरील पाणीसंकट आणखीन गडद

 

State Water Shortage : यंदा राज्यात मान्सून वेळेआधीच दाखल झाला असला तरी अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाहीये.. दोन जुलैपर्यंत राज्यातील प्रमुख धरणांतील एकूण पाणीसाठा केवळ 21.84% एवढाच आहे.. पुणे आणि औरंगाबाद  विभागात सर्वात कमी पाणीसाठा शिल्लक राहीलाय तर अमरावती आणि विदर्भातील जलसाठा समाधानकारक आहे.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

4 Jul 2024, 08:39 वाजता

राज्यात 2 महिन्यांत झिकाचे 8 रुग्ण

 

Zika Virus Update : राज्यात गेल्या 2 महिन्यांत झिकाचे 8 रुग्ण आढळून आलेत.. तर आतापर्यंत राज्यात सापडलेल्या रुग्णांची संख्या 19वर गेलीये...पावसाळा सुरू झाल्याने झिकाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.. त्यामुळे राज्यातील सर्व महानगरपालिकांना सतर्क राहण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिलेत. तसेच रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन सर्व महानगरपालिकांमधील वैद्यकीय अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबबत मार्गदर्शनही करण्यात आलेत..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

4 Jul 2024, 08:35 वाजता

NEET पेपरफुटी प्रकरणात CBI अ‍ॅक्शन मोडवर

 

Neet Paper Leak Update : NEET पेपरफुटी प्रकरणात सीबीआय अ‍ॅक्शन मोडवर आलंय. आरोपी संजय जाधव आणि जलील पठाण यांची सीबीआयने 12 तास कसून चौकशी केली. तसंच CBI पथकाने दोन्ही आरोपींना लातूर शहरातील इरण्णा कोनगलवारच्या बंद घरात नेलं आणि यावेळी पथकाने घराची झडती घेतल्याचीही माहिती मिळतेय.. न्यायालयाने आरोपींना सहा तारखेपर्यंत सीबीआय कस्टडी दिलीय. त्यामुळे  धागेदोरे शोधण्याचं मोठं आव्हान CBI कडे आहे.  

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

4 Jul 2024, 08:21 वाजता

टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियाचं मायदेशी आगमन

 

Team India : टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर टीम इंडिया आज सकाळी विशेष विमानानं दिल्लीत दाखल झाली. भारतीय संघानं 29 जूनला वेस्ट इंडिजच्या बार्बाडोस इथं रंगलेल्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या आनंदाला उधाण आलंय. वर्ल्डकप जिंकल्यापासून टीम इंडिया भारतात कधी दाखल होणार, याचीच उत्सुकता सर्वांना लागली होती. अखेर टीम इंडियाचं आज सकाळी 6 वाजता दिल्ली विमानतळावर आगमन झालं. दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर एक-एक करुन भारतीय संघाचे खेळाडू बाहेर आले. त्यावेळी भारताचा कर्णधार रोहित शर्मानं तमाम भारतीय क्रिकेटप्रेमींचे डोळे जी गोष्ट पाहण्यासाठी आसुसले होते, तो वर्ल्डकप दाखवला. वर्ल्डकप पाहून विमानतळावरील क्रिकेटप्रेमींनी एकच जल्लोष केला. त्यानंतर टीम इंडियाचं दिल्लीच्या आयटीसी मौर्य हॉटेलमध्येही जल्लोषात स्वागत झालं. चाहत्यांच्या गराड्यात खेळाडूंनी हॉटेलमध्ये प्रवेश केला. टीम इंडियासाठी इथं एक खास केक देखील तयार करण्यात आलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -