Team India in Mumbai : वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाचं मुंबईत जंगी स्वागत

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JULY 04 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Team India in Mumbai : वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाचं मुंबईत जंगी स्वागत

4 Jul 2024, 20:31 वाजता

मुंबईत टीम इंडियाची विजयी मिरवणूक, टीम इंडियाकडून ट्रॉफी उंचावून अभिवादनाचा स्वीकार

 

Team India in Mumbai : भारतातले तमाम क्रीडाप्रेमी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण येऊन ठेपलाय. टी-20 विश्वचषक जगज्जेता टीम इंडियाची विजयी मिरवणूक सुरू... नरिमन पॉईंट ते वानखेडे विजयी मिरवणूक.. आपल्या लाडक्या विजेत्या क्रिकेटपटूंच्या स्वागतासाठी मुंबईतील नरिमन पॉईंट परिसरात क्रिकेटप्रेमींनी तुफान गर्दी केलीय... हे चॅम्पियन्स विशेष बसनं हॉटेल ट्रायडंटमधून वानखेडे स्टेडियमच्या दिशेनं रवाना ... विजेत्या टीमची झलक पाहण्यासाठी नरिमन पॉईंट परिसरात क्रिकेटप्रेमींनी तुफान गर्दी केलीय.. मरिन ड्राईव्हवर क्रिकेटप्रेमींचा महासागर.. क्रिकेटप्रेमींनी फुलला क्विन्स नेकलेस. भारतीय टीमचं क्रिकेटप्रेमींकडून अभिनंदन.. टीम इंडियाकडून ट्रॉफी उंचावून अभिवादनाचा स्वीकार.. विशेष बसमधून ते वानखेडे स्टेडियमवर पोहोचतील.. त्याठिकाणी विश्वविजेत्या टीमचा जंगी सत्कार करण्यात येईल. हा सोहळा पाहण्यासाठी वानखेडेवरही क्रिकेटप्रेमींची तोबा गर्दी केलीय.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

4 Jul 2024, 17:46 वाजता

मुंबई विमानतळावर विश्वचषकाचा जगज्जेता भारती क्रिकेट संघाचं जंगी स्वागत

 

Team India in Mumbai : भारतातले तमाम क्रीडाप्रेमी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण येऊन ठेपलाय. टी-20 विश्वचषकाचा जगज्जेता भारती क्रिकेट संघ मुंबई विमानतळावर दाखल झालाय. आपल्या लाडक्या विजेत्या क्रिकेटपटूंचं क्रिकेटप्रेमींनी जोरदार स्वागत केलं. मुंबई विमानतळासह, ज्या मार्गाने टीम इंडियाची बस जाणार आहे, त्या मार्गावर चाहत्यांची गर्दी झालीय. हे चॅम्पियन्स वानखेडे स्टेडिअमवर विशेष बसनं पोहोचणार आहेत. त्या वानखेडेवरही क्रिकेटप्रेमींची गर्दी झालीय...

4 Jul 2024, 14:44 वाजता

वसंत मोरे शिवसेना ठाकरे गटात दाखल

 

Vasant More : पुण्याचे वसंत मोरे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दाखल झालेत.. 9 जुलैला ते ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.. मातोश्रीवर त्यांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली.. यावेळी खासदार संजय राऊतही उपस्थीत होते.. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने महाविकास आघाडीमध्ये उमेदवार दिल्याने वसंत मोरे यांना उमेदवारी मिळू शकली नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीकडून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. आता आगामी विधानसभा निवडणुक ते ठाकरे गटाकडून लढण्याची शक्यता आहे...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

4 Jul 2024, 12:50 वाजता

ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात 2 पोलीस कर्मचारी निलंबित

 

Pune Lalit Patil Drugs Case : ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात 2 पोलीस कर्मचा-यांना निलंबित करण्यात आलंय.. हवालदार आदेश शिवणकर आणि पिराप्पा बनसोडे अशी या दोघांची नावं आहेत.. ललीत पाटील पळून गेल्याची माहिती नियंत्रण कक्षास तीन तास उशीरा दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय.. तसंच ललीत पाटील एक्स रे काढण्यासाठी गेला तेव्हा दोघेही पोलीस कर्मचारी त्याच्या सोबत नव्हते असंही तपासात निष्पन्न झालंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

4 Jul 2024, 12:43 वाजता

देशाचा पंतप्रधान सर्वात मोठा बुवा - संजय राऊत

 

Sanjay Raut : देशाचा पंतप्रधान सर्वात मोठा बुवा महाराज आहे. ते गुहेत जाऊन स्वत:ला बाबा म्हणून घेतात, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलाय. देवाचा आवतार म्हणून घेणं ही भोंदूगिरीच, असा हल्लाबोलही राऊतांनी केलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

4 Jul 2024, 12:28 वाजता

Ajit Pawar Vs Sanjay Raut : राजकारणात आल्यापासून मी कोणताही पक्ष बदललेला नाही. पहिल्या दिवसापासून राज्यातील जनता हाच माझा पक्ष राहिलेला आहे. मी पूर्वीही जनतेचाच होतो आणि आजही जनतेचाच आहे”, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय. तर अजितदादांनी पक्ष बदलला नाही तर चोरला असल्याचा टोला संजय राऊतांनी लगावलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

4 Jul 2024, 12:13 वाजता

संभाजीराजे ऑनलाईन गेमिंगविरोधात आक्रमक

 

Sambhajiraje On Online Gaming : छत्रपती संभाजीराजे ऑनलाईन गेमिंगविरोधात आक्रमक झालेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संवेदना विसरल्यात का? असा सवा त्यांनी केलाय. ऑनलाईन गेमिंग बंद करा अन्यथा 9 जुलैला यासंदर्भात जाब विचारण्यासाठी विधान भवनात येणार असा इशारा त्यांनी दिलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

4 Jul 2024, 11:51 वाजता

Hingoli : हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातल्या भाटेगावात लाडकी बहीण योजनेसाठी ग्रामस्थांची अडवणूक होत असल्याचा आरोप होतोय. ग्रामसेवक मुकुंद घनसावंत यांनी घरपट्टी भरा तरच कागदपत्रं मिळतील असं सांगितल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. ग्रामसेवक मुकुंद घनसावंत यांच्याशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

4 Jul 2024, 11:39 वाजता

काँग्रेस नेते सुनील केदार यांना दिलासा नाहीच

 

Nagpur Sunil Kedar : नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी सुनिल केदारांना मोठा धक्का बसलाय.. सुनिल केदारांना शिक्षेस स्थगिती देण्यास हायकोर्टानं नकार दिलाय.. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केदारांना मोठा धक्का मानला जातोय..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

4 Jul 2024, 11:37 वाजता

कृषी मंत्रालयात 118 कोटींचा घोटाळा?

 

Supriya Sule : राज्य सरकारच्या कृषी मंत्रालयात 118 कोटींचा घोटाळा झालाय असा आरोप संघाच्याच कृषी संघटनेनं केल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळेंनी दिलीय. या संदर्भात संघाच्या कृषी संघटनेनं देवेंद्र फडणवीसांकडे चौकशीची मागणी केली मात्र 30 दिवस झाले तरीही याची चौकशी झाली नाही.. त्यामुळे हे प्रकरण आम्ही लोकसभेत मांडणार होतो. मात्र आम्हाला वेळ दिली नाही असा आरोप सुप्रिया सुळेंनी केलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -