Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JULY 07 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

7 Jul 2024, 22:16 वाजता

सिंधुदुर्ग, रत्नागिरीत कॉलेज-शाळांना सुट्टी जाहीर

 

Kokan Rain : सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, तसंच महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ही घोषणा केली. कोकणाला मुसळधार पावसानं तडाखा दिला. त्या पार्श्वभूमीवर दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या जिल्हाधिका-यांना हे आदेश दिले. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

7 Jul 2024, 21:21 वाजता

वरळी हिट अँड रनप्रकरणी 2 जणांना अटक

 

Worli Hit and Run Case : पुण्यानंतर आता मुंबईत हिट अँड रनची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीचे वडील आणि शिंदे गटाचा उपनेता राजेश शाह, तसंच चालक राजऋषी बिडावत या दोघांना अटक केली आहे. तर राजेश शहाचा मुलगा आणि मुख्य आरोपी मिहिर शाह फरार असून पोलीस त्याचा शोध घेताहेत. वरळी नेहरु तारांगण परिसरात हा अपघात घडला. सकाळी प्रदीप नाकवा पत्नीसहित मासे आणण्यासाठी दुचाकीवरुन जात होते. त्यावेळी मागून आलेल्या मिहिर शाहच्या भरभाव BMW कारनं त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. तेव्हा दुचाकीवरचं नाखवा दाम्पत्य बोनेटवर आदळलं... ब्रेक मारल्यावर हे दाम्पत्य बोनेटवरुन खाली पडलं.. प्रदीप नाखवा कारच्या कडेला पडले... मात्र कारखाली सापडलेल्या आपल्या पत्नीला बाहेर खेचणार तोच मिहिर शाहाने गाडी पळवली.. BMW कारसोबत महिलेला फरफटत नेलं.. गंभीर जखमी झालेल्या महिलेला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं.. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टर्सनी कावेरी नाखवा यांना मृत घोषीत केलं..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

7 Jul 2024, 20:15 वाजता

सोलापुरात लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांची लूट, 2 जणांवर गुन्हा दाखल

 

Solapur Ladki Bahin Yojna : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांकडून पैसे घेणा-यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय....सोलापुरातील प्रगती नेट कॅफे आणि योगेश्वर नेट कॅफेच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय...लाभार्थी महिलांकडून 100 ते 200 रुपये या नॅट कॅफे चालकांनी घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे....त्याचबरोबर संबंधीत सायबर कॅफे चालकांकडे अधिकृत ई-सेवा केंद्राची परवानगी नसल्याचंही समोर आलंय..

बातमीचा व्हिडीओ पाहा- 

7 Jul 2024, 19:28 वाजता

वीज कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, वीज कर्मचाऱ्यांना भरघोस वेतनवाढ

 

Salary increase for electricity employees : वीज कर्मचा-यांसाठी खुशखबर...तिन्ही कंपन्यांच्या वेतनात भरघोस वाढ...उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा...मूळ वेतनात 19 टक्के तर सर्व भत्त्यांमध्ये 25 टक्के वेतनवाढ....सह्याद्री अतिथीगृह येथे वीज कंपनीच्या महापारेषण, महानिर्मिती, महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचा-यांच्या वेतन पुर्ननिर्धारण बैठकीत निर्णय...तांत्रिक कर्मचा-यांचा भत्ता 500 वरून 1000 रुपयांवर

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

7 Jul 2024, 19:05 वाजता

'बहिणींना देता तेवढं दाजींना पण द्या', अमोल कोल्हेंची राज्य सरकारवर टीका

 

Amol Kolhe : खासदार अमोल कोल्हेंनी सरकारवर निशाणा साधलाय. सरकारने लाडकी बहीण योजना चालू केली ही चांगली बाब आहे,मात्र त्याच बहीणीचं म्हणण असेल बहीण म्हणून जेवढं देता तेवढं दाजींना पण द्या. असा टोला कोल्हेंनी सरकारला लागवलाय. तर दाजींच्या शेतमालाला भाव द्या,दुधाला भाव द्या. तसेच ताई आणि दाजींच्या मुलांच्या शिक्षणासाठी सवलत द्या अशी मागणी बहीणी करत असतील असा खोचक टोला त्यांनी लगावला...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

7 Jul 2024, 18:18 वाजता

वरळी हिट अँड रन प्रकरणातील CCTV फुटेज समोर

 

Worli Hit and Run Case : मुंबईतील वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिर शाह बारमधून बाहेर पडतानाचं CCTV फुटेज झी २४ तासच्या हाती आलं आहे. दुर्घटनेपूर्वी मिहिर शाह दारू प्याल्याचं समोर आलंय. रात्री जुहूमधील ग्लोबल तपास बारमध्ये आरोपी मिहिर शाह यानं आपल्या इतर मित्रांसोबत दारू पार्टी केली. त्याचं तब्बल 18 हजार 730 रुपयांचं बिल झालं होतं. त्या बिलाचे पैसे त्यानं व्हिजा कार्ड वापरुन ऑनलाईन भरले होते. 

7 Jul 2024, 17:29 वाजता

वरळी हिट अँड रन प्रकरण, RTO अधिकाऱ्यांकडून गाडीची तपासणी

 

Worli Hit and Run Case : RTO अधिका-यांकडून अपघातग्रस्त BMW गाडीची तपासणी करण्यात आली. याच गाडीनं नाकवा दाम्पत्याच्या दुचाकीला धडक दिली. त्यात महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. RTO अधिका-यांनी या गाडीच्या क्षमतेची तसंच एकंदर परिस्थितीची पाहणी केली. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

7 Jul 2024, 16:18 वाजता

वरळी हिट अँड रन प्रकरण, आरोपीनं दुर्घटनेपूर्वी केलं होतं मद्य प्राशन

 

Worli Hit and Run Case : मुंबईतील वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी दुर्घटनेपूर्वी दारू प्याल्याचं समोर आलंय. रात्री जुहूमधील ग्लोबल तपास बारमध्ये आरोपी मिहिर शाह यानं आपल्या इतर मित्रांसोबत दारू पार्टी केली. त्याचं तब्बल 18 हजार 730 रुपयांचं बिल झालं होतं. त्या बिलाचे पैसे त्यानं व्हिजा कार्ड वापरुन ऑनलाईन भरले होते. 

7 Jul 2024, 13:30 वाजता

नाशिकमध्ये अजित पवार गटाला धक्का

 

Ajit Pawar : नाशिकमध्ये अजित पवारांना मोठा धक्का बसलाय...अजित पवार गटाचे नाशिकचे शहराध्यक्ष नानासाहेब महाले यांच्या सोबत 100 कार्यकर्ते आज बारामतीच्या गोविंद बागेत शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

7 Jul 2024, 12:31 वाजता

सिंधुदुर्गात पावसाचा जोर

 

Sindhudurga Rain : सिंधुदुर्गात सकाळपासून धुंवाधार पाऊस कोसळतोय...कुडाळ, सावंतवाडी तालुक्यात मुसळधार पावसामुळे नदीला पूर आलाय...कुडाळ माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला मोठा पूर आला असून, पुरामुळे आंबेरी पुलावरून पाणी वाहतंय...त्यामुळे पुढील 27 गावांचा संपर्क तुटलाय...नवीन पुल वाहतुकीस खुला नसल्याने वाहनांचादेखील खोळंबा झालाय...सकाळपासूनच सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा -