Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JULY 07 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

7 Jul 2024, 11:56 वाजता

निलेश लंकेंच्या आंदोलनाचा तिसरा दिवस

 

Nilesh Lanke : अहमदनगरमध्ये खासदार निलेश लंकेंच्या आक्रोश आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. दूध दरवाढ आणि कांदा हमीभावासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खासदार लंकेंचं आंदोलन सुरू आहे. शरद पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, सुप्रिया सुळे हे नेते निलेश लंकेंची भेट घेणार आहेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

7 Jul 2024, 11:45 वाजता

वरळी कोळीवाड्यात हिट अँड रन

 

Mumbai Hit & Run : पुण्यानंतर आता मुंबईत हिट अँड रनची घटना घडलीय. हिट अँड रन प्रकरणी पोलिसांनी शिंदे गटाचा उपनेता राजेश शहाला ताब्यात घेतलंय...दुर्घटनेवेळी राजेश शहाचा मुलगा मिहिर शहा आणि ड्रायव्हर गाडीत होता...अपघातानंतर मिहिर शहा फरार झालाय...ड्रायव्हर आणि मिहिर शहावर गुन्हा दाखल करणअयात आलाय...वरळी कोळीवाडा परिसरात नाकवा दाम्पत्य सकाळी मच्छी आणण्यासाठी दुचाकीवर निघाले असता मागून येऊन भरभाव कारने जोरात धडक दिली. धडकेनंतर नाकवा दाम्पत्य गाडीच्या बोनेटवर आदळले. यावेळी दुचाकी चालकानं गाडीच्या बाजूला उडी टाकली. मात्र महिलेला स्वत:ला बाजूला होता आलं नाही. दरम्यान कार चालकानं महिलेला फरफटत नेलं. त्यानंतर महिलेला रुग्णालयात दाखल केलं असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. 

बातमी पाहा - वरळीत भल्या पहाटे थरार; कार चालकाने महिलेला फरफटत नेले, उपचारादरम्यान मृत्यू

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

7 Jul 2024, 11:31 वाजता

Palghar Rain : मुसळधार पावसाने वाडा परिसराला झोडपलं आहे . पावसामुळे वैतरणा नदीच्या उपनद्यांना पूर आल्याने वाड्यातील काही गावांचा मुख्य बाजारपेठेशी संपर्क तुटला आहे . पिंपळोली येथे पूल पाण्याखाली गेल्याने मोज , पिंपळोली , वडवली , सोनाळे या गावांचा बाजारपेठेशी संपर्क तुटला आहे.पालघर जिल्ह्यातील वाडा परिसरात जोरदार पाऊस बरसला आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

7 Jul 2024, 11:21 वाजता

चंद्रपुरात बसचा भीषण अपघात, 8 जण जखमी

 

Chandrapur Accident : चंद्रपुरच्या सिंदेवाही शहरात बसचा भीषण अपघात झाला. चालकाला मिरगीचा झटका आल्यानं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस थेट एका गॅरेजमध्ये शिरली. यात 8 प्रवासी जखमी झालेत. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. बसमध्ये 35 प्रवासी होते. ब्रम्हपुरीहून चंद्रपूरला जाणारी ही शेवटची बस होती. अपघातातील एसटी बसची धडक इतकी जोरदार होती की यात दोन दुचाकी वाहन, एक ट्रॅक्टर आणि दोन ते तीन चार चाकी वाहनांच्या मोडतोड झाली. दरम्यान पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतलंय. 

बातमी पाहा - संध्याकाळची शेवटची एसटी, प्रवाशांची गर्दी आणि चालकाला मिरगीचा झटका; पुढे जे झालं ते धक्कादायक!

7 Jul 2024, 11:11 वाजता

मनसे नेते राज ठाकरेंना दिलासा

 

Raj Thackeray : मनसे नेते राज ठाकरे यांना मोठा दिलासा मिळालाय. सांगलीच्या शिराळा इथल्या खटल्यातून त्यांना दोष मुक्त करण्यात आलंय. इस्लामपूर न्यायालयानं हा निकाल दिलाय. 2008 मध्ये शिराळा तालुक्यातील शेंडगेवाडी या ठिकाणी रेल्वे भरती प्रकरणी मराठीच्या मुद्द्यावरून केलेल्या आंदोलनावेळी हिंसा घडली होती. कोकरूड पोलीस ठाण्यामध्ये मनसेच्या जिल्हाध्यक्षांसह राज ठाकरेंच्या विरोधातदेखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. राज ठाकरे यांचं नाव काढून टाकण्यात यावं, असा अर्ज न्यायालयात करण्यात आला होता. कोर्टानं अखेर राज यांना या प्रकरणातून दोषमुक्त केलं.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

7 Jul 2024, 10:45 वाजता

आणखी 3 गर्भवती महिलांना झिकाची लागण

 

Pune Zika Virus :  पुण्यात आणखीन तीन गर्भवती महिलांना झिकाची लागण झालीये.. या नव्या रुग्णांसह पुण्यातील झिकाच्या रुग्णांची संख्या 10वर गेलीये.  आंबेगाव, पाषाण, मुंढवा या उपनगरात झिकाचे हे रुग्ण आढळून आलेत. यात आत्तापर्यंत 5 गर्भवती महिलांचा समावेश आहे.. त्यामुळे पुणे परिसरातील गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलंय.

 

7 Jul 2024, 09:48 वाजता

वासिंदमध्ये घरात अडकलेल्या 10 जणांची सुखरुप सुटका

 

Vasind Resque : शहापुरात मुसळधार पावसाचा फटका सामान्यांना बसू लागलाय...वाशिंदमध्ये पुराचं पाणी इमारतीत शिरल्याने 10 जण अडकलेले होते...घरात अडकलेल्या 10 जणांना आता बाहेर काढण्यात यश आलंय...जीवरक्षक टीमने वाशिंदमध्ये अडकलेल्यांना सुखरुप बाहेर काढलंय... 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

7 Jul 2024, 09:33 वाजता

पावसामुळे निकृष्ट कामाची पोलखोल

 

Aasangaon Mahuli Bridge : मुसळधार पावसामुळे आसनगाव-माहुली दरम्यान ओढ्यावरील पूलवाहून गेलाय.. महिनाभरापूर्वीच या पुलाचं बांधकाम करण्यात आलं होतं. मात्र एका पावसातच पूल वाहून गेल्यानं पुलाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.. या रस्त्याचं बांधकाम अत्यंत निकृष्ट झाल्याचा आरोप गावक-यांनी केलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

7 Jul 2024, 09:17 वाजता

अकोल्यातील जवानाला वीरमरण

 

Akola Jawan : जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी लढताना अकोल्याच्या जवानाला वीरमरण आलंय. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन भारतीय जवान शहीद झाले. त्यातील एक जवान प्रविण जंजाळ हा अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे या गावचा रहिवासी होता. 32 वर्षीय प्रवीण हे 2022 मध्ये ते सैन्यात भरती झाले होते. चार महिन्यांपूर्वीच ते रजेवर आले होते आणि महिन्याभरापूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं. आज त्यांचं पार्थिव त्यांच्या गावी पोहोचणार आहे. उद्या त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणारे आहे.

बातमी पाहा - जम्मू काश्मीरमध्ये चकमक; दहशतवाद्यांशी लढताना अकोल्याच्या प्रवीण जंजाळ यांना वीरमरण

7 Jul 2024, 09:06 वाजता

अजित पवार गटात फूट नाही - दत्तात्रय भरणे

 

Indapur Ajit Pawar Camp : इंदापुरात अजित पवार गटात फूट नाही, असं स्पष्टीकरण अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिलंय. शहरात पुणे जिल्हाअध्यक्ष प्रदीप गारटकर यांचे बॅनर झळकले होते. त्यावर भावी आमदार असा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे अजित पवार गटात वाद असल्याची चर्चा सुरू होती. यावर आता आमदार भरणे यांनी स्पष्टीकरण देत पक्षात कोणताही वाद नसल्याचं स्पष्ट कलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा -