Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ सत्तेतून बाहेर पडणार ?

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on June 17 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ सत्तेतून बाहेर पडणार ?

17 Jun 2024, 22:07 वाजता

'ब्लॅकमेलिंग आणि वसुलीमध्ये कडू एक नंबर', रवी राणांचा बच्चू कडूंवर आरोप

 

Ravi Rana vs Bacchu Kadu : निवडणूक संपताच राणा विरुद्ध कडू वाद पुन्हा पेटलाय. 'बच्चू कडू महाराष्ट्रात तोडी, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीमध्ये एक नंबर आहेत. 'ज्याच्या ताटात ते खातात त्याच्याच पाठीत ते खंजीर खुपसतात, ही अचलपूरच्या आमदाराची ओळख आहे. जो चेहरा आपल्याला दिसतो तो हा चेहरा नाही'... असं म्हणत राणांनी बच्चू कडुंवर हल्लाबोल केलाय.. आमदार रवी राणांनी याआधीही बच्चू कडूंवर खोके घेऊन सरकारमध्ये सामील झाल्याचा आरोप केला होता त्यानंतर राणांनी दिलगिरी व्यक्त केली होती मात्र आता पुन्हा राणांनी कडूंविरोधात वक्तव्य केलंय. तर राणा दाम्पत्य 2 वर्षापासून सातत्यानं आरोप करत आहे. त्यांच्या आरोपांना आता कोर्टातून उत्तर देणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलंय. 

17 Jun 2024, 20:49 वाजता

'EVMमध्ये फेरफार करणं शक्य', सॅम पित्रोदा यांचा दावा

 

Sam Pitroda on EVM : ईव्हीएम हॅकिंग वादात इलॉन मस्क पाठोपाठ आता आयटी तज्ज्ञ सॅम पित्रोदा यांनीही उडी घेतलीय.. ईव्हीएममध्ये फेरफार करणं शक्य आहे, असा दावा त्यांनी केलाय.. मतपत्रिकेवरच निवडणुका घ्याव्यात, असं मतही त्यांनी व्यक्त केलंय..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

17 Jun 2024, 19:54 वाजता

अमोल कीर्तिकर कोर्टात दाद मागणार

 

Amol Kirtikar : निवडणूक आयोगाने पुर्नमोजणी करायला हवी होती असं मत ठाकरे गटाचे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे पराभूत उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी मांडलंय. आम्ही केलेली व्हिडीओ फुटेजची मागणी आयोगाने 9 दिवसानंतर नाकारली. त्यांनी आम्हाला फुटेज द्यायला हवं होतं. एक उमेदवार म्हणून तो आपला अधिकार असल्याचं कीर्तीकर म्हणाले. तसंच मतदान कक्षात मोबाईल फोनचा वापर झाल्याच्या आरोपावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय. याबाबत कोर्टात दाद मागणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

17 Jun 2024, 19:24 वाजता

प्रियंका गांधी पहिल्यांदाच निवडणूक लढणार

 

Priyanka Gandhi : प्रियंका गांधी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.. वायनाडमधून प्रियंका गांधी निवडणूक लढवणार आहेत.. राहुल गांधी हे वायनाड तसंच रायबरेली या दोन्ही लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते.. मात्र राहुल गांधींनी वायनाडची जागा सोडण्याचा निर्णय घेतलाय. आता राहुल गांधींऐवजी वायनाडमधून प्रियंका गांधी निवडणूक लढवणार आहेत.. 

17 Jun 2024, 18:38 वाजता

राज्यात 19 जूनपासून पोलीस भरती

 

Police Recruitment : राज्यात 19 जूनपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. महाराष्ट्र पोलीस दलात विविध 17 हजार पदं रिक्त आहेत. त्यासाठी पोलीस भरती होणार आहे. यामध्ये अठराशे पदांची कारागृह भरतीही होणार आहे. विशेष म्हणजे 17 हजार पदांसाठी 17 लाखांहून जास्त अर्ज आले आहेत. पोलीस भरतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात लेखी परीक्षा आणि मैदानी परीक्षा होईल. उमेदवाराला 2 वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज करता येईल. मात्र 2 ठिकाणी तो अर्ज करु शकणार नाही. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

17 Jun 2024, 18:06 वाजता

मंत्री छगन भुजबळ सत्तेतून बाहेर पडणार?

 

Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ सत्तेतून बाहेर पडणार का याची चर्चा आता सुरु झालीय. कारण मुंबईत झालेल्या बैठकीत पदाधिका-यांनीच तसा सूर बोलून दाखवलाय.. भुजबळांना लोकसभा तसंच राज्यसभेला डावलल्यामुळे ओबीसींमध्ये नाराजी दिसून येतेय. तसंच सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी होणार असल्यास ओबीसींवर अन्याय होईल असाही सूर बैठकीत दिसून आला.. सरकारमध्ये ओबीसींना मिळत असलेल्या सवलतीतही अन्याय होत असल्याची भावना बैठकीत पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवलीय.. छगन भुजबळांची राजकीय कोंडी केली जात असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे भुजबळांनी निर्णय घेण्याचा आग्रह कार्यकर्त्यांचा आहे.. तेव्हा येत्या काळात छगन भुजबळांचं नाराजी नाट्य घडण्याची शक्यता असल्याची माहिती मिळतेय.... 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

17 Jun 2024, 17:41 वाजता

'लोकसभेतील घडामोडी विसरा, विधानसभेसाठी एकत्र येऊ', सतेज पाटलांचं आवाहन

 

Satej Patil : लोकसभेत झालेल्या घडामोडी विसरा, विधानसभेसाठी एकत्र या असं आवाहन काँग्रेस नेते सतेज पाटलांनी केलंय. सांगलीतील मविआ नेत्यांच्या वादावर त्यांनी भाष्य केलंय. विश्वजीत कदम, जयंत पाटलांचा गैरसमज दूर करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

17 Jun 2024, 17:15 वाजता

'उ. पश्चिम मुंबईच्या निकालात विजयी करणारा मोबाईल बदलण्याचा प्रयत्न', संजय राऊतांचा गंभीर आरोप

 

Sanjay Raut : उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकरांना विजयी करणारा मोबाईल बदलण्याचा प्रयत्न झाला असून, निवृत्त पीआय सातारकर वनराई पोलीस ठाण्यात काय डील करत होते?...ते 4 दिवस पोलीस स्टेशनला का चकरा मारत होते...असा सवाल उपस्थित करत वनराई पोलीस ठाण्याचे CCTV जप्त करुन चौकशी करा अशी मागणी राऊतांनी केलीय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

17 Jun 2024, 16:41 वाजता

भूपेंद्र यादव महाराष्ट्रचे भाजप प्रभारी

 

Bhupendra Yadav : लोकसभेत भाजपला अपेक्षित यश न मिळालेल्या भाजपनं विधानसभेची जोरदार तयारी सुरू केलीय. भाजपनं महाराष्ट्रासाठी प्रभारी आणि सहप्रभारींची नियुक्ती केलीय. भूपेंद्र यादव महाराष्ट्राचे प्रभारी असतील तर अश्विनी वैष्णव यांच्याकडे सहप्रभारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. राजस्थानमधील अल्वर मतदारसंघाचे खासदार असलेले भूपेंद्र यादव सध्या केंद्रात कामगार आणि पर्यावरण मंत्री आहेत. तसंच 2010 मध्ये नितीन गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष असताना यादव यांची पहिल्यांदा भाजपचे सचिव म्हणून नेमणूक झाली होती.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

17 Jun 2024, 16:04 वाजता

ठाकरे गटाचे आमदार विलास पोतनीसांवर गुन्हा दाखल

 

MLA Vilas Potnis :  रवींद्र वायकर यांच्या मेहुण्या विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर आत्ता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार विलास पोतनीस यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल...विलास पोतनीस आणि त्यांच्या सशस्त्र पोलीस सुरक्षा रक्षका विरोधात गुन्हा दाखल....मतमोजणीच्या दिवशी नेस्को येथील मुंबई उत्तर पश्चिम मतमोजणी केंद्रात विनापरवाना प्रवेश केल्याचा आरोप

बातमीचा व्हिडीओ पाहा-