17 Jun 2024, 10:49 वाजता
Aashadhi Wari 2024 : शासनाने प्रत्येक दिंडीला 20 हजार मदतीचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज प्रशांत मोरे यांनी केलीय. शासनाच्या वीस हजार मदतीवर वारी म्हणजे वारी या भक्तीरसपूर्ण शब्दावर आणि परंपरेवरच आघात असल्याचं मोरे यांनी म्हटलंय...20 हजाराचा निधी सरकाराने वारीच्या वाटेवर सोयी-सुविधांसाठी किंवा इतर मदतीसाठी खर्च करावा. खऱ्या आचार, विचार आणि उच्चार करणाऱ्या पंढरीच्या वारकऱ्यांनी ही मदत स्विकारु नये किंवा शासनाने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा अशी मागणी प्रशांत मोरे यांनी केलीय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
17 Jun 2024, 10:46 वाजता
NCERTच्या अभ्यासक्रमात बदल
NCERT : बाबरी मशीद, भगवान राम, श्री राम, रथयात्रा, कारसेवा आणि विध्वंसानंतरची हिंसा याविषयीची माहिती NCERT पुस्तकातून काढून टाकण्यात आलीय. देशातील सर्वोच्च शिक्षण संस्थेनं 12वीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकातून हे शब्द काढून टाकलेत. त्याचबरोबर पुस्तकात बाबरी मशीद या नावाऐवजी तीन घुमट रचना आणि अयोध्या वाद या नावानं अयोध्या विषय शिकवला जाणारेय. 4 पानांचा विषयही 2 पानांचा करण्यात आलाय. बाबरी मशीद विध्वंस किंवा त्यानंतर झालेल्या जातीय हिंसाचाराचा संदर्भ का काढला गेला? या प्रश्नावर एनसीईआरटीचे संचालक दिनेश प्रसाद सकलानी यांनी उत्तर दिलंय. त्यांनी शाळेत दंगली का शिकवायच्या? आम्हाला सकारात्मक नागरिक घडवायचे आहेत, हिंसक आणि निराशाजनक लोक नाही असं म्हटलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
17 Jun 2024, 09:38 वाजता
सामना अग्रलेखातून नारायण राणेंवर प्रहार
Saamana On Narayan Rane : सामनामधून राऊतांनी राणेंवर प्रहार केलाय...शिवसेनेचा पराभव करणे राणे यांच्या सारख्यांना कधीच जमणार नाही...एखाद्या पराभवाने खचणारी, मागे हटणारी शिवसेना नाही...राणेंसह त्यांच्या कुटुंबास शिवसेनेने तीनदा धूळ चारली...चौथ्यांदाही पराभव होईल...राणे हे काही जिंकण्याच्या स्थितीत नव्हते. मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा त्यांचा विजय आहे...नव्या मंत्रिमंडळात राणेंना स्थान न मिळाल्याने त्यांच्या अतिसूक्ष्म अकलेस झिणझिण्या आल्यायत...त्यातूनच ते 'शिवसेना संपली, संपवली' अशी भाषा बोलू लागलेत अशी टीका सामनातून करण्यात आलीय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
17 Jun 2024, 09:20 वाजता
हत्येनंतर आरोपींची हॉटेलमध्ये पार्टी
Nagpur : नागपुरातील पुरुषोत्तम पुट्टेवार हत्या प्रकरणातील आरोपींचे पार्टी करतानाचे फोटो झी 24 तासच्या हाती लागलेयत...पुट्टेवारांची हत्या केल्यानंतर आरोपींनी हॉटेलमध्ये जाऊन दारूची पार्टी केली...त्याचे फोटो आता समोर आलेयत....त्यामुळे आरोपी किती निगरगट्ट आणि असंवेदनशील होते हे यातून स्पष्ट होतंय...या आरोपींनी पुरुषोत्तम पुट्टेवार यांना कारची धडक देऊन त्यांचा जीव घेतला...नीरज निमजे आणि सचिन धार्मिक या दोघांनी हत्येनंतर पार्टी केली...त्या वेळचे काही एक्सक्लुसिव्ह फोटो झी 24 तासच्या हाती लागलेयत...एवढेच नाही तर या नीरज निमजे, सचिन धार्मिक आणि या प्रकरणातला तिसरा आरोपी सार्थक बागडे हे तिघेही पुरुषोत्तम पुट्टेवार यांची हत्या केल्यानंतर मनालीला जाणार होते... तिथेही त्यांच्या पार्टीची सोयही करण्यात आली होती...मात्र, हे तिघे मनालीला पळून जातील त्याच्या आधीच पोलिसांनी त्यांना अटक केली...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
17 Jun 2024, 08:51 वाजता
'मेट्रो 4' कारशेडच्या जागेबाबत अद्याप प्रतीक्षाच
Metro 4 Car Shade : मेट्रो 4 साठी कारशेडच्या जागेबाबत अजूनही तोडगा निघालेला नाही. कांजूरमार्गची जागा मेट्रो कारशेडसाठी अद्यापही एमएमआरडीएला मिळालेली नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वादामुळे जागेसाठी अद्यापही प्रतीक्षाच करावी लागतेय. मेट्रोचं काम प्रगतीपथावर आहे मात्र कारशेडचा पत्ताच नाही. 3 महिन्यात ही जागा मेट्रो कारशेडसाठी एमएमआरडीएला मिळण्याची शक्यताय. जागा ताब्यात आल्यावर कारशेड बांधायला दीड ते 2 वर्ष लागणार असल्यामुळे मेट्रो 4 लांबणीवर गेलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
17 Jun 2024, 08:49 वाजता
सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्ती वय 60 वर्षे?
Government Employee Age : राज्यांप्रमाणे सरकारी कर्मचा-यांचं सेवानिवृत्तीचं वय 60 वर्षे करावं, अशी मागणी राज्य सरकारी कर्मचा-यांकडून करण्यात येतेय. या मागणीसंदर्भात राजपत्रित अधिकारी महासंघाची नुकतीच सरकारसोबत बैठक झाली. त्यामध्ये निवृत्तीचं वय 60 वर्षे करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्याची माहिती महासंघाकडून देण्यात आली. केंद्र सरकारनं त्यांच्या कर्मचा-यांचा महागाई भत्ता 46 वरून 50 टक्के केलाय. याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवांनी तयार केलाय. तो मंजूर करावा अशी मागणीही संघटनेकडून करण्यात आलीय. यावेळी सुधारित पेन्शन योजनेसंदर्भात अधिसूचना काढावी तसंच सरकारी नोक-यांची 3 लाख रिक्त पदं भरावीत, अशी मागणीही करण्यात आलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
17 Jun 2024, 08:28 वाजता
अमरनाथ यात्रेसाठी हेलिकॉप्टर बुकिंग सुरू
Amarnath Yatra Helicoptar Booking Start : अमरनाथ यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवेची ऑनलाइन बुकिंग सुरू करण्यात आलीय. यात्रेची प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आलीय. 29 जूनपासून यात्रेला सुरुवात होणारेय. अमरनाथ यात्रेला जाणा-या भाविकांच्या हेलिकॉप्टरसाठी दोन मार्ग निश्चित करण्यात आलेत. एक नीलकंठ-पंजतरणी मार्ग तर दुसरा पहलगाम-पंजतरणी मार्ग असणारेय. 19 ऑगस्ट म्हणजेच रक्षाबंधनच्या दिवशी अमरनाथ यात्रा संपणारेय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
17 Jun 2024, 08:22 वाजता
कोकणपासून विदर्भात मान्सूनची उघडीप
Monsoon : राज्यात वेळेपूर्वीच दाखल झालेल्या नैऋत्य मोसमी पावसाचा कोकण किनारपट्टीपासून विदर्भापर्यंत जोर कमी झालाय. पावसानं उघडीप दिल्यामुळे उन्हाचा चटका वाढलाय. कमाल तापमान सरासरी 3 ते 4 अंशांनी वाढलंय. राज्यात तापमान 35 ते 40 अंश सेल्सिअसवर गेलंय. 20 जूननंतर मोसमी पाऊस पुन्हा जोर धरेल असा अंदाज हवामान विभागानंवर्तवलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
17 Jun 2024, 07:59 वाजता
छगन भुजबळांनी बोलावली समता परिषदेची बैठक
Chagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळांनी राज्यस्तरीय समता परिषद बैठक बोलावलीय...आज सकाळी 11 वाजता वांद्रेतल्या मुंबई एज्युकेशन ट्रस्ट इथे ही बैठक होणार आहे...भुजबळांच्या पक्षांतर्गत तसंच महायुतीमधल्या नाराजीची चर्चा सुरु आहे. त्यापार्श्वभूमीवर भुजबळ आजच्या बैठकीत कोणती राजकीय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.. तसंच जरांगे, मराठा, ओबीसी आरक्षण या विषयांवरही महत्त्वपूर्ण चर्चा या बैठकीत होणार असल्याची माहिती आहे...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
17 Jun 2024, 07:57 वाजता
आदित्य ठाकरेंची आज पत्रकार परिषद
Mumbai Aaditya Thackeray : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज पत्रकार परिषद घेणारेत. दुपारी 2 वाजता आदित्य ठाकरे पत्रकारांशी संवाद साधतील. यावेळी ते ईव्हीएमबाबत बोलण्याची शक्यताय. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात मतमोजणीवेळी ईव्हीएममध्ये गडबड केल्याचा आरोप ठाकरे पक्षानं केलाय. मात्र त्याचं सीसीटीव्ही फुटेज देण्यास निवडणूक आयोगानं नकार दिलाय. आता याप्रकरणी ठाकरे पक्ष कोर्टाचे दरवाजे ठोठावणार असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -