Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on June 25 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

25 Jun 2024, 22:32 वाजता

मद्य घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवालांना CBIकडून अटक

 

Arvind Kejriwal : दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवालांना CBIकडून अटक करण्यात आलीये..उद्या CBI केजरीवालांना कोर्टात हजर करणार 

25 Jun 2024, 21:22 वाजता

राहुल गांधींची विरोधी पक्षनेतेपदी निवड

 

Rahul Gandhi : राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आलीये...विरोधी पक्षांच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय झाल्याचं समजतंय..काँग्रेसच्या कार्यकारीणीच्या बैठकीमध्ये काँग्रेसनं एकमतानं राहुल गांधींची विरोधी पक्षनेतेपदासाठी निवड केली होती...त्यानंतर राहुल गांधी यांनी विचार करण्यासाठी वेळ मागितला होता...आता आज दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या बैठकीमध्येही विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांची निवड करण्यात आलीये..

25 Jun 2024, 20:40 वाजता

घाटकोपर होर्डिंग प्रकरण, रेल्वे पो. आयुक्त कैसर खालीदांचं निलंबन

 

Ghatkopar Hoarding  Accident Case : घाटकोपर होर्डिंग प्रकरणात रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालीद यांचे निलंबन....घाटकोपर प्रकरणात होर्डिंगला परवानगी देताना गैरप्रकार आि प्रशाकीय निष्काळजी पणा झाला असल्याचा ठपका...सरकारच्या गृह विभागाने केले खालीद यांचे निलंबन.....या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल पोलिस महासंचालकांनी राज्य सरकारला सोपवला होता...16 जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरले होते होर्डींग

25 Jun 2024, 20:15 वाजता

पुणे कल्याणीनगर अपघातप्रकरणातील अल्पवयीन आरोपीची सुटका

 

Pune Car Accident Case : पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची सुटका झालीय. मुंबई हायकोर्टानं अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर केलाय...त्याला तात्काळ आत्याच्या ताब्यात देण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेत.. त्यानंतर त्याची बालसुधारगृहातून सुटका करण्यात आली. अल्पवयीन आरोपीच्या आत्याने हायकोर्टात याचिका केली होती...अपघातानंतर ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन आरोपीला जामीन दिल्यानंतर पुन्हा त्याला ताब्यात घेण्यात आलं ही अटक बेकायदा असल्याचं त्याच्या आत्यानं हायकोर्टातील याचिकेत म्हटलं होतं... त्याचबरोबर अल्पवयीन आरोपीचे आई-वडिल अटकेत असल्याने त्याला आत्याच्या ताब्यात देण्याचे निर्देश कोर्टानं दिलेत... न्यायमूर्ती भारती डांगरे आणि मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिलेत...

25 Jun 2024, 19:15 वाजता

PWD कंत्राटदारांवर मेहेरबान?

 

PWD Scam : महाराष्ट्र सरकारचं सार्वजनिक बांधकाम खातं अर्थात PWD कंत्राटदारांवर कसं मेहेरबान झालंय, याची धक्कादायक माहिती हाती आलीय... मंत्र्यांच्या 36 बंगल्यांच्या पाणी आणि वीज बिलापोटी 2017 ते 2023 या काळात तब्बल 52 कोटी रुपये खर्च आला... त्यातील 26 कोटी रुपये बेकायदेशीरपणे खासगी कंत्राटदाराच्या खात्यात वळवण्यात आले, असा दावा महाराष्ट्र कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी केलाय... पाणी बिल आणि वीज बिलाची रक्कम बीएमसी आणि बेस्टच्या खात्यात जमा न होता, थेट कंत्राटदारांच्या खात्यात कशी गेली ? असा सवाल आता उपस्थित होतोय.. मंत्र्यांच्या बंगल्यांचे नुतनीकरण आणि दुरूस्तीपोटी ही रक्कम कंत्राटदाराला दिल्याचा खुलासा सार्वजनिक बांधकाम विभागानं केलाय... हा सगळा खर्च गेल्या ६ वर्षांतला म्हणजे याआधीचं महाविकास आघाडी सरकार आणि सध्याचं महायुती सरकार यांच्या काळातला असल्याची माहिती हाती आलीय.. 

25 Jun 2024, 18:35 वाजता

'शरद पवारांकडून पाठिंब्याचं पत्र घ्या', सदाभाऊ खोतांचं मनोज जरांगेंना आव्हान

 

Sadabhau Khot on Manoj Jarange  :  मनोज जरांगेंनी शरद पवारांसह महाविकास आघाडीतील खासदारांकडून पाठिंब्यासंदर्भात पत्र लिहून  घ्यावं...शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी जरांगेंना आव्हान दिलंय... मराठा बांधवांचा ओबीसीत समावेश होईपर्यंत शरद पवार, सुप्रिया सुळेंसह निवडून आलेल्या मविआ खासदार पाठिंबा देतील, अशा आशयाचं पत्र जरांगेंनी पवारांकडून लिहून घ्यावं...तसं न केल्यास जरांगे शरद पवारांसाठी काम करत होते ही भावना निर्माण होईल, असं सदाभाऊ खोत म्हणालेत... 

25 Jun 2024, 18:15 वाजता

'भुजबळांचा दंगली घडवण्याचा प्रयत्न', मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर आरोप

 

Manoj Jarange : अंतरवाली सराटीमध्ये पोहोचताच मनोज जरांगेंनी भुजबळांवर निशाणा साधलाय...भुजबळांना दंगली घडवायच्या आहेत असा आरोप जरांगेंनी केलाय... त्याचबरोबर 6 जुलैपासून पहा काय होतं ते, असा इशाराही जरांगेंनी दिलाय.....छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार घेतल्यानंतर आज मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना डिस्चार्ज देण्यात आला...त्यानंतर ते अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले...फटाक्यांच्या आतषबाजीत जरांगेंचं स्वागत करण्यात आलं...तर महिलांनी जरांगेंचं औक्षण केलं...यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली...
 

25 Jun 2024, 17:48 वाजता

देवेंद्र फडणवीसांची बँकांना तंबी

 

Devendra Fadnavis : पीक कर्ज देताना बँकांनी शेतक-यांकडे CIBILची मागणी केल्यास त्यांच्याविरोधात FIR दाखल करण्यात येईल...उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना हा इशारा दिलाय...राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडली त्यावेळी फडणवीसांनी हा इशारा दिलाय...गेल्यावेळी सुद्धा तेच सांगितले मात्र, बँका ऐकत नसतील तर आमचा नाईलाज असल्याचं फडणवीस म्हणालेत...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

25 Jun 2024, 17:09 वाजता

लोकसभेत ओवैसींचा 'जय पॅलेस्टाईन'चा नारा

 

Asaduddin Owais : लोकसभेत ओवैसींचा 'जय पॅलेस्टाईन'चा नारा...खासदारकीची शपथ घेतल्यानंतर 'जय पॅलेस्टाईन'ची घोषणा....ओवैसींच्या वक्तव्यामुळं नवा वाद
 

25 Jun 2024, 16:23 वाजता

'सोडून गेलेल्या काहींना दरवाजे खुले', शरद पवारांचं मोठं विधान

 

Sharad Pawar  : लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवारांनी विधानसभेच्या निवडणुकीवर लक्ष्य केंद्रीय केलंय.. त्यासाठीच शरद पवारांनी नवा डाव टाकलाय. सोडून गेलेल्या काहींना पक्षाचे दरवाजे खुले आहेत असं महत्त्वाचं विधान शरद पवारांनी केलंय.. सरसकट सर्वांना पक्षात पुन्हा प्रवेश देता येणार नाही. मात्र जिथे पक्षाला मदत होईल तिथे काहींना घेता येईल असं विधान करत पक्षापासून दूर गेलेल्या जुन्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना शरद पवारांनी सूचक संकेत दिले आहेत...

बातमीचा व्हिडीओ पाहा-