Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on November 02 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

2 Nov 2024, 13:53 वाजता

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीचे सौदे पार

 

Sangali Halad Saude : सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीचे सौदे पार पडले... दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर पार पडलेल्या या सौद्यात हळदीला 17 हजार रुपयांचा उच्चांकी दर मिळालाय. गेल्या अनेक वर्षांपासून पाडव्याच्या मुहूर्तावर हळदीच्या सौद्याची परंपरा आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतींच्या हस्ते या सौद्याचा शुभारंभ करण्यात आला.

2 Nov 2024, 13:50 वाजता

राज्यात सत्तांतर झालं पाहिजे - शरद पवार

 

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात सत्ता परिवर्तनाशिवाय पर्याय नाही. उत्पादनाच्या बाबतीत राज्याला धक्का बसला. त्यामुळं राज्याला पूर्वस्थितीत आणणा-यांना संधी द्या, असं आवाहन शरद पवारांनी जनतेला केलंय. बारामतीत पवार कुटुंबीयांनी पाडवा साजरा केला. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होतीय. यावेळी त्यांनी बोलताना अजित पवारांवरही निशाणा साधलाय. वेगळा पाडवा केला, पण वेगळंपण दिसलं नाही. मात्र, काही नागरिकांना दोन ठिकाणी जावं लागलं त्यामुळे अस्वस्थ आहे, असं पवार म्हणाले.

2 Nov 2024, 13:09 वाजता

बारामतीत कार्यकर्त्यांची बॅनरबाजी, सुप्रिया सुळेंचा बॅनरवर भावी मुख्यमंत्री उल्लेख

 

Baramati Supriya Sule : शरद पवारांना पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते बारामतीत दाखल झालेत. खेड शिवापूरचेही कार्यकर्ते बारामतीत दाखल झालेत. मात्र, चर्चा सुरू आहे ती त्यांनी सोबत  आणलेल्या बॅनरची. सुप्रिया सुळे भावी मुख्यमंत्री असल्याचा उल्लेख या बॅनरवर करण्यात आलाय. हे बॅनर सर्वांचं लक्ष वेधून घेत होते.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

2 Nov 2024, 12:32 वाजता

माहीम मतदारसंघावरुन शिवसेना आणि मनसे आमनेसामने

 

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माहीम मतदारसंघावरून मनसे आणि शिवसेना आमने-सामने आलीये. एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावरून आता मनसेच्या यशवंत किल्लेदारांनी टीका केलीये. मुख्यमंत्री संकुचित मनाचे आहेत. परतफेड करताना हात आखडता घेतला अशी टीका किल्लेदारांनी केलीये. तर एकनाथ शिंदे कपटी असल्याचा हल्लाबोलही यशवंत किल्लेदारांनी केलाय. तर शिवसेनेच्या संजय शिरसाटांनी किल्लेदारांना प्रत्युत्तर दिलंय.

2 Nov 2024, 12:19 वाजता

अजित पवारांकडे लाभार्थ्यांची गर्दी - रोहित पवार

 

Baramati Rohit Pawar : अजित पवारांकडे दिवाळी पाडव्यासाठी आलेली गर्दी म्हणजे सर्व लाभार्थी आहेत अशी टीका रोहित पवारांनी कोलीय. तर शरद पवारांकडे सर्व सामान्य लोकांची गर्दी आहे. ⁠जर आता अजित पवारांना घर फुटण्याचं दुःख होतय मात्र लोकसभेला त्यांनीच याची सुरूवात केलीय.  

2 Nov 2024, 12:17 वाजता

गोपाळ शेट्टी बोरिवलीतून निवडणूक लढवण्यावर ठाम

 

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : देवेंद्र  फडणवीसांच्या भेटीनंतरही गोपाळ शेट्टी बोरिवलीतून निवडणूक लढण्यावर ठाम आहेत ... सागर बंगल्यावर फडणवीसांसोबत दीड तास चर्चा केलीय..  मात्र चर्चेनंतरही गोपाळ शेट्टी निवडणूक लढण्यावर ठाम..

2 Nov 2024, 12:11 वाजता

सदा सरवणकरांची माहीम मतदारसंघातून माघार नाहीच

 

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सदा सरवणकर निवडणूक लढण्यावर ठाम आहेत.. शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी माहीममधून निवडणूक लढणार असल्याचं सरवणकर म्हणालेत... काहीही झालं तरीही माहीममधून माघार घेणार नसल्याचा पुनरुच्चार सरवणकरांनी केलाय.. 

2 Nov 2024, 11:34 वाजता

मनसेकडून शिवाजी पार्कमधील कंदील, बॅनर्स हटवले

 

Mumbai Shivaji Park : दीपोत्सवावरून मुंबईत शिवसेना उद्धव  बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेत सामना रंगलाय. दीपोत्सवातून मनसेनं आचारसंहितेचं उल्लंघन केल्याची तक्रार केल्यानंतर मनसेकडून शिवाजी पार्कमधील कंदील, बॅनर्स हटवण्यात आलेत.. शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यांच्या पत्राची दखल निवडणूक आयोगाने काल घेतली.. त्यानंतर एका रात्रीत शिवाजी पार्क परिसरातले बॅनर्स आणि कंदील काढण्यात मनसेकडून काढण्यात आले... या दीपोत्सवात लावण्यात आलेल्या कंदीलवर मनसे पक्षाचे इंजिन हे चिन्ह होत... 

बातमी पाहा - शिवाजी पार्कमध्ये पेटला कंदील वाद; आचारसंहिता उल्लंघनाच्या आरोपानंतर मनसेचा मोठा निर्णय

2 Nov 2024, 11:12 वाजता

अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

 

Sambhajinagar Abdul Sattar : शिवसेना नेते सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार मंत्री अब्दुल सत्तारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यताये. सत्तारांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना मालमत्तेची माहिती लपवल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आलीय. सिल्लोडचे सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली यांनी निवडणूक आयोगाकडे ही तक्रार केलीय. या तक्रारीची निवडणूक आयोगानं दाखल घेतलीय. निवडणूक आयोगाने ई- मेलद्वारे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आणि सिल्लोडचे निवडणूक अधिकारी यांना 24 तासांच्या आत अहवाल पाठवण्याचे निर्देश दिलेत. या संदर्भात पुढे काय कारवाई होणारेय याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

2 Nov 2024, 10:08 वाजता

विधानसभा निवडणुकीतून शिट्टी चिन्ह गायब

 

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : यंदाच्या राज्यातील विधानसभा निवडणुकीतून शिट्टी चिन्ह गायब होणार आहे.. कारण शिटी चिन्ह हे संयुक्त जनता दलासाठी राखीव ठेवण्याच्या सूचना केंद्रीय निवडणूक आयोगानं दिल्यात. त्यामुळे निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला शिट्टी चिन्ह घेता येणार नाहीये.. त्यामुळे हितेंद्र ठाकूर यांना यंदाच्या निवडणुकीत वेगळं चिन्ह घ्यावं लागणार आहे.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -