2 Nov 2024, 11:34 वाजता
मनसेकडून शिवाजी पार्कमधील कंदील, बॅनर्स हटवले
Mumbai Shivaji Park : दीपोत्सवावरून मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेत सामना रंगलाय. दीपोत्सवातून मनसेनं आचारसंहितेचं उल्लंघन केल्याची तक्रार केल्यानंतर मनसेकडून शिवाजी पार्कमधील कंदील, बॅनर्स हटवण्यात आलेत.. शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यांच्या पत्राची दखल निवडणूक आयोगाने काल घेतली.. त्यानंतर एका रात्रीत शिवाजी पार्क परिसरातले बॅनर्स आणि कंदील काढण्यात मनसेकडून काढण्यात आले... या दीपोत्सवात लावण्यात आलेल्या कंदीलवर मनसे पक्षाचे इंजिन हे चिन्ह होत...
बातमी पाहा - शिवाजी पार्कमध्ये पेटला कंदील वाद; आचारसंहिता उल्लंघनाच्या आरोपानंतर मनसेचा मोठा निर्णय
2 Nov 2024, 11:12 वाजता
अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता
Sambhajinagar Abdul Sattar : शिवसेना नेते सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार मंत्री अब्दुल सत्तारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यताये. सत्तारांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना मालमत्तेची माहिती लपवल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आलीय. सिल्लोडचे सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली यांनी निवडणूक आयोगाकडे ही तक्रार केलीय. या तक्रारीची निवडणूक आयोगानं दाखल घेतलीय. निवडणूक आयोगाने ई- मेलद्वारे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आणि सिल्लोडचे निवडणूक अधिकारी यांना 24 तासांच्या आत अहवाल पाठवण्याचे निर्देश दिलेत. या संदर्भात पुढे काय कारवाई होणारेय याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
2 Nov 2024, 10:08 वाजता
विधानसभा निवडणुकीतून शिट्टी चिन्ह गायब
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : यंदाच्या राज्यातील विधानसभा निवडणुकीतून शिट्टी चिन्ह गायब होणार आहे.. कारण शिटी चिन्ह हे संयुक्त जनता दलासाठी राखीव ठेवण्याच्या सूचना केंद्रीय निवडणूक आयोगानं दिल्यात. त्यामुळे निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला शिट्टी चिन्ह घेता येणार नाहीये.. त्यामुळे हितेंद्र ठाकूर यांना यंदाच्या निवडणुकीत वेगळं चिन्ह घ्यावं लागणार आहे..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
2 Nov 2024, 09:45 वाजता
माहीमच्या जागेवरुन एकनाथ शिंदेंचं मोठं विधान
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माहीमच्या जागेवरून मोठं विधान केलंय.. आम्हाला विश्वासात न घेता मनसेकडून माहीमचा उमेदवार जाहीर करण्यात आलाय... आमची राज ठाकरेंसोबत विधादनसभेच्या जागांबाबत बोलणी सुरू होती.. असं असतांना त्यांनी उमेदवार जाहीर केलाय.. आमच्या माहीममध्ये विद्यमान आमदार आहे.. कार्यकर्त्यांची माहीममधून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे.. कार्यकर्त्यांचं मनोबल कमी होऊ देणार नसल्याचं शिंदे म्हणालेत..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
2 Nov 2024, 09:27 वाजता
सिंचन घोटाळ्यावरुन भाजपनं अजित पवारांना ब्लॅक मेल केलं - जयंत पाटील
Jayant Patil : सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांना गेल्या 10 वर्षांपासून भाजप ब्लॅकमेल करत असल्याचा गौप्यस्फोट जयंत पाटील यांनी केलाय.. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत जयंत पाटलांनी दावा केलाय.. सिंचना घोटाळ्याचा वापर राष्ट्रवादी फोडण्यासाठी केल्याचा आरोपही जयंत पाटलांनी केलाय.. देवेंद्र फडणवीस जेव्हा विरोधात होते तेव्हा त्यांनी सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांवर आरोप केलेत.. सत्तेत आल्यानंतर त्यांनी आर. आर पाटलांवर खापर फोडण्यचा प्रयत्न केल्याचा आरोपही जयंत पाटलांनी केलाय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
2 Nov 2024, 09:25 वाजता
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एकनाथ शिदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. काँग्रेससोबत गेल्यानं शिवसेनेचं नुकसान झालं, असं शिंदेंनी म्हटलं आहे. आमदारांची कामं होत नव्हती त्यामुळे शिवसेना वाचवण्यासाठी भाजपसोबत गेलो, शिंदे म्हणाले.
2 Nov 2024, 08:44 वाजता
अंबरनाथमध्ये राजेश वानखेडेंना मदत करणार - राजू पाटील
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अंबरनाथमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश वानखेडेंना मित्र म्हणून नक्की मदत करणार, अशी भूमिका मनसे आमदार राजू पाटलांनी जाहीर केलीय. अंबरनाथमध्ये आमचा उमेदवार नाही, तसंच राजसाहेबांनी अद्याप काहीही स्पष्ट आदेश आम्हाला दिले नाहीत, असं पाटील म्हणाले. राजेश वानखेडे माझे मित्र आहेत, त्यामुळे मित्र म्हणून त्यांना नक्कीच मदत करणार, पक्षाचा आदेश आल्यावर काय करायचं, ते आम्ही पक्ष म्हणून ठरवू, असं राजू पाटील म्हणालेत.
2 Nov 2024, 07:35 वाजता
पुण्यात 31 ठिकाणी आगीच्या घटना
Pune Fire : पुण्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ३१ ठिकाणी आगीच्या घटना घडल्यात. संध्याकाळी 7 ते मध्यरात्रीपर्यंत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे आगीच्या घटना घडल्याचं समोर आलंय.. काही ठिकाणी कचऱ्याला आग लागली तर काही ठिकाणी झाडांना आग लागल्याच्या घटना समोर आल्यात..अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे गंभीर घटना टळल्या आहेत...
बातमीचा व्हिडीओ पाहा -