13 Nov 2024, 20:38 वाजता
'राणेंना साईजप्रमाणे खात मिळालं होतं', उद्धव ठाकरेंचा टोला
Uddhav Thackeray on Narayan Rane : कणकवलीतील मविआ उमेदवाराच्या प्रचारसभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नारायण राणे आणि अमित शाहांवर जोरदार निशाणा साधलाय.. नकली सेना म्हणणारे बे अकली असल्याचं म्हणत त्यांनी अमित शाहांना टोला लगावलाय. तर राणेंना साईज प्रमाणं मंत्रिपद मिळालं होतं म्हणत नारायण राणेंवर टीका केलीये...
13 Nov 2024, 18:31 वाजता
माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद- अब्दुल सत्तार
Abdul Sattar : मुख्यमंत्री बदलण्याची ताकद ठेवतो..अब्दुल सत्तारांचं मोठं वक्तव्य...सत्तारांची रावसाहेब दानवेंवर अप्रत्यक्षपणे टीका...सिल्लोड विधानसभा मतदारसंघात सत्तारांचं वक्तव्य...संभाजीनगरच्या अजिंठा इथं एका सभेत सत्तारांचं वक्तव्य...माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद-सत्तार
बातमीचा व्हिडीओ पाहा-
13 Nov 2024, 17:29 वाजता
आजारपणाच्या काळात उद्धव ठाकरेंनी नगरसेवक फोडले- अमित ठाकरे
Amit Thackeray on Uddhav Thackeray : 'आजारपणाच्या काळात उद्धव ठाकरेंनी नगरसेवक फोडले'.. अमित ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर आरोप..आजारी असताना राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी त्रास दिला...नगरसेवक फोडाफोडीपासून संवाद संपल्याची माहिती..झी 24 तासच्या जाहीर सभेत अमित ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर टीका
बातमीचा व्हिडीओ पाहा-
13 Nov 2024, 16:14 वाजता
बारामतीत अजित पवारांच्या बॅगांची तपासणी
Ajit Pawar : अजित पवारांच्या बॅगचीही तपासणी कऱण्यात आलीय...अजित पवारांच्या बॅगची आणि हेलिकॉपटरची तपासणी आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केलीय...आयोगाच्या अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य केलं...अशा प्रकारच्या उपाययोजना स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक आहेत...कायद्याचा आदर करू- अजित पवार
13 Nov 2024, 15:06 वाजता
पालघरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी
CM Eknath Shinde : पालघरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी...कोलवडेतील हेलिपॅडवर शिंदेंच्या बॅगांची तपासणी...निवडणूक विभागाकडून बॅगेची तपासणी...पालघरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा
13 Nov 2024, 14:27 वाजता
'शरद पवारांचे फोटो, व्हिडिओ वापरु नका', सुप्रीम कोर्टाचे अजित पवारांना निर्देश
Delhi : सुप्रीम कोर्टात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी पार पडली.. आजच्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टानं अजित पवार गटाला शरद पवारांचे फोटो आणि व्हिडिओ न वापरण्याचे निर्देश दिले.. तसंच घड्याळाचं चिन्हं वापरताना त्याखाली डिस्क्लेमर वापरण्याच्याही सूचना दिल्या.. इलेक्ट्रॉनिक, प्रिंट, सगळ्या माध्यमासाठी हा नियम लागू असेल असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय.. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाप्रकरणी पुढील सुनावणी मंगळवारी होणार आहे..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
13 Nov 2024, 13:21 वाजता
मनसे गुजराती भूमिपुत्रांसाठी लढते - आदित्य ठाकरे
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मनसे गुजराच्या भूमिपुत्रांसाठी लढते महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांसाठी नाही अशी टीका आदित्य ठाकरेंनी केलीये.. वरळीतील प्रचार रॅलीत त्यांनी मनसेवर टीका केलीये.. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावरही टीकेची झोड उठवली..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
13 Nov 2024, 12:52 वाजता
उपमुख्यमंत्री अजित पवारांचा युगेंद्र पवारांवर निशाणा
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मला इंग्रजी येवो की न येवो..मात्र मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे.. साडे सहा लाख कोटींचं राज्याचं बजेट सादर करतो असा टोला अजित पवारांनी युगेंद्र पवारांना लगावलाय... त्याला टिंबही काढता येत नसल्याचंही अजित पवार म्हणालेत...
13 Nov 2024, 12:14 वाजता
मविआ राज्यात 170 जागा जिंकणार - रोहित पवार
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआ राज्यात 170 जागा जिंकणार असा दावा आमदार रोहित पवारांनी केलाय. तर विदर्भात आमचा चांगला स्ट्राईक रेट आहे. तर फडणवीसांच्या मतदारसंघात दहशतीचं वातावरण असून लोक समोरुन बोलत नाही करु दाखवतात. अशी टीकाही रोहित पवारांनी केलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
13 Nov 2024, 12:01 वाजता
बच्चू कडूंचा रवी राणा आणि देवेंद्र फडणवीसांना टोला
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : रवी राणा आणि फडणवीस यांची मैत्री राम लखनसारखी आहे, अशी खोचक टीका बच्चू कडूंनी केलीय. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राणा दाम्पत्यावर अमरावतीत जोरदार टीका केली. यावर बच्चू कडूंनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. राणा आणि फडणवीस हे दोघंही एकमेकांचे फॅन आहेत, त्यामुळे फडणवीस मुख्यमंत्र्याचं काही ऐकलं असं वाटत नाही, असा टोला कडूंनी लगावलाय.