28 Nov 2024, 08:55 वाजता
बच्चू कडूंचा राणा दाम्पत्यावर निशाणा
Bacchu Kadu On Ravi Rana : रवी राणांनी अपक्ष म्हणून माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवावी, असं आव्हान बच्चू कडूंनी राणांना दिलंय. राणा दाम्पत्यानी पराभवाचं श्रेय घेऊ नये. संपूर्ण राज्याचं चित्र बदललंय. कोणत्याही एक मतदारसंघातून निवडूक लढण्यास तयार आहे. राणांनीही अपक्ष म्हणून माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवावी, असं आव्हान बच्चू कडू यांनी दिलंय.
28 Nov 2024, 08:46 वाजता
16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंदी?
Social Media : 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालण्याची योजना आखण्यात आलीये... ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटन सरकारनं हा ऐतिहासिक निर्णय घेतलाय.. ऑस्ट्रेलियन संसदेत बुधवारी यासंबंधीचे विधेयकही मंजुर करण्यात आलंय.. या विधेयकावर अंतिम मोहोर उमटवण्याची जबाबदारी आता सिनेटवर आहे. या विधेयकाला अंतिम मंजुरी मिळाल्यास अल्पवयीन मुलांना सोशल मीडियापासून रोखणारा हा जगभरातील पहिलाच कायदा असेल. या विधेयकानुसार, जर X, टिकटॉक, फेसबुक आणि इन्स्टाग्राम यांसारखे प्लॅटफॉर्म लहान मुलांना खाती उघडण्यापासून रोखू शकले नाहीत तर त्यांना 32.5 दशलक्ष डॉलर्सपर्यंत दंड भरावा लागणार आहे.. या निर्णयाची अंमलबजावणी कधी होणार याकडे सा-यांचं लक्ष लागलंय..
28 Nov 2024, 08:37 वाजता
KDMCतील 65 बेकायदा इमारतींवर हातोडा पडणार
Kalyan-Dombivli Illegal Building : खोट्या कागदपत्रांच्या आधारे महापालिकेची परवानगी मिळविल्याचं भासवत 'रेरा' प्राधिकरणाकडून बांधकाम प्रमाणपत्र मिळविणाऱ्या 65 बेकायदा इमारती येत्या तीन महिन्यांत जमीनदोस्त करा, असे आदेश उच्च न्यायालयाने कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाला दिले. त्यामुळे या बेकायदा इमारतींमध्ये राहणाऱ्या हजारो नागरिकांच्या डोक्यावर बेघर होण्याची टांगती तलवार आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
28 Nov 2024, 08:14 वाजता
मावळमध्ये पेट्रोल पंपावर दुचाकीने घेतला पेट
Maval Bike Fire : पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या दुचाकीने अचानक पेट घेतला.सोमाटणे फाट्याजवळच्या लडकत पेट्रोल पंपावर ही घटना घडली. पेट्रोल भरण्यापूर्वी दुचाकीस्वार दुचाकीच्या पेट्रोल टाकीचं झाकण उघडत होता. त्यावेळी अचानक दुचाकीने पेट घेतला.दुचाकीने पेट घेताच दुचाकीस्वार खाली उतरला. त्यामुळे जीवित हानी टळली... पेट्रोल पंप कर्मचा-यांनीही तातडीने उपाययोजना केल्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
28 Nov 2024, 08:12 वाजता
तटकरे कुटुंबाविरोधात महेंद्र थोरवेंचा एल्गार
Raigad Mahendra Thorve : कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात एल्गार पुकारलाय. कर्जत मध्ये राष्ट्रवादीचाच उमेदवार अपक्ष उभा करून त्याचे सर्व नियोजन तटकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केलं. महायुती मध्ये राहून तटकरे कुटुंबीयांनी गद्दारी केली. अशांना सरकार मध्ये सहभागी करून घेऊ नये अशी मागणी महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केलीय
28 Nov 2024, 07:37 वाजता
राज्यातील काही जिल्ह्यांना थंडीच्या लाटेचा इशारा
State Cold : राज्यतील काही जिल्ह्यांना थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय.. उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. तर नाशिक, नगर, पुण्यात थंडीच्या लाटेची शक्यता आहे.. उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्याचं तापमान 10 अंशांवर गेलंय.. तर मुंबईची पाराही 17 अंशांवर गेलाय..