Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on November 28 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

28 Nov 2024, 19:36 वाजता

एन डी स्टुडिओ आता सरकारच्या ताब्यात

 

ND Studio : एन डी स्टुडिओ आता सरकारच्या गोरेगाव फिल्मसिटीच्या ताब्यात...राज्य सरकारचे सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगेंनी एन डी स्टुडिओची पाहणी केली...एन डी स्टुडिओ राज्य सरकारच्या ताब्यात...दिवंगत कलादिग्दर्शक नितीन देसाईंचा स्टुडिओ... एन डी स्टुडिओ गोरेगाव फिल्मसिटीच्या ताब्यात... एन डी स्टुडिओतच नितीन देसाईंनी केलेली आत्महत्या

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

28 Nov 2024, 18:56 वाजता

बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 27 हजार कर्मचाऱ्यांच्या खात्यात बोनस जमा

 

BEST Employees Diwali Bonus : अखेर बेस्ट कर्मचा-यांना आज दिवाळी बोनस देण्यात आला आहे... दिवाळी बोनस न मिळाल्यामुळे बेस्टचे चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. मात्र, आता दिवाळीनंतर एक महिन्याने 27 हजार बेस्ट कर्मचा-यांच्या बँक खात्यात दिवाळी भेट जमा झाली आहे. त्यामुळे बेस्टचे कर्मचारी सुखावले आहेत...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

28 Nov 2024, 17:41 वाजता

शिंदे, फडणवीसांसह शाहांसोबत रात्री चर्चा- अजित पवार

 

Ajit Pawar : एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांसह रात्री अमित शाहांसोबत बैठक असून त्या बैठकीमध्ये सत्तास्थापनेसंदर्भात चर्चा होणार असल्याचं अजित पवार म्हणालेत...दिल्लीमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात अजित पवारांची कार्यकर्त्यांसोबत चर्चा झाली...त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार बोलत होते...

बातमी व्हिडीओ पाहा-

 

28 Nov 2024, 16:33 वाजता

अक्कलकुवात आमदार आमश्या पाडवींच्या मिरवणुकीत राडा

 

Amsha Padvi : नंदुरबारमधील अक्कलकुवा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार आमशा पाडवींच्या मिरवणुकीत राडा झाला... यामुळे आमदार आमशा पाडवींच्या भव्य विजय रॅलीला गालबोट लागलं... रॅलीत दोन गटातील तरुणांमध्ये हाणामारी झाली... याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाहीये....  

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

28 Nov 2024, 15:11 वाजता

ठाकरेंचं नाव CMपदासाठी जाहीर करायला हवं होत- अंबादास दानवे 

 

Ambadas Danve : उद्धव ठाकरेंचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी जाहीर झालं असतं तर विधानसभेत जागा वाढल्या असत्या, असं विधान अंबादास दानवे यांनी केलाय. मात्र, काँग्रेसचे 10 नेते मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक होते. केवळ मंत्रिपदावरच चर्चा करत होते, असा टोलाही अंबादास दानवेंनी काँग्रेस नेत्यांना लगावलाय. लोकसभा जिंकल्यानंतर अती आत्मविश्वास निर्माण झाला, असं दानवे म्हणालेत. तर यावर आपण नंतर मित्रपक्षांना उत्तर देऊ अशी प्रतिक्रिया, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिली. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

28 Nov 2024, 14:18 वाजता

नालासोपाऱ्यात 41 अनधिकृत इमारतींवर कारवाईला सुरुवात

 

Nalasopara : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने नालासोपाऱ्यात ४१ अनाधिकृत इमारतींवर कारवाईला सुरूवात झाली आहे...नालासोपारा पूर्वेच्या आचोळे परिसरातील महानगरपालिकेच्या आरक्षित भूखंडावर या इमारती बांधण्यात आल्या आहेत... शेकडो रहिवासी या इमारतीमध्ये वास्तव्य असल्याने या कारवाईमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होणार आहेत.. स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यास या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण निर्माण होऊ शकते यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

28 Nov 2024, 13:56 वाजता

नवनीत राणांचा संजय राऊतांना टोला

 

Navneet Rana On Sanjay Raut : फणडवीस मुख्यमंत्री झाले तर स्वागत करणार का? या पत्रकाराच्या प्रश्नावर संजय राऊतांनी  मुख्यमंत्री हा राज्याचा असतो त्यामुळे जो होईल त्याचं स्वागत करू असं वक्तव्य केलंय, याच त्यांच्या वक्तव्यावरून नवनीत राणा यांनी राऊतांना टोला लगावलाय. संजय राऊत यांचे सूरच बदलले नाहीत तर त्यांची दिशाही खूप लवकरच बदलेल असं नवनीत राणा यांनी म्हटलंय

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

28 Nov 2024, 13:45 वाजता

सियाचीन, कारगिल युद्धभूमीवर पर्यटन करता येणार

 

Siyachin-Kargil Tourism : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद ते पर्यटन असा बदल झालाय. देशाच्या सीमावर्ती भागातील ४८ ठिकाणी पर्यटनासाठी जाता येणारेय. त्या दृष्टीने साहसी खेळ, गिर्यारोहण, ट्रेकिंग अशा उप्रक्रमांना प्रोत्साहन देण्यात येत असून सियाचिन, गलवान, कारगिल युद्धभूमी पर्यटकांना खुली करण्यात येणार आहे.   लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी ही माहिती दिली.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

28 Nov 2024, 12:45 वाजता

भाजपकडून केंद्रीय निरीक्षकांच्या नावाची घोषणा

 

BJP Observer : राष्ट्रीय निवडणूक अधिकारी आणि राज्यातील भाजप संघटना यांच्या समन्वयासाठी भाजपकडून केंद्रीय निरीक्षकांच्या नावांची घोषणा करण्यात आली. यामध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची पुन्हा उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन्ही मोठ्या राज्यांचे केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलीये.. विनोद तावडेंना ही जबाबदारी दिल्याने त्यांचं राजकीय वजन वाढणार आहे.. त्यांच्या मदतीसाठी  संजीव चौरसिया, संजय भाटिया आणि लाल सिंग आर्य यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. तर  महाराष्ट्र आणि गोव्याचे निरीक्षक म्हणून सरचिटणीस अरुण सिंह यांची नियुक्ती करण्यात आलीये.. देशभरातील भाजप संघटनेत बूथ अध्यक्षांच्या निवडणुका होत होत्या. आता भाजप मंडल अध्यक्षांची निवडणूक 15 डिसेंबरपर्यंत, तर जिल्हाध्यक्षांची निवडणूक 30 डिसेंबरपर्यंत होणार आहे. यानंतर प्रदेशाध्यक्षांच्या निवडणुकीसाठी दिल्लीत एक मोठी कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

28 Nov 2024, 12:12 वाजता

प्रियंका गांधींना लोकसभेच्या खासदारकीची शपथ

 

Delhi Priyanka Gandhi : प्रियंका गांधींनी आज लोकसभेच्या खासदार म्हणून शपथ घेतली.... वायनाडच्या पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी वाड्रा विक्रमी मतांनी विजयी झाल्यात.. भाकपचे सत्यन मोकेरी आणि प्रियंका गांधी यांच्यात ही लढत झाली होती यात प्रियंका गांधी 6.22 लाख मतांनी विजयी झाल्यात.. प्रियंका गांधीयांच्यासह नांदेड पोटनिवडणुकीत विजयी झालेले रविंद्र चव्हाण यांनीही खासदारकीची शपथ घेतली