29 Nov 2024, 08:32 वाजता
सोलापूरहून 23 डिसेंबरपासून विमानसेवा सुरु होणार
Solapur Air Ticket : सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी... एका खासगी कंपनीकडून 23 डिसेंबरपासून विमानसेवा सुरू होत आहे. 10 डिसेंबरपासून विमानसेवेचे ऑनलाईन तिकीट बुकिंग सुरू होणार आहे. सोलापूर ते गोवा या विमान प्रवासासाठी 1 हजार 70 रुपये तर सोलापूर ते मुंबई प्रवासासाठी 1 हजार 465 रुपये मोजावे लागणार आहे. मात्र केवळ ऑनलाईन अॅडव्हान्स बुकिंग करणा-यांसाठीच प्रवाशांना या दरचा फायदा मिळणार आहे..
29 Nov 2024, 07:51 वाजता
एकनाथ शिंदेंकडून गृहखात्याची मागणी-सूत्र
Mahayuti Mantripad : दिल्लीत झालेल्या महायुतीच्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदेंनी शिवसेनेला गृहखातं देण्याची मागणी केली मात्र गृहमंत्रिपद सोडण्यास भाजपनं नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.. गृहमंत्रिपद स्वताकडे कायम ठेवण्यास भाजप आग्रही आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतीये.. तसंच मुख्यमंत्र्यांकडे असणारे नगरविकास आणि भाजपकडे असलेले सांस्कृतिक खाते याबबाही दिल्लीतील बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.. आता यासंदर्भात आज मुंबईत पुन्हा चर्चा होण्याची शक्यता आहे..
29 Nov 2024, 07:38 वाजता
अडीच वर्षात केलेल्या कामामुळे समाधानी - एकनाथ शिंदे
Delhi Eknath Shinde : बैठकीत समोर आलेल्या एकनाथ शिंदेंच्या फोटोवरुन चर्चेला उधाण आलंय.. या फोटोत एकनाथ शिंदेंचा चेहरा पडल्याची चर्चा रंगली असताना आता यावर स्वत: एकनाथ शिंदेंनीच पडदा टाकलाय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -