India VS New Zealand Test : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तीन सामान्यांची टेस्ट सीरिज खेळवली जाणार असून 16 ऑक्टोबर रोजी याच्या पहिल्या सामन्याला सुरुवात होईल. मात्र सीरिजला सुरुवात होण्यापूर्वी न्यूझीलंडचा कॅप्टन टॉम लॅथम याने एक मोठा दावा केला आहे. त्याने भारताला धमकी वजा चॅलेंज दिलं असून त्याने वक्तव्य करून खळबळ उडवून दिली.
न्यूझीलंडचा टेस्ट कर्णधार टॉम लॅथम याने म्हंटले की, "माझ्या दृष्टिकोनातून पाहायचे झाल्यास आम्हाला जर भारताला हरवायचं असेल तर आम्हाला चांगलं क्रिकेट खेळावं लागेल, जे आम्ही आतापर्यंत खेळत आलो आहोत. भारतात जाऊन खेळणे हे आमच्यासाठी एक चॅलेंज असतं आणि मला विश्वास आहे की आम्ही तिथे गेल्यावर स्वातंत्र्यतेने आणि निडर होऊन खेळू शकू. आम्ही त्यांना चांगली टक्कर देऊ आणि विजय मिळवू.
टॉम लॅथम याचं म्हणणं आहे की, 'अनेक क्रिकेट टीमनी भारतात येऊन टीम इंडिया विरुद्ध एग्रेसिव्ह क्रिकेट खेळून त्यांना चांगली टफ दिली आहे'. लॅथमने पुढे म्हंटले की, 'यापूर्वी देखील काही परदेशी टीमनी भारतात येऊन एग्रेसिव्ह खेळ दाखवला आहे. तेव्हा आम्ही सुद्धा टीम इंडिया विरुद्ध आक्रमक खेळी करून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करू. इथे आल्यावर आम्ही ठरवू की आम्हाला कसे खेळायचे आहे. आम्ही या दौऱ्यासाठी प्लॅन तयार केला आहे '.
हेही वाचा : PHOTOS : एकेकाळी मॅगी खाऊन जगला, आता राहतोय 30 कोटींच्या घरात, हार्दिकची संपत्ती पाहून डोळे फिरतील
न्यूझीलंड संघ जेव्हाही भारत दौऱ्यावर आला आहे. तेव्हा तेव्हा त्यांना भारताकडून पराभवचं मिळालेला आहे. न्यूझीलंडची टीम पहिल्यांदा 1955-56 दरम्यान टेस्ट सीरीज खेळण्यासाठी आली होती. त्यानंतर प्रत्येक सीरिजमध्ये भारताने न्यूझीलंडला हरवलं आहे. न्यूझीलंड यापूर्वी टेस्ट सीरिज खेळण्यासाठी 2021 मध्ये टीम इंडिया दौऱ्यावर आले होते. त्यावेळी भारतात दोन सामन्यांच्या टेस्ट सीरिजमध्ये त्यांचा 1-0 ने विजय झाला होता.
न्यूझीलंड संघ भारत दौऱ्यावर येणार असून यांच्यात तीन सामन्यांची टेस्ट सीरिज आणि तेवढ्याच सामन्यांची टी 20 सीरिज खेळण्यात येईल. 16 ते 20 ऑक्टोबर दरम्यान पहिला सामना हा चिन्नस्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येणार असून दुसरा सामना 24 ते 28 ऑक्टोबर दरम्यान पुण्यात खेळवला जाईल. तर तिसरा सामना हा 1 ते 5 नोव्हेंबर दरम्यान वानखेडे स्टेडियमवर पार पडेल. तर टी 20 सिरीजचा पहिला सामना हा 18 नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येईल.