Chetan Patil's bail Rejected : चेतन पाटीलचा तुरुंगातील मुक्काम वाढला

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on september 19 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Chetan Patil's bail Rejected : चेतन पाटीलचा तुरुंगातील मुक्काम वाढला

19 Sep 2024, 21:59 वाजता

शिवराय पुतळाप्रकरणातील बांधकाम सल्लागार चेतन पाटीलचा जामीन फेटाळला

 

Chetan Patil's bail Rejected : शिवराय पुतळा प्रकरणातील बांधकाम सल्लागार चेतन पाटीलचा तुरुंगातील मुक्काम वाढलाय... ओरोस येथील जिल्हा सत्र न्यायालयानं चेतन पाटीलचा जामीन अर्ज फेटाळलाय..सरकारी वकील गजानन तोडकरी यांनी चेतन पाटीलच्या जामिनाला विरोध केला.. तांत्रिक बाबींचा तपास आणि एक्स्पर्ट ओपिनीयन रिपोर्ट यायचा असल्यानं चेतन पाटीलच्या जामिनास विरोध करण्यात आलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

19 Sep 2024, 19:36 वाजता

काँग्रेस, भाजपनंही स्वामीनाथन आयोग लागू केला नाही- बच्चू कडू यांचा आरोप

 

Bacchu Kadu on Mahayuti : माजी मंत्री बच्चू कडूंची महायुतीला सोडचिठ्ठी… 'झी २४ तास'च्या रोखठोक कार्यक्रमात बच्चू कडू यांची घोषणा... बच्चू कडू परिवर्तन महाशक्तीसोबत.. परिवर्तन महाशक्तीच्या बॅनरखाली निवडणूका लढवणार असल्याची प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडूंची माहिती.. काँग्रेस आणि भाजपनंही स्वामीनाथन आयोग लागू केला नाही- बच्चू कडू यांचा आरोप.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

19 Sep 2024, 16:39 वाजता

नार्वेकरांच्या घराबाहेर काँग्रेसचं आंदोलन, कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

 

Congress Agitation : अनिल बोंडेंनी राहुल गांधींविरोधात केलेल्या टीकेनंतर राज्यभर काँग्रेस आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय...काँग्रेसनं आज राज्यभर आंदोलनाची हाक दिलीये...विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या घरासमोर काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करण्यासाठी जमले होते...त्यावेळी नार्वेकरांचेही कार्यकर्ते तेथे उपस्थित होते...यावेळी पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड केली...पोलीस व्हॅन नसल्यानं पोलीस काँग्रेस कार्यकर्त्यांना बेस्ट बसमधून घेऊन गेले.. वर्षा गायकवाड यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर भाईंदरमध्येही नाना पटोलेंच्या नेतृत्वात काँग्रेसनं आंदोलन केलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

19 Sep 2024, 14:48 वाजता

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत मनसे तटस्थ?

 

Mumbai University Senate Election : मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना तटस्थ भूमिका घेणारे...सूत्रांकडून याबाबत माहिती मिळतेय...22 सप्टेंबरला मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरे पक्ष युवा सेना विरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अशी लढत रंगणारे...महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणत्याही संघटनेला, पक्षाला किंवा उमेदवाराला पाठिंबा देणार नसल्याचं अमित ठाकरेंनी पदाधिका-यांना स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय...निवडणूक लढत असलेले काही पदाधिकारी मनसेकडून पाठिंबा मिळाला असल्याचं सांगत असतील तर ते चुकीचं असल्याचंही मनसेकडून सांगण्यात येतयं...या निवडणुकीत मनसे पदाधिकारी कोणत्याही उमेदवाराचं काम करताना दिसला किंवा कुठल्या प्रकारची मदत करताना आढळल्यास त्यावर पक्ष कारवाई करेल असा इशाराही मनसेकडून देण्यात आल्याचं सूत्रांकडून समजतंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

19 Sep 2024, 14:20 वाजता

शरद पवारांचा छगन भुजबळांना धक्का

 

Changan Bhujbal : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंत्री छगन भुजबळांना मोठा धक्का बसलाय.. भुजबळांचे निकटवर्तीय ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे शरद पवारांच्य पक्षात प्रवेश करणार आहेत... त्यांच्यासह चळवळीतील प्रमुख कार्यकर्त्यांचा शरद पवार गटात पक्ष प्रवेश होणार आहे... ओबीसींना न्याय मिळत नसल्यानं परत शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचं बाळबुद्धेंनी म्हटलंय.. उद्या सकाळी मुंबईतील पक्ष कार्यालयात शरद पवार, जयंत पाटील आणि अनिल देशमुखांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

19 Sep 2024, 14:15 वाजता

आदित्य ठाकरे राहुल गांधींसारखे प्रोडक्ट - अनिल बोंडे

 

Anil Bonde VS Arvind Sawant : आदित्य ठाकरे राहुल गांधींसारखे प्रोडक्ट असल्याची टीका भाजप खासदार  बोंडे यांनी केलीये.. त्यांच्या या टीकेला ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी उत्तर दिलंय.. अनिल बोंडे विषारी खतांवर रुजलेलं बोंड असल्याचा टोला अरविंद सावंतांनी लगावलाय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

19 Sep 2024, 14:11 वाजता

वन नेशन, वन इलेक्शन लोकशाहीला पोषक नाही - उल्हास बापट

 

Ulhas Bapat On One Nation One Election : वन नेशन, वन इलेक्शन हे भारताच्या लोकशाहीला पोषक नाही, अशी प्रतिक्रिया राज्यघटनेचे अभ्यासक उल्हास बापट यांनी दिलीये. तुम्हाला 4 राज्याच्या निवडणुकाच एकावेळी घेता येत नाहीत तर 28 राज्यांच्या निवडणुका एकत्र कशा घेणार, असा सवाल त्यांनी केलाय. तर हा निर्णय सुप्रीम कोर्ट घटनाबाह्य ठरवू शकतात, असं त्यांनी म्हटलंय

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

19 Sep 2024, 14:07 वाजता

ज्योती मेटे तिसऱ्या आघाडीत सामील होणार?

 

Jyoti Mete : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, ज्योती मेटे सुद्धा तिसऱ्या आघाडीत सामील होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संभाजीराजे छत्रपतींनी ज्योती मेटेंना फोन केला आणि आमच्या तिसऱ्या आघाडीत येण्याबाबत विचार करावा, अशी विनंती त्यांना केली. मेटे साहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी ही उत्तम आणि योग्य संधी असल्याचंही संभाजीराजेंनी यावेळी ज्योती मेटेंना सांगितलं. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांच्या तिसऱ्या आघाडीत सहभागी होण्याबद्दल ज्योती मेटे काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

19 Sep 2024, 13:30 वाजता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांना टोला

 

CM Ekanath Shinde On Sanjay Raut : सकाळचं प्रदूषण कमी झालं पाहिजे असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांना लगावलाय.. गणपती विसर्जनानंतर गिरगाव चौपाटीवर स्वच्छता ही सेवा उपक्रम रावबण्यात आला.. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी राऊतांवरही टीका केली.. स्वभाव आणि संस्काराच्या स्वच्छतेवरही विशेष लक्ष दयायला हवं असा टोला शिंदेंनी राऊतांचं नाव न घेता लगावलाय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

19 Sep 2024, 13:27 वाजता

पुणे विसर्जन मिरवणुकीत 3 जणांचा मृत्यू

 

Pune : पुण्यातील विसर्जन मिरवणुकीदरम्यान तिघांचा अकस्मित मृत्यू झालाय.. हा मृत्यू कशामुळे झालाय याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये.. या तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून त्यानंतर त्यांच्या मृत्यूचं कारण कळणार आहे.. दरम्यान कालच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजेच्या आवाजामुळे 582जणांना त्रास झाला.. त्यांच्यावरही तातडीनं उपचार करण्यात आलेत..

बातमीचा व्हिडीओ पाहा -