Lab Report on Tirupati Laddu : तिरुपतीच्या लाडवांमध्ये प्राण्यांची चरबी- लॅब अहवालात पुष्टी

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on september 19 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Lab Report on Tirupati Laddu : तिरुपतीच्या लाडवांमध्ये प्राण्यांची चरबी- लॅब अहवालात पुष्टी

19 Sep 2024, 11:02 वाजता

लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळा डबा

 

Special Coach For Senior Citizen : लोकलमधून प्रवास करणा-या ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी...लवकरच लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांना स्वतंत्र डबा मिळणार आहे. रेल्वे प्रशासनाने मुंबई हायकोर्टात याबाबत माहिती दिलीये... पुढील दोन वर्षांत ज्येष्ठ नागरिकांना मुंबई लोकलमध्ये ही विशेष सेवा मिळणार आहे.. तोपर्यंत लोकलमधील एका मालडब्याचे रुपांतर ज्येष्ठ नागरिकांच्या स्वतंत्र डब्यामध्ये करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले... ज्येष्ठ नागरिकांना लोकल प्रवासादरम्यान होणाऱ्या त्रासावर उपाय म्हणून अपंग प्रवाशांप्रमाणे स्वतंत्र डबा उपलब्ध करण्यात यावा अशी मागणी जनहीत याचिकेद्वारे करण्यात आली होती.. या सुनावणीदरम्यान ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबा उपलब्ध करून दिला जाईपर्यंत त्यांना मालडब्यातून प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी असे आदेशही हायकोर्टाने रेल्वे प्रशासनाला दिले.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

19 Sep 2024, 10:46 वाजता

संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

 

Sanjay Pandey Joins Congress : माजी पोलीस महासंचालक संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.. आज संध्याकाळी मुंबईमध्ये वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.. आझात मैदानातील मुंबई काँग्रेस कार्यालयात त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.. संजय पांडे हे वर्सोवा मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत.. ते 1986च्या IPS बॅचचे पोलीस अधिकारी असून निवृत्तीनतंर 2022मध्ये त्यांना NSEफोन टॅपिंग प्रकरणात अटकही झाली होती..  

19 Sep 2024, 10:39 वाजता

लाडकी बहीण योजनेचा फायदा होणार नाही - शरद पवार

 

Sharad Pawar : लाडकी बहीण योजनेचा फायदा महायुतीला होणार नसल्याचं मोठं विधान शरद पवारांनी केलंय.. आगामी विधानसभेत मविआ जिंकणार असल्याचा विश्वासही शरद पवारांनी केलाय.. एका मुलाखतीत शरद पवारांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय... तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना त्यांच्या नेतृत्वावरही शरद पवारांनी शिक्कामोर्तब केलंय.. कोरोना काळात ठाकरेंनी चांगलं काम केल्याचं शरद पवार म्हणालेत तर सुप्रिया सुळे दिल्लीत खुश असल्याचं शरद पवार म्हणालेत.. त्यामुळे सुप्रिया सुळे राज्याच्या राजकारणात येणार नसल्याचंही शरद पवारांनी अप्रत्यक्ष सांगितलंय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

19 Sep 2024, 09:34 वाजता

संजय पाटील यड्रावकर यांच्या पक्षाला मान्यता

 

Kolhapur : जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकरांच्या शाहू विकास आघाडी पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगानं मान्यता दिलीये.. संजय पाटील हे शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे भाऊ आहेत.. पक्षाला मान्यता मिळाल्यामुळे आता आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर शाहू विकास आघाडीकडूनच निवडणूक लढण्याची शक्यता आहे. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

19 Sep 2024, 09:24 वाजता

दिल्लीत नव्या मुख्यमंत्र्यांचा शनिवारी शपथविधी?

 

Delhi New Chief Minister : शनिवारी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री आतिशी यांचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. नायब राज्यपालांनी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांच्याकडे तसा प्रस्ताव पाठवल्याची माहिती मिळतेय. 2 दिवसांपूर्वी अतिशी यांनी राज्यपालांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला होता. आतिशी यांच्यासोबत इतर कोणते मंत्री शपथ घेणार त्याची नावं मात्र अद्याप गुलदस्त्यात आहेत. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

19 Sep 2024, 08:56 वाजता

रामदास आठवलेंकडून 10-12 जागांची मागणी

 

Latur Ramdas Aathvale : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी 10 ते 12 जागांची मागणी केलीये.  देवेंद्र फडणवीस हे आमचा विचार करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.. ते लातूर जिल्ह्यातील औसा शहरात तक्षशिला बौद्धविहार विकासकामांसाठी आले होते..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

19 Sep 2024, 08:51 वाजता

पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे दणदणाट

 

Pune Sound Pollution : पुण्यात ध्वनीप्रदूषण रोखण्याच्या नियमांची पायमल्ली झाल्याचं पाहायला मिळालं...पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी आवाहन करूनही  डिजेचा दणदणाट पाहायला मिळाला. ध्वनिप्रदूषणाच्या सर्व मर्यादा ओलांडून यंदाच्या मिरवणुकीत लक्ष्मी रोड आणि दहा प्रमुख चौकांत सरासरी 90 डेसिबलपेक्षा जास्त नोंदवली गेली. सरासरी ध्वनीपातळी 94.8 डेसिबल असून, त्यातही बेलबाग चौक आणि होळकर चौकातील ध्वनीपातळी सर्वाधिक 118 डेसिबल इतक्या धोकादायक पातळीवर पोहचली होती.  

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

19 Sep 2024, 08:12 वाजता

मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस

 

Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे.सगे सोयरे कायद्याच्या मागणीसाठी जरांगे यांनी अंतरवाली सराटीत सहाव्यांदा आमरण उपोषण सुरु केलंय. काल जरांगे यांच्या तपासणीसाठी 3 वेळा डॉक्टरांचं पथक आलं तीन वेळा त्यांची डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. दोन दिवसांपासून जरांगे यांनी अन्न पाण्याचा त्याग केल्यामुळे त्याची शुगर लेव्हल 70 वर आली होती, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. आपल्या उपोषणावर जरांगे ठाम असून  मागण्या मान्य करा अन्यथा पश्चाताप करण्याची वेळ येईल जरांगेंचा पुन्हा इशारा... 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

19 Sep 2024, 08:10 वाजता

राज्यातील नव्या आघाडीसाठी आज बैठक

 

Pune : महाराष्ट्रातील नव्या आघाडीसाठी आज प्रमुख नेते एकत्र येणार आहेत. महाराष्ट्राला नवीन सुसंस्कृत पर्याय देण्यासाठी संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी, बच्चू कडू, तसंच इतर घटक पक्षांची आज पुणे शहरात एकत्र बैठक होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू, भारतीय जवान किसान पक्षाचे नारायण अंकुशे आणि इतर घटक पक्षाच्या नेत्यांची चौथी बैठक आज पुण्यात होईल. यात राज्यातील महत्त्वाचे प्रश्न, तसंच आगामी निवडणुकीतील अजेंडा, यावर सखोल विचारमंथन केलं जाईल. 

बातमीचा व्हिडीओ पाहा