Lab Report on Tirupati Laddu : तिरुपतीच्या लाडवांमध्ये प्राण्यांची चरबी- लॅब अहवालात पुष्टी

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on september 19 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Lab Report on Tirupati Laddu : तिरुपतीच्या लाडवांमध्ये प्राण्यांची चरबी- लॅब अहवालात पुष्टी

19 Sep 2024, 13:30 वाजता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांना टोला

 

CM Ekanath Shinde On Sanjay Raut : सकाळचं प्रदूषण कमी झालं पाहिजे असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांना लगावलाय.. गणपती विसर्जनानंतर गिरगाव चौपाटीवर स्वच्छता ही सेवा उपक्रम रावबण्यात आला.. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी राऊतांवरही टीका केली.. स्वभाव आणि संस्काराच्या स्वच्छतेवरही विशेष लक्ष दयायला हवं असा टोला शिंदेंनी राऊतांचं नाव न घेता लगावलाय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

19 Sep 2024, 13:27 वाजता

पुणे विसर्जन मिरवणुकीत 3 जणांचा मृत्यू

 

Pune : पुण्यातील विसर्जन मिरवणुकीदरम्यान तिघांचा अकस्मित मृत्यू झालाय.. हा मृत्यू कशामुळे झालाय याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये.. या तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून त्यानंतर त्यांच्या मृत्यूचं कारण कळणार आहे.. दरम्यान कालच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजेच्या आवाजामुळे 582जणांना त्रास झाला.. त्यांच्यावरही तातडीनं उपचार करण्यात आलेत..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

19 Sep 2024, 13:22 वाजता

भरत गोगावलेंची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती?

 

Bharat Gogavale : भरत गोगावलेंची ST महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड कऱण्यात आल्याची माहिती सूत्रांनी झी 24 तासला दिलीय.. एकनाथ शिंदेंकडून त्यांच्या नेत्यांची महामंडळावर नियुक्ती केली जातेय.. एसटी महामंडळावरील पदाला कॅबिनेटचा दर्जाचे आहे. शिंदे गटातील तीन आमदारांची काही दिवसांपूर्वीच महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली. त्यामध्ये आनंदराव अडसूळ, हेमंत पाटील आणि संजय शिरसाटांच्या नावाचा समावेश आहे. त्यामुळे शिंदेंच्या नेत्यांची महामंडळावर नियुक्ती होत असतांना दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजी असल्याची माहिती आहे.. 

19 Sep 2024, 13:09 वाजता

वन नेशन, वन इलेक्शन लोकशाहीविरोधी - संजय राऊत

 

Sanjay Raut On One Nation One Election : 'वन नेशन वन इलेक्शन हे लोकशाहीविरोधी' असल्याचं म्हणत संजय राऊतांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. मोदी पुढची निवडणूक हरणार असल्याच्या भीतीमुळे स्वार्थासाठी निर्णय घेतल्याचा राऊतांनी आरोप केलाय इतकंच नाहीतर आगामीकाळात 'नो नेशन...नो इलेक्शन'पण होईल असाही टोला राऊतांनी लगावलाय

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

19 Sep 2024, 12:51 वाजता

सलमान खानचे वडील सलीम खान यांना धमकी

 

Salman Khan : अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांना धमकी देण्यात आलीय. 'लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या, असं म्हणत अज्ञात महिलेकडून धमकी देण्यात आलीये. मुंबईतल्या बँड स्टँड परिसरात सलीम खान मॉर्निंग वॉकसाठी गेले असता एका स्कुटीवर पुरुष आणि बुर्खादारी महिला त्यांच्या जवळ येऊन त्यांना ही धमकी दिली. याप्रकरणी अज्ञात महिलेविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करतायेत. 

19 Sep 2024, 12:41 वाजता

वक्फ विधेयकावरील समिती 5 राज्यांचा दौरा करणार

 

Waqf Board : वक्फ विधेयकावरील संयुक्त संसदीय समिती 5 राज्यांचा दौरा करणार आहे.. महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांना ही समिती भेट देणार आहे.. 26 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान समिती हा दौरा करणार आहे.. दौ-या दरम्यान पाच राज्यांतील अल्पसंख्याक विभागांच्या प्रतिनिधींची भेट घेणार आहे..  मुंबई, अहमदाबाद, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू मध्ये या समितीच्या बैठका होतील.. या दौ-यात वक्फ मालमत्तांची माहिती गोळा करुन वक्फ विधेयकाबाबत चर्चा करणार आहेत..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

19 Sep 2024, 12:23 वाजता

मविआ राज्यात 'वर्धा पॅटर्न' राबवणार?

 

Vardha Pattern : विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी अनेक ठिकाणी वर्धा पॅटर्न राबवण्याची शक्यता आहे...तीन पक्ष एकत्रित असताना मतदारसंघांची देवाण-घेवाण होईलच सोबतच उमेदवारांचा मेरिट ही महत्त्वाचा ठरेल असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस शेखर सावरबांधे म्हणालेत.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा 

19 Sep 2024, 12:17 वाजता

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या वर्धा दौरा

 

Prime Minister Narendra Modi In Wardha : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या वर्धा जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत. पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्तानं मोदींचा वर्ध्यात कार्यक्रम होणारेय. या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते चकाचक करण्याचं काम सुरूये. तसंच रस्त्यांवरील खड्डेही बुजवण्यात येतायेत. 

19 Sep 2024, 11:56 वाजता

अजित पवारांचे फेसबुक अकाऊंट हॅक?

 

Ajit Pawar : अजित पवारांचं फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची माहिती आहे.. अजित पवारांचं फेसबुक अकाऊंट हॅक झाल्यानंतर काही लोकांनी त्यांना फॉलो केलंय अजित पवारांच्या फेसबुक अकाऊंटहून आक्षेपार्ह पेज असलेल्या एका पेजला फॉलो करण्यात आलं.. त्यानंतर काही लोकांनी पेजला फॉलो केलंय... त्यामुळे अजित पवारांचं फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची चर्चा आहे.. अजित पवारांची प्रतिमा मलीन करण्यासाठी काही लोकांचा प्रयत्न असल्याचं अजित पवारांच्या पक्षाकडून सांगण्यता आलंय.. त्याची सायबर पोलिसात तक्रार दाखल कऱण्यात येणार आहे.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

19 Sep 2024, 11:21 वाजता

संजय दिना पाटील अडचणीत येण्याची शक्यता

 

Sanjay Dina Patil : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय दिना पाटील अडचणीत येण्याची शक्यता आहे.. त्यांच्या खासदारकीला अपक्ष उमेदवार शहाजी थोरात यांच्याकडून हायकोर्टात आव्हान देण्यात आलंय.. निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आलेल्या शपथपत्रात आईच्या नावाचा उल्लेख नसल्यानं संजय दिना पाटील यांना अपात्र ठरवण्यात यावं, अशी मागणी हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेतून करण्यात आलीये..दरम्यान याप्रकरणी मिहीर कोटेंचा यांच्यासह अन्य उमेदवारांना समन्स बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश कोर्टानं दिलेत. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -