Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on september 28 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

28 Sep 2024, 08:27 वाजता

'विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या', शिंदे, पवार, ठाकरेंच्या पक्षाची मागणी

 

Maharashtra Politics : आगामी विधानसभा निवडणूकीसाठी एकाच टप्प्यात मतदान घ्या अशी मागणी सत्ताधारी शिंदे, अजित पवारांसह ठाकरेंच्या शिवसेनेनं केलीये.. मात्र भाजप आणि काँग्रेसनं याबात मौन बाळगलं.. विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राज्यात आलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची भूमिका जाणून घेतली. त्यावेळी एका टप्प्यात निवडणुका घेण्यात याव्यात, यासाठी शिंदे, अजित पवार आणि उद्धव ठकारेचा पक्ष आग्रही राहिले.

28 Sep 2024, 08:03 वाजता

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज नाशिक दौरा

 

CM, DCM visit Nashik today : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार नाशिक दौ-यावर आहेत. त्यांच्या हस्ते नाशिकमध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन करण्यात येणारेय. तर सारथीच्या विभागीय कार्यालयाचं भूमिपूजन करण्यात येणारेय. तसंच बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाचा लोकार्पण सोहळा पार पडणारेय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

28 Sep 2024, 07:28 वाजता

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक विजय ही सुरुवात- आदित्य ठाकरे

 

Aditya Thackeray on Mumbai Senate Election Result : मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीचा विजय ही सुरवात असून, असाच विजय महाविकास आघाडी आगामी विधानसभा निवडणुकीत मिळवेल असा विश्वास, आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. सिनेटच्या निकालातही अडथळे आणण्याचे प्रयत्न केले गेल्याचा आरोप, आदित्य यांनी केला. हीच हरण्याची भीती असल्यामुळे राज्यात शहरांतील तसंच स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरकार घेत नसल्याची टीका त्यांनी केली. आमचे कार्यकर्ते, नेत्यांनी खूप मेहनत घेतली आणि मतदार राजाने आम्हाला साथ दिली, अशी कृतज्ञतेची भावनाही त्यांनी यानिमित्तानं व्यक्त केली. 

28 Sep 2024, 07:22 वाजता

 '...तर राहुल गांधी पंतप्रधान असते', प्रकाश आंबेडकरांचा दावा

 

Prakash Ambedkar : काँग्रेसने वंचितला सोबत घेतलं असतं तर आज राहुल गांधी पंतप्रधान असले असते असा मोठा दावा प्रकाश आंबेडकरांनी केलाय. झी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत आंबेडकरांनी हा दावा केलाय.. काँग्रेसने वंचितला सोबत घेतलं असतं तर भाजपला रोखता आलं असतं.. वंचित आणि काँग्रेसने मिळून भाजपला 220 जागांच्या वर जाऊ दिलं नसतं असंही आंबेडकर म्हणालते. तसंच जर भाजपच्या 20 जागा कमी झाल्या असत्या तर मोदी पंतप्रधान झाले नसते तर राहुल गांधी पंतप्रधान झाले असते असा दावाही प्रकाश आंबेडकरांनी केलाय.. वंचितला न घेतल्याने काँग्रेसने पंतप्रधानपदाची संधी गमावली असं आंबेडकर म्हणालेत..