IND VS BAN 2nd Test : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यातील दुसरा सामना शुक्रवार 27 सप्टेंबर पासून कानपूर येथे खेळवला जात आहे. परंतु कानपुर टेस्टच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवसाचा खेळ हा पावसामुळे खराब झाला. पहिल्या दिवशी शुक्रवारी केवळ 35 ओव्हरचा खेळ होऊ शकला. तर दुसऱ्या दिवशीही पाऊस पडल्याने फस्ट हाफचा खेळ होऊ शकला नाही. टेस्ट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सुद्धा कानपूरमध्ये 59 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जर कानपूर टेस्ट सामना पावसामुळे रद्द झाला तर WTC पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडियाचे नुकसान होऊ शकते.
कानपुर येथील ग्रीन पार्क स्टेडियमवर भारत- बांगलादेश दुसरा टेस्ट सामना खेळवला जात आहे. दुसऱ्या दिवशी 80 टक्के पाऊस पडण्याची शक्यता असून तिसऱ्या दिवशी सुद्धा 59 टक्के पाऊस पडू शकतो. त्यामुळे दुसऱ्या टेस्ट सामन्याचा निर्णय निघणे अशक्य होईल ज्यामुळे भारत- बांगलादेश दुसरा टेस्ट सामना ड्रॉ होऊ शकतो. जर असे झाले तर भारताने बांगलादेश विरुद्ध पहिला टेस्ट सामना जिंकूनही त्यांचे पॉइंट्स टेबलमध्ये नुकसान होऊ शकते.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (2023-2025) च्या सायकलमध्ये टीम इंडियाने आतापर्यंत 10 टेस्ट सामने खेळले असून यापैकी 7 सामने त्यांनी जिंकले आहेत. तर केवळ 2 टेस्ट सामन्यात त्यांचा पराभव आणि एक सामना टाय झालाय. भारताच्या विजयाची टक्केवारी 71.67 टक्के आहे. कानपुर टेस्ट ड्रॉ झाली तर बांगलादेशला सोबत त्यांना पॉईंट्स वाटावे लागतील. भारत आणि बांगलादेशला या परिस्थितीत त्यांना 4-4 पॉईंट्स वाटून घ्यावे लागतील. भारत जर कानपुर टेस्ट जिंकली तर त्यांना 12 पॉईंट्स मिळतील, पण दुसरा टेस्ट सामना ड्रॉ झाला तर भारताला 8 पॉइंट्सचे नुकसान होईल.
हेही वाचा : IPL 2025 : मेगा ऑक्शनच्या रिटेन्शन नियमांची घोषणा कधी? समोर आले मोठे अपडेट्स, उत्सुकतता शिगेला
जर कानपुर टेस्ट ड्रॉ झाली तर भारताचे पॉईंट्स 68.18 टक्के राहतील. तर भारताने टेस्ट सामना जिंकला तर हेच पॉईंट्स 74.24 टक्के राहतील. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठण्यासाठी भारताला 9 टेस्ट सामन्यापैकी 5 टेस्ट सामने जिंकावे लागतील. बांगलादेश सोबतच्या टेस्ट सीरिजनंतर भारत न्यूझीलंड विरुद्ध 3 सामन्यांची टेस्ट सीरिज आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी भारताला कानपूर टेस्ट सह एकूण 9 टेस्ट सामन्यापैकी 5 सामने जिंकावे लागतील.
रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणारी टीम इंडिया 11 जून 2025 मध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर होणारा ऐतिहासिक वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळण्यासाठीचा प्रबळ दावेदार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा खिताब जो संघ जिंकतो त्याला टेस्टची गदा दिली जाते. वर्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकणे हा कोणत्याही देशासाठी अभिमानाचा क्षण असतो. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कप 2024 चे विजेतेपद जिंकले आहे. आता रोहितचे टार्गेट भारताला टेस्ट चॅम्पियनशिप जिंकवून देणे असेल.