Maharashtra Breaking News LIVE Updates: CM फडणवीसांनी बीडचं पालकमंत्रीपद घ्यावं - रोहित पवार

Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील ठळक घडामोडींचा थेट आढावा एका क्लिकवर

Maharashtra Breaking News LIVE Updates: CM फडणवीसांनी बीडचं पालकमंत्रीपद घ्यावं - रोहित पवार

Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यात मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आहे. सोमवारपासून नागपूरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकारणातील प्रत्येक घडामोडींचा आढावा या लाइव्बब्लॉगच्या माध्यमातून घेऊया. 

17 Dec 2024, 21:05 वाजता

आता बातमी एका अपूर्ण लढ्याची...
ज्येष्ठ आंदोलनकर्त्या सुनंदा मोकाशी यांनी मंबईत अखेरचा श्वास घेतला. आझाद मैदान परिसरातील झोपडीत त्यांचा मृतदेह आढळला. गेल्या अनेक वर्षांपासून त्या आझाद मैदानात आंदोलन करत होत्या. निराधारांच्या मानधानासाठी त्या एकहाती लढाई लढत होत्या. यासाठी वर्षाचे 12 महिने त्या आझाद मैदानातच ठाण मांडून होत्या. पांढरी साडी आणि हातातील पिशवीत अनेक कागदपत्रं एवढाच त्यांचा लवाजमा असायचा. या त्यांच्या लढ्यात त्यांना आश्वासनं तर अनेक मिळाली. मात्र त्यांच्या लढ्याला न्याय मिळू शकला नाही. अखेर निराधारांसाठीचा त्यांचा लढा अपूर्ण राहिला. 

17 Dec 2024, 21:04 वाजता

मुंबईतील अदानी स्मार्ट मीटरला शिवसेना UBT ने विरोध केलाय. या स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात भरमसाट वाढ होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. यामुळे नागरिकांचा होणारा विरोध लक्षात घेता अदानींसोबत हा स्मार्ट मीटरचा करार रद्द करावा. अशी मागणी शिवसेना UBT चे आमदार अजय चौधरी यांनी विधानसभेत केलीय.

17 Dec 2024, 21:03 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates : देशातील सोयाबीनचे दर घसरले

केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्क वाढवून देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या दरात सुधारणा होईल,अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, प्रत्यक्षात आंतरराष्ट्रीय बाजारात तेल महागल्याने देशातील सोयाबीनचे दर घसरलेत...सध्या वाशिम जिल्ह्यात सोयाबीनचे दर सरासरी 4 हजार प्रति क्विंटलवर आलेत.. दुसरीकडे, किरकोळ बाजारात सोयाबीन तेलाचे दर 138 ते 140 रुपये प्रति लिटरवर कायम आहेत, ज्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य ग्राहक दोघेही अडचणीत आलेत... शेतकऱ्यांना उत्पादन खर्च वसूल करणे कठीण जात असताना ग्राहकांना तेल महागल्याने खर्चाचा बोजा सहन करावा लागतोय. त्यामुळे शेतकरी संघटनांनी सरकारने बाजार नियंत्रणासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी केलीये.

 

17 Dec 2024, 19:32 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates : 'मारहाणीचा व्हिडिओ रेकॉर्ड करुन कुणाला दाखवला?'

बीडचे तरुण सरपंच संतोष देशमुख यांना जिवघेणी मारहाण करत असतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड करुन तो कोणाला तरी दाखवण्यात आला. त्या संबंधितावरही खुनाचं कलम लावलं पाहिजे अशी मागणी, आमदार सुरेश धस यांनी केली आहे. या प्रकरणातले आरोपी फरार असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. या निर्घृण हत्येच्या कसून चौकशीची मागणी धस यांनी केलीये. 

 

17 Dec 2024, 17:56 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates : 'स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार द्यावा'

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा केलीये. केंद्र सरकारला स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्यास काय अडचण आहे. असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय.

 

17 Dec 2024, 17:55 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates : खातेवाटपाबाबत उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका 

उद्धव ठाकरेंनी खातेवाटपाबाबत नव्या सरकारवर टीका केलीय...मंत्रिमंडळ विस्तार झाला मात्र अद्याप खातेवाटप झालेलं नाही, अधिवेशनात काय सुरू आहे काहीच कळत नाही...आम्ही प्रश्न उपस्थित करतो मात्र कोणताही नेता कोणत्याही प्रश्नावर उत्तर देतोय...याला काहीच अर्थ नसल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय

 

17 Dec 2024, 16:55 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील व्हिडिओ समोर आलाय.. प्रकरणातील एक आरोपी आणि पीएसआय यांच्यात भेट झाल्याचा व्हिडिओ समोर आलाय. केजमधील एका हॉटेलमध्ये दोघेही भेटल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.. आरोपी सुदर्शन घुले आणि पीएसआय राजेश पाटील यांची भेट सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालीये...

 

17 Dec 2024, 16:37 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates : देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंनी घेतली भेट

नागपूरमध्ये अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे यांनी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्री फडणवीसांना भेटायला उद्धव ठाकरे त्यांच्या कार्यालयात पोहोचले. तिथे दोघांमध्ये काही काळ चर्चा झाली.

बातमी सविस्तर वाचा - उद्धव ठाकरे - फडणवीसांमध्ये 6-7 मिनिटं चर्चा, भेटीनंतर ठाकरे म्हणाले, 'महाराष्ट्रात सुसंस्कृत...'

 

17 Dec 2024, 15:25 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates : उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट

नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु असून आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमागील कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. उद्धव ठाकरेंनी फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचीदेखील भेट घेतली आहे. 

 

 

17 Dec 2024, 14:19 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates : 'निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट आहे का?'

वन नेशन वन इलेक्शन या मुद्द्यावरून वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रीया दिलीय. लोकसभा निवडणूक वेगळ्या मुद्यावर असते  आणि विधानसभेच्या निवडणुकीचे मुद्दे वेगळे असतात. त्यामुळे स्थानिक पक्षांवर नक्कीच याचा परिणाम होईल असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय.