Maharashtra Breaking News LIVE Updates: CM फडणवीसांनी बीडचं पालकमंत्रीपद घ्यावं - रोहित पवार

Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील ठळक घडामोडींचा थेट आढावा एका क्लिकवर

Maharashtra Breaking News LIVE Updates: CM फडणवीसांनी बीडचं पालकमंत्रीपद घ्यावं - रोहित पवार

Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यात मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आहे. सोमवारपासून नागपूरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकारणातील प्रत्येक घडामोडींचा आढावा या लाइव्बब्लॉगच्या माध्यमातून घेऊया. 

17 Dec 2024, 10:03 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: 'भुजबळांनी जरांगेंच्या विरोधात टोकाची भूमिका घेतली'

भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्या विरोधात टोकाची भूमिका घेतली होती. आमची इच्छा होती त्यांनी ही टोकाची भूमिका घेऊ नये. त्यांना ती टोकाची भूमिका घ्यायला लावली. ज्यांनी ती घ्यायला लागली त्यांनी आता त्यांना वाऱ्यावर सोडलं. त्यांचा पुरेपूर वापर त्या काळात झाला, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

17 Dec 2024, 09:46 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: अमरावतीत अवैध नायलॉन मांजा विक्रेत्याविरुद्ध कारवाई

अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या रविनगर भागात अवैध नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे. या करवाईत एकाला ताब्यात घेत त्याच्याकडून 36 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. राजापेठचे ठाणेदार पुनीत कुलट यांच्या मार्गदर्शनाखाली ही करवाई करण्यात आली. दरम्यान मांजाविरुद्ध शहरात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली असून शहराच्या विविध भागातून मांजा जप्त करण्यात येत आहे. तसेच मांजा ने दुखापती झाल्याच्या ही घटना उघडकीस येत आहे.

17 Dec 2024, 09:45 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: अष्टविनायक महामार्गावर भिषण अपघात विद्यार्थांचा मृत्यू 

 पुण्याच्या शिरूर तालुक्यातील मलठण कवठे दरम्यान अष्टविनायक महामार्गावर दहावी शिकणाऱ्या 16 वर्षीय विद्यार्थांचा आज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुर्दैवीरित्या मृत्यू झालाय, दिगंबर शिंदे असं मुलाचे नाव असून दिगंबर शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना भरधान वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहणाने त्याला चिरडल्याने यातच त्याचा मृत्यू झालाय, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जातीय

17 Dec 2024, 09:26 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: छगन भुजबळ मोठा निर्णय घेणार?

छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यानंतर ते नाराज असल्याचे समोर आले आहे. नागपूरयेथून थेट नाशिकच्या भुजबळ फार्म या त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. भुजबळ सकाळपासून नाशिकच्या भुजबळ फार्मवर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना भेटणार आहेत. या भेटीनंतर छगन भुजबळ काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. समता परिषदेच्या सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलणार आणि मग ठरवणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

17 Dec 2024, 09:10 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबतची सुनावणी आज

सर्वोच्च न्यायालयात आज राष्ट्रवादी काँग्रेस्या पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी होणार आहे. 

17 Dec 2024, 09:09 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: देवेंद्र फडणवीस सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज काही महत्त्वाची विधेयके सरकारकडून सभागृहात सादर केली जाऊ शकतात. यात मुख्यत्वे जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका किमान तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्याच्या विधेयकासह इतर काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे. तर दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील आज विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होणार आहेत. त्यामुळे आज विरोधकांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष असेल.

17 Dec 2024, 09:08 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates:  आज होणार विधान परिषद सभापती पदाचा निर्णय

2 वर्षांपासून रिक्त असलेले परिषदेच्या सभापती पदाच्या निवडीबाबत आज कार्यक्रम जाहीर होणार. विधानसभेच्या पाठोपाठ आता परिषदेतही भाजप सभापती पदावर दावा करण्याची शक्यता. तर शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे यांच्या नावाची चर्चा.

17 Dec 2024, 09:07 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates:  वन नेशन, वन इलेक्शन बिल लोकसभेत सादर होणार?

आज वन नेशन, वन इलेक्शन बिल लोकसभेत सादर होणार आहे. शिवसेना खासदारांना त्या साठी व्हीप बजावण्यात आला असून शिवसेनेचे सर्व खासदार आज एनडीए अलायन्ससाठी संसदेत उपस्थित राहणार. शिवसेनेचे लोकसभेचे नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी हा व्हीप जारी केला आहे